राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची बदनामी प्रकरणी पोलिसांची तात्काळ कारवाई; आरोपी महिलेवर गुन्हा दाखल सोशल मीडियाच्या गैरवापरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला पदाधिकाऱ्याची बदनामी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्याने आज दुपारी ठीक एक वाजता तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उद्योजिका असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आहेत. आज रात्री साडे 9 वाजण्याच्या सुमारास सोशल मीडिया पाहत असताना त्यांच्याबाबत अश्लील व बदनामीकारक फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणात रुपाली रासकर (रा. पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हिने फिर्यादी तसेच खासदार निलेश लंके यांचे बदनामीकारक फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याचा आरोप आहे. या कृत्यामुळे फिर्यादीची समाजात नाहक बदनामी होऊन त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. फिर्यादीच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७९ व ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल शिंदे करत आहेत. सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने सोशल मीडियाच्या गैरवापराविरोधात कठोर संदेश गेला आहे

- नवीन वर्षा निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी रामदारा मंदिर लोणी काळभोर1
- आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीला ग्रहण ;नवीन बसविलेली सुरक्षा रक्षक जाळी तुटली विक्रम शिंदे /भोर दि.२ पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी काही दिवस शिल्लक असल्याने या स्पर्धेच्या तयारीला आता वेग आला आहे.पुणे शहरासह ग्रामीण भागातून ही स्पर्धा जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय सायकलपटूच्या सुरक्षेसाठी नदीपात्रावरील पुलांवर सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरू आहे.मात्र काही दिवसांपूर्वी कासुर्डी (ता. भोर )येथील गुंजवणी नदीवरील पुलावर बसवलेली जाळी अपघातग्रस्त वाहनामुळे मोडली असून आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीला ग्रहण लागल्याचे दिसून येते.जागतिक स्पर्धेची वारी आपल्या भोरच्या दारी या अनुषंगाने ग्रामपंचायत कापूरहोळ (ता .भोर )येथे प्रांताधिकारी डॉ .विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन ,गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट ,गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेच्या तयारी बाबत नुकतीच आढावा बैठक पार पडली.पुणे ग्रँड टूर सायकल भोर तालुक्यातील कासुर्डी ,कापूरहोळ इ. ग्रामीण भागात येणार असून गावाचा नावलौकिक वाढणार असल्याने नागरिकांनी प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले आहे.1
- अस्नोली येथे हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांना मानवंदना1
- नए साल 2026 से देशभर में ट्रैफिक के नए नियम लागू होने जा रहे हैं, और अगर आप इन नियमों का पालन नहीं करेंगे तो आपका चालान भारी हो सकता है। नए नियमों के तहत, बिना ड्राइविंग लाइसेंस के पकड़े जाने पर ₹5000 का जुर्माना लगेगा, वहीं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) न रखने पर ₹3000 से ₹5000 तक का जुर्माना भरना पड़ेगा। सबसे बड़ा बदलाव यह है कि बिना हेलमेट के बाइक या स्कूटी चलाने पर ₹1000 जुर्माने के साथ-साथ आपका लाइसेंस भी सस्पेंड किया जा सकता है। इसलिए, नए साल में ट्रैफिक नियमों का पालन जरूर करें ताकि भारी जुर्माना से बच सकें। हेलमेट पहनें, लाइसेंस और RC साथ रखें, और सड़क सुरक्षा का ख्याल रखें।1
- Bhurya is a Kalyan East Chaki Naka Dog who stays at the Traffic Police Station and he is a very loving and Joyful dog who roams around and plays with people all the time. Suddenly we got to know he is unwell and not stable to even stand we immediately took him to our vet and started his treatment on diagnosis we got to know he got Tick fiver all 3 variants positive and also a brain stroke..... His treatment is very expensive and we would need your support1
- *लातूर प्रभाग 2ड मधील किशन बडगीरे अपक्ष उमेदवाराने घेतली माघार* https://youtube.com/shorts/gEbx-DmRQ2o?feature=share1
- शेतकऱ्यांना तातडीने युरिया द्या : माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केली आहे. गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन जास्त असून सर्वत्र युरियाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तरी शासनाने तातडीने सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा सातत्याने विविध संकटांचा सामना करत असतो. या संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. यावर्षी राज्यासह संगमनेर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांनी रब्बी पीक मोठ्या प्रमाणात केले आहे. कांदा, मका, हरभरा, गहू ही पिके मोठ्या प्रमाणात आली आहेत. मात्र युरियाचा तुटवडा झाला आहे. हा तुटवडा कृत्रिम आहे का, याची चौकशी सरकारने केली पाहिजे. याचबरोबर संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना युरिया तातडीने उपलब्ध करून दिला पाहिजे, असे ते म्हणाले.1
- भोरला रस्त्यासाठी गावकऱ्यांचे टाळ वाजवत आंदोलन विक्रम शिंदे /भोर दि.२ कांबरे खे.बा. ते गराडे खिंड हा पूर्णपणे नवीन रस्ता असून, यासाठी लागणारी जमीन वनविभागाच्या अखत्यारीत होती. अनेक वर्षांनंतर आता वनविभागाची आवश्यक परवानगी मिळालेली आहे. मात्र त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी वनविभागाकडे आवश्यक प्रस्ताव दाखल न केल्यामुळे प्रत्यक्ष रस्त्याचे काम रखडले आहे. या पार्श्वभूमीवर भागवत एकादशीचे औचित्य साधून भोर येथील पंचायत समिती कार्यालयात संभाजी ब्रिगेडने गावकऱ्यांसोबत टाळ वाजवत व अभंग म्हणत शांततामय आंदोलन केले. या रस्त्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. वनविभागाची परवानगी मिळूनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे काम सुरू होत नसल्याबाबत यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री. सिद्धार्थ कोंढाळकर म्हणाले की, “हा रस्ता पूर्ण झाल्यास भोर व पुरंदर हे दोन तालुके जोडले जातील. नसरापूर व सासवड ही प्रमुख गावे जोडली गेल्याने दळणवळण सुलभ होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि स्थानिक व्यापाराला चालना मिळेल.” आंदोलनाची दखल घेत पंचायत समिती भोर येथील गटविकास अधिकारी यांनी तात्काळ पाठपुरावा करून प्रस्तावास मान्यता दिल्याचे सांगितले, तर बांधकाम विभागाचे कुलकर्णी साहेब यांनी सदरचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तत्काळ पाठविल्याची माहिती दिली. आंदोलनादरम्यान टाळ वाजवत खालील अभंग म्हणण्यात आला — "शासनाच्या दारी आंदोलन करी, तेव्हा काम करी आधीकारी." यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, सागर शिंदे (सरपंच), दशरथ मांढरे (उपसरपंच), दादासाहेब शेलार (वनसमिती अध्यक्ष), महादेव चव्हाण, लक्ष्मण यादव, योगेश शिंदे, रोहित खिरिड, निलेश कोंढाळकर, प्रितम कोंढाळकर, धनंजय मालुसरे व सतीश गायकवाड उपस्थित होते. जर तात्काळ प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर संभाजी ब्रिगेड व गावकरी पंचायत समिती, भोर येथे ठिय्या आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.1
- *रिपब्लिकन सेना यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गट यांच्यासोबत युती प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये दिले दोन उमेदवार* https://youtube.com/shorts/T7OIyFxfgWI?feature=share1