logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव जामोद येथील सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ कलर्सच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) शहरातून पारंपरिक वारकरी दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगवे झेंडे आणि संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. ही दिंडी पोलीस स्टेशन परिसरातून सुरू होऊन दुर्गा चौक, चौभरा चौक, जुने भाजी मार्केट आणि लहान बस स्टँड या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "गण गण गणात बोते" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिंडीत सहभागी झालेल्या मुलांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत सावता माळी अशा विविध संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि तुळशी वृंदावनासह शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या दिंडीने वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. या उपक्रमातून बालकांमध्ये भारतीय संस्कृती, भक्ती, एकता, शिस्त, सामाजिक मूल्ये आणि वारकरी परंपरेचे महत्त्व रुजविण्याचा संदेश देण्यात आला. दिंडी मार्गावर मोठ्या संख्येने पालक, नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहून चिमुकल्यांचे कौतुक केले. या प्रसंगी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन अस्थाना, माजी आमदार कृष्णराव इंगळे, उर्मिलाताई इंगळे, भाऊसाहेब इंगळे, डॉ. शेषराव भोपळे, स्वातीताई वाकेकर, गौरीताई सातव, डॉ. संदीप वाकेकर, हुसेन डायमंड, तुकाराम काळपांडे, राजाभाऊ कोकाटे, एपीआय शेडगे मॅडम, अमर पाचपोर, रमेश ताडे, रामविजय बुरुंगले, जिवनलालजी झंवर, चंपालालजी झंवर, केशव हिंगणे, मनोज राठी, अजय वानखडे, विकास जाधव, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार, संदीप मानकर, राजू घुटे, अनिल इंगळे, दिवेश कोठडिया आणि अनंता वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा जळगाव जामोद शहरासाठी भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अविस्मरणीय संगम ठरला.

17 hrs ago
user_अनिल भगत पत्रकार
अनिल भगत पत्रकार
जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
17 hrs ago

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव जामोद येथील सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ कलर्सच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) शहरातून पारंपरिक वारकरी दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगवे झेंडे आणि संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. ही दिंडी पोलीस स्टेशन परिसरातून सुरू होऊन दुर्गा चौक, चौभरा चौक, जुने भाजी मार्केट आणि लहान बस स्टँड या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "गण गण गणात बोते" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिंडीत सहभागी झालेल्या मुलांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत सावता माळी अशा विविध संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि तुळशी वृंदावनासह शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या दिंडीने वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. या उपक्रमातून बालकांमध्ये भारतीय संस्कृती, भक्ती, एकता, शिस्त, सामाजिक मूल्ये आणि वारकरी परंपरेचे महत्त्व रुजविण्याचा संदेश देण्यात आला. दिंडी मार्गावर मोठ्या संख्येने पालक, नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहून चिमुकल्यांचे कौतुक केले. या प्रसंगी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन अस्थाना, माजी आमदार कृष्णराव इंगळे, उर्मिलाताई इंगळे, भाऊसाहेब इंगळे, डॉ. शेषराव भोपळे, स्वातीताई वाकेकर, गौरीताई सातव, डॉ. संदीप वाकेकर, हुसेन डायमंड, तुकाराम काळपांडे, राजाभाऊ कोकाटे, एपीआय शेडगे मॅडम, अमर पाचपोर, रमेश ताडे, रामविजय बुरुंगले, जिवनलालजी झंवर, चंपालालजी झंवर, केशव हिंगणे, मनोज राठी, अजय वानखडे, विकास जाधव, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार, संदीप मानकर, राजू घुटे, अनिल इंगळे, दिवेश कोठडिया आणि अनंता वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा जळगाव जामोद शहरासाठी भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अविस्मरणीय संगम ठरला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि मारहाणीचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली होती. देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला अखेर यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आणि हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा व लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, राजीव गांधी पंचायत राज समितीचे समन्वयक अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष ॲड. अमर पाचपोर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, नगरसेविका वैशाली तायडे, ॲड. संदीप मानकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आजम कुरेशी, सुनील बोदडे, श्रीराम भिडे, रोशन तायडे, विजय सातव यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
    1
    नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि मारहाणीचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली होती. देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला अखेर यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आणि हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा व लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा असल्याचे सांगितले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, राजीव गांधी पंचायत राज समितीचे समन्वयक अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष ॲड. अमर पाचपोर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, नगरसेविका वैशाली तायडे, ॲड. संदीप मानकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आजम कुरेशी, सुनील बोदडे, श्रीराम भिडे, रोशन तायडे, विजय सातव यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अल्पसंख्यांक मागासवर्गीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.
    1
    केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अल्पसंख्यांक मागासवर्गीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • आषाढी एकादशीनिमित्त विदर्भाचे प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानामध्ये भाविकांचा भक्तिसागर उसळला आहे. पंढरपूरला प्रत्यक्ष जाणे शक्य न झालेल्या हजारो भाविकांनी शेगावात हजेरी लावली असून, मराठवाडा, खान्देश, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावतीसह विदर्भातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन संस्थानाने शुक्रवारी (२४ जुलै) रात्री मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. पहाटेपासूनच श्रींच्या समाधी दर्शनासाठी लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. या सोहळ्यानिमित्त संस्थानतर्फे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडा आरतीने उत्सवाला सुरुवात झाली असून त्यानंतर भजन, दुपारचे प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा आणि रात्री ८ ते १० या वेळेत श्रीहरी कीर्तन होणार आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थानने श्री समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद तसेच भक्त निवासामध्ये निवासाची विशेष सोय केली आहे. मंदिर परिसरात स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, वाहतूक नियंत्रण आणि सेवेकऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली असून अधिकारी व सेवेकरी दिवसरात्र कार्यरत आहेत. पंढरपूरप्रमाणेच शेगावातही भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा अविस्मरणीय सोहळा साकारला असून गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
    1
    आषाढी एकादशीनिमित्त विदर्भाचे प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानामध्ये भाविकांचा भक्तिसागर उसळला आहे. पंढरपूरला प्रत्यक्ष जाणे शक्य न झालेल्या हजारो भाविकांनी शेगावात हजेरी लावली असून, मराठवाडा, खान्देश, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावतीसह विदर्भातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन संस्थानाने शुक्रवारी (२४ जुलै) रात्री मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. पहाटेपासूनच श्रींच्या समाधी दर्शनासाठी लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

या सोहळ्यानिमित्त संस्थानतर्फे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडा आरतीने उत्सवाला सुरुवात झाली असून त्यानंतर भजन, दुपारचे प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा आणि रात्री ८ ते १० या वेळेत श्रीहरी कीर्तन होणार आहे.

भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थानने श्री समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद तसेच भक्त निवासामध्ये निवासाची विशेष सोय केली आहे. मंदिर परिसरात स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, वाहतूक नियंत्रण आणि सेवेकऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली असून अधिकारी व सेवेकरी दिवसरात्र कार्यरत आहेत. पंढरपूरप्रमाणेच शेगावातही भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा अविस्मरणीय सोहळा साकारला असून गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    14 hrs ago
  • मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५–२६ अंतर्गत अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत लोहारी खुर्दची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर विभागीय स्तरावरील पाहणी प्रक्रियासुद्धा यशस्वीरित्या पार पडली असून, विभागीय पथकाने लोहारी खुर्द ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांची सविस्तर पाहणी करून सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. विभागीय स्तरावर निवड झाल्यास गट ग्रामपंचायत लोहारी खुर्दची पुढील राज्यस्तरीय फेरीसाठी निवड होणार आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर, सर्व ग्रामस्थांचे सहकार्य, विश्वास आणि विकासाचा ध्यास हेच कार्यकर्त्यांचे मुख्य बळ मानून सर्वांनी ग्रामविकासाचा ध्यास उराशी बाळगून कामाला लागावे, असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे.
    1
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५–२६ अंतर्गत अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत लोहारी खुर्दची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर विभागीय स्तरावरील पाहणी प्रक्रियासुद्धा यशस्वीरित्या पार पडली असून, विभागीय पथकाने लोहारी खुर्द ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांची सविस्तर पाहणी करून सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.

विभागीय स्तरावर निवड झाल्यास गट ग्रामपंचायत लोहारी खुर्दची पुढील राज्यस्तरीय फेरीसाठी निवड होणार आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर, सर्व ग्रामस्थांचे सहकार्य, विश्वास आणि विकासाचा ध्यास हेच कार्यकर्त्यांचे मुख्य बळ मानून सर्वांनी ग्रामविकासाचा ध्यास उराशी बाळगून कामाला लागावे, असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • खरीप हंगामातील पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन अटींमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात या नव्या नियमांच्या परिणामांमुळे अपेक्षेपेक्षा कमी, म्हणजेच केवळ ६४ हजार शेतकऱ्यांनीच यंदा पीक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. या वादाचा मुख्य मुद्दा म्हणजे पीक विम्याचा अर्ज करताना शेतकऱ्यांकडून "मी कोणत्याही प्रकारचे कृषी पीक कर्ज घेतलेले नाही" या आशयाचे हमीपत्र भरून घेतले जात असल्याचा दावा केला जात आहे. दरवर्षी बँकांकडून शेतीसाठी पीक कर्ज घेणारे अनेक शेतकरी यामुळे प्रचंड संभ्रमात आहेत. भविष्यात या हमीपत्राचा आधार घेऊन विमा नाकारला जाईल का, असा भीतीचा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. या हमीपत्राबाबत शासनाने तातडीने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधीच पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असताना, अशा जाचक अटी लादून शेतकऱ्यांना योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तुपकर यांनी सरकारकडे जुनी पीक विमा योजना पूर्ववत लागू करण्याची आणि अशा अटी तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
    1
    खरीप हंगामातील पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन अटींमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात या नव्या नियमांच्या परिणामांमुळे अपेक्षेपेक्षा कमी, म्हणजेच केवळ ६४ हजार शेतकऱ्यांनीच यंदा पीक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे.

या वादाचा मुख्य मुद्दा म्हणजे पीक विम्याचा अर्ज करताना शेतकऱ्यांकडून "मी कोणत्याही प्रकारचे कृषी पीक कर्ज घेतलेले नाही" या आशयाचे हमीपत्र भरून घेतले जात असल्याचा दावा केला जात आहे. दरवर्षी बँकांकडून शेतीसाठी पीक कर्ज घेणारे अनेक शेतकरी यामुळे प्रचंड संभ्रमात आहेत. भविष्यात या हमीपत्राचा आधार घेऊन विमा नाकारला जाईल का, असा भीतीचा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. या हमीपत्राबाबत शासनाने तातडीने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधीच पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असताना, अशा जाचक अटी लादून शेतकऱ्यांना योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तुपकर यांनी सरकारकडे जुनी पीक विमा योजना पूर्ववत लागू करण्याची आणि अशा अटी तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    11 hrs ago
  • राजीनाम्यानंतर दिल्लीच्या जंतरमंतरवर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला आहे. सरन्यायाधीशांच्या विधानावरून सुरू झालेल्या चळवळीला अखेर मोठे यश मिळाले असून, या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा लोकशाहीचा एक मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे.
    1
    राजीनाम्यानंतर दिल्लीच्या जंतरमंतरवर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला आहे. सरन्यायाधीशांच्या विधानावरून सुरू झालेल्या चळवळीला अखेर मोठे यश मिळाले असून, या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा लोकशाहीचा एक मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे.
    user_Gaurishankar Dhikar
    Gaurishankar Dhikar
    Local News Reporter धारणी, अमरावती, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही, काँग्रेस पक्ष संपूर्णपणे तुमच्या सोबत आहे, असे स्पष्ट आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धीर देत काँग्रेस पक्षाचा खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे.
    1
    आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही, काँग्रेस पक्ष संपूर्णपणे तुमच्या सोबत आहे, असे स्पष्ट आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धीर देत काँग्रेस पक्षाचा खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 day ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव जामोद येथील सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ कलर्सच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) शहरातून पारंपरिक वारकरी दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगवे झेंडे आणि संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. ही दिंडी पोलीस स्टेशन परिसरातून सुरू होऊन दुर्गा चौक, चौभरा चौक, जुने भाजी मार्केट आणि लहान बस स्टँड या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "गण गण गणात बोते" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिंडीत सहभागी झालेल्या मुलांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत सावता माळी अशा विविध संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि तुळशी वृंदावनासह शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या दिंडीने वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. या उपक्रमातून बालकांमध्ये भारतीय संस्कृती, भक्ती, एकता, शिस्त, सामाजिक मूल्ये आणि वारकरी परंपरेचे महत्त्व रुजविण्याचा संदेश देण्यात आला. दिंडी मार्गावर मोठ्या संख्येने पालक, नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहून चिमुकल्यांचे कौतुक केले. या प्रसंगी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन अस्थाना, माजी आमदार कृष्णराव इंगळे, उर्मिलाताई इंगळे, भाऊसाहेब इंगळे, डॉ. शेषराव भोपळे, स्वातीताई वाकेकर, गौरीताई सातव, डॉ. संदीप वाकेकर, हुसेन डायमंड, तुकाराम काळपांडे, राजाभाऊ कोकाटे, एपीआय शेडगे मॅडम, अमर पाचपोर, रमेश ताडे, रामविजय बुरुंगले, जिवनलालजी झंवर, चंपालालजी झंवर, केशव हिंगणे, मनोज राठी, अजय वानखडे, विकास जाधव, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार, संदीप मानकर, राजू घुटे, अनिल इंगळे, दिवेश कोठडिया आणि अनंता वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा जळगाव जामोद शहरासाठी भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अविस्मरणीय संगम ठरला.
    1
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव जामोद येथील सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ कलर्सच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) शहरातून पारंपरिक वारकरी दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगवे झेंडे आणि संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. ही दिंडी पोलीस स्टेशन परिसरातून सुरू होऊन दुर्गा चौक, चौभरा चौक, जुने भाजी मार्केट आणि लहान बस स्टँड या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "गण गण गणात बोते" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

दिंडीत सहभागी झालेल्या मुलांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत सावता माळी अशा विविध संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि तुळशी वृंदावनासह शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या दिंडीने वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. या उपक्रमातून बालकांमध्ये भारतीय संस्कृती, भक्ती, एकता, शिस्त, सामाजिक मूल्ये आणि वारकरी परंपरेचे महत्त्व रुजविण्याचा संदेश देण्यात आला. दिंडी मार्गावर मोठ्या संख्येने पालक, नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहून चिमुकल्यांचे कौतुक केले.

या प्रसंगी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन अस्थाना, माजी आमदार कृष्णराव इंगळे, उर्मिलाताई इंगळे, भाऊसाहेब इंगळे, डॉ. शेषराव भोपळे, स्वातीताई वाकेकर, गौरीताई सातव, डॉ. संदीप वाकेकर, हुसेन डायमंड, तुकाराम काळपांडे, राजाभाऊ कोकाटे, एपीआय शेडगे मॅडम, अमर पाचपोर, रमेश ताडे, रामविजय बुरुंगले, जिवनलालजी झंवर, चंपालालजी झंवर, केशव हिंगणे, मनोज राठी, अजय वानखडे, विकास जाधव, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार, संदीप मानकर, राजू घुटे, अनिल इंगळे, दिवेश कोठडिया आणि अनंता वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा जळगाव जामोद शहरासाठी भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अविस्मरणीय संगम ठरला.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.