Shuru
Apke Nagar Ki App…
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात 'ऑपरेशन प्रहार'अंतर्गत मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत दारू वाहतूक उधळली आहे. या कारवाईत पोलिसांनी 500 देशी दारूचे पाऊच आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले मारुती ओमनी वाहन असा एकूण ₹1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
MOHAMMED RIZWAN RAHEMAN
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात 'ऑपरेशन प्रहार'अंतर्गत मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत दारू वाहतूक उधळली आहे. या कारवाईत पोलिसांनी 500 देशी दारूचे पाऊच आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले मारुती ओमनी वाहन असा एकूण ₹1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
More news from Buldhana and nearby areas
- आषाढी एकादशीनिमित्त विदर्भाचे प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानामध्ये भाविकांचा भक्तिसागर उसळला आहे. पंढरपूरला प्रत्यक्ष जाणे शक्य न झालेल्या हजारो भाविकांनी शेगावात हजेरी लावली असून, मराठवाडा, खान्देश, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावतीसह विदर्भातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन संस्थानाने शुक्रवारी (२४ जुलै) रात्री मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. पहाटेपासूनच श्रींच्या समाधी दर्शनासाठी लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. या सोहळ्यानिमित्त संस्थानतर्फे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडा आरतीने उत्सवाला सुरुवात झाली असून त्यानंतर भजन, दुपारचे प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा आणि रात्री ८ ते १० या वेळेत श्रीहरी कीर्तन होणार आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थानने श्री समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद तसेच भक्त निवासामध्ये निवासाची विशेष सोय केली आहे. मंदिर परिसरात स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, वाहतूक नियंत्रण आणि सेवेकऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली असून अधिकारी व सेवेकरी दिवसरात्र कार्यरत आहेत. पंढरपूरप्रमाणेच शेगावातही भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा अविस्मरणीय सोहळा साकारला असून गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.1
- ड्रग्ज माफियांच्या विरोधात मोठी कारवाई करत २१४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान एमडी ड्रग्ज आणि स्विफ्ट कारसह आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांना मोठा धक्का बसला आहे.1
- नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि मारहाणीचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली होती. देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला अखेर यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आणि हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा व लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, राजीव गांधी पंचायत राज समितीचे समन्वयक अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष ॲड. अमर पाचपोर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, नगरसेविका वैशाली तायडे, ॲड. संदीप मानकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आजम कुरेशी, सुनील बोदडे, श्रीराम भिडे, रोशन तायडे, विजय सातव यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.1
- राजीनाम्यानंतर दिल्लीच्या जंतरमंतरवर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला आहे. सरन्यायाधीशांच्या विधानावरून सुरू झालेल्या चळवळीला अखेर मोठे यश मिळाले असून, या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा लोकशाहीचा एक मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे.1
- हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंगोलीचे भूमिपुत्र अभिजीत दिपके यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली. या संघर्षामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. गोरेगाव येथे झालेल्या या आनंदोत्सवात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी "हा आंदोलनाचा विजय आहे, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे" अशा जोरदार घोषणा देत जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या संघर्षाला हे यश समर्पित असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान गजानन कावरखे, नामदेव पतंगे, राहुल कावरखे, अमोल जाधव, अमोल एकशिंगे, रामेश्वर कावरखे, अलीम भाई आणि कोंडबाराव खटके यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील आठवडी बाजारात २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त 'एक झाड विठ्ठलाचे' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आखाडा बाळापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेशभाऊ गोयंका यांच्या वतीने टिगार्ड भेट देण्यात आले आहेत. या कार्यक्रमास राजेंद्र प्रसाद अग्रवाल, अरुण कन्नावार, संतोष सापळीकर, किशोर सिंह बयास, प्रा. ओमप्रकाश बोंढारे, डॉ. अरुण सुर्यवंशी, शिवराज स्वामी, नामदेव बोंढारे, विजय कदम, माधवराव काळे, बालुसिंह ठाकुर, दशरथ पेंढारकर आणि मधुकर चेटप आदींसह पर्यावरण मित्र मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.1
- आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठूच्या साजिऱ्या आणि सुंदर रूपाचे वर्णन करण्यात आले आहे. विठुरायाच्या या रूपामध्ये संपूर्ण ब्रह्मांड साठले असल्याची भावना व्यक्त करत आषाढी एकादशीचा भक्तिभाव मांडण्यात आला आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव जामोद येथील सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ कलर्सच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) शहरातून पारंपरिक वारकरी दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगवे झेंडे आणि संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. ही दिंडी पोलीस स्टेशन परिसरातून सुरू होऊन दुर्गा चौक, चौभरा चौक, जुने भाजी मार्केट आणि लहान बस स्टँड या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "गण गण गणात बोते" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिंडीत सहभागी झालेल्या मुलांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत सावता माळी अशा विविध संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि तुळशी वृंदावनासह शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या दिंडीने वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. या उपक्रमातून बालकांमध्ये भारतीय संस्कृती, भक्ती, एकता, शिस्त, सामाजिक मूल्ये आणि वारकरी परंपरेचे महत्त्व रुजविण्याचा संदेश देण्यात आला. दिंडी मार्गावर मोठ्या संख्येने पालक, नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहून चिमुकल्यांचे कौतुक केले. या प्रसंगी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन अस्थाना, माजी आमदार कृष्णराव इंगळे, उर्मिलाताई इंगळे, भाऊसाहेब इंगळे, डॉ. शेषराव भोपळे, स्वातीताई वाकेकर, गौरीताई सातव, डॉ. संदीप वाकेकर, हुसेन डायमंड, तुकाराम काळपांडे, राजाभाऊ कोकाटे, एपीआय शेडगे मॅडम, अमर पाचपोर, रमेश ताडे, रामविजय बुरुंगले, जिवनलालजी झंवर, चंपालालजी झंवर, केशव हिंगणे, मनोज राठी, अजय वानखडे, विकास जाधव, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार, संदीप मानकर, राजू घुटे, अनिल इंगळे, दिवेश कोठडिया आणि अनंता वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा जळगाव जामोद शहरासाठी भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अविस्मरणीय संगम ठरला.1
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल आणि लोकांच्या सकारात्मक सूचनांबद्दल व्यक्त होताना त्यांनी, "थँक यू फ्रेंड्स, तुमच्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल आणि सकारात्मक सूचनांबद्दल मनापासून आभार," असे म्हणत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.1