भोरला रस्त्यासाठी गावकऱ्यांचे टाळ वाजवत आंदोलन विक्रम शिंदे /भोर दि.२ कांबरे खे.बा. ते गराडे खिंड हा पूर्णपणे नवीन रस्ता असून, यासाठी लागणारी जमीन वनविभागाच्या अखत्यारीत होती. अनेक वर्षांनंतर आता वनविभागाची आवश्यक परवानगी मिळालेली आहे. मात्र त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी वनविभागाकडे आवश्यक प्रस्ताव दाखल न केल्यामुळे प्रत्यक्ष रस्त्याचे काम रखडले आहे. या पार्श्वभूमीवर भागवत एकादशीचे औचित्य साधून भोर येथील पंचायत समिती कार्यालयात संभाजी ब्रिगेडने गावकऱ्यांसोबत टाळ वाजवत व अभंग म्हणत शांततामय आंदोलन केले. या रस्त्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. वनविभागाची परवानगी मिळूनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे काम सुरू होत नसल्याबाबत यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री. सिद्धार्थ कोंढाळकर म्हणाले की, “हा रस्ता पूर्ण झाल्यास भोर व पुरंदर हे दोन तालुके जोडले जातील. नसरापूर व सासवड ही प्रमुख गावे जोडली गेल्याने दळणवळण सुलभ होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि स्थानिक व्यापाराला चालना मिळेल.” आंदोलनाची दखल घेत पंचायत समिती भोर येथील गटविकास अधिकारी यांनी तात्काळ पाठपुरावा करून प्रस्तावास मान्यता दिल्याचे सांगितले, तर बांधकाम विभागाचे कुलकर्णी साहेब यांनी सदरचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तत्काळ पाठविल्याची माहिती दिली. आंदोलनादरम्यान टाळ वाजवत खालील अभंग म्हणण्यात आला — "शासनाच्या दारी आंदोलन करी, तेव्हा काम करी आधीकारी." यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, सागर शिंदे (सरपंच), दशरथ मांढरे (उपसरपंच), दादासाहेब शेलार (वनसमिती अध्यक्ष), महादेव चव्हाण, लक्ष्मण यादव, योगेश शिंदे, रोहित खिरिड, निलेश कोंढाळकर, प्रितम कोंढाळकर, धनंजय मालुसरे व सतीश गायकवाड उपस्थित होते. जर तात्काळ प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर संभाजी ब्रिगेड व गावकरी पंचायत समिती, भोर येथे ठिय्या आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

- नवीन वर्षा निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी रामदारा मंदिर लोणी काळभोर1
- संगमनेरला ८४९ कोटींचा निधी : आ. खताळ संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एका वर्षात ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आणला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी अज दुपार चार वाजता दिली. खताळ म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंच्या अंतर्गत ग्रामीण रस्त्यांसाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. ग्रामीण भागासोबतच शहरातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. संगमनेर(घुलेवाडी) उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर तसेच स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.1
- https://youtube.com/shorts/Ru4A301RZXs?si=UURzGkCaUnnFUx5C1
- पाचोड पोलीस चा प्रताप पैशासाठी काही पण गंभीर प्रकरण दाबतात1
- सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस उत्साहात; खासदार कल्याण काळे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव सिल्लोड: १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिल्लोड येथील शिवसेना भवन परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. राज्याचे लोकप्रिय नेते आणि स्थानिक आमदार श्री. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा सोहळा आणि गर्दी सकाळपासूनच शिवसेना भवन येथे कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. 'लाडक्या नेत्याला' शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण सिल्लोड मतदारसंघातून समर्थक ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दाखल झाले होते. संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि शुभेच्छांच्या फलकांनी (बॅनर्सनी) ओसंडून वाहत होता. खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती. त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार काळे यांनी आमदारांच्या जनसंपर्काचे आणि विकासकामांचे कौतुक केले. "सत्तार साहेबांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांच्या हिताचे असून, त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडावी," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मान्यवरांची मांदियाळी या कार्यक्रमाला केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम, जसे की रक्तदान शिबिर आणि गरजूंना मदत वाटप करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांनी ही सर्व प्रेम आणि शुभेच्छा स्वीकारताना मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आणि भविष्यातही सिल्लोडच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. 1
- यशाची सुरुवात इथूनच ✍️ शांत, अभ्यासपूरक वातावरणात नियमित अभ्यास करण्यासाठी Saraswati Abhyasika – विद्यार्थ्यांची विश्वासाची जागा. आजच प्रवेश घ्या 📞 93720036441
- शेतकऱ्यांना तातडीने युरिया द्या : माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केली आहे. गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन जास्त असून सर्वत्र युरियाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तरी शासनाने तातडीने सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा सातत्याने विविध संकटांचा सामना करत असतो. या संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. यावर्षी राज्यासह संगमनेर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांनी रब्बी पीक मोठ्या प्रमाणात केले आहे. कांदा, मका, हरभरा, गहू ही पिके मोठ्या प्रमाणात आली आहेत. मात्र युरियाचा तुटवडा झाला आहे. हा तुटवडा कृत्रिम आहे का, याची चौकशी सरकारने केली पाहिजे. याचबरोबर संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना युरिया तातडीने उपलब्ध करून दिला पाहिजे, असे ते म्हणाले.1
- भाजपाच्या राड्याचा तिसरा अंक सुरू नासिक शहरात भाजपाची प्रतिमा डागळली भाजपा शहराध्यक्षांना घेराव घालत थेट सवाल नासिक मध्ये भाजपाच्या अंतर्गत नाराजीचे चित्र समोर आले असून भाजपाच्या शहराध्यक्ष सुनील केदार यांना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातला तिकीट वाटप व पक्षातील निर्णयावरून कार्यकर्त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत जा विचारला सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून सुनील केदार यांना ऑफिसमध्ये कोंडले1
- *लातूर प्रभाग 2ड मधील किशन बडगीरे अपक्ष उमेदवाराने घेतली माघार* https://youtube.com/shorts/gEbx-DmRQ2o?feature=share1