Shuru
Apke Nagar Ki App…
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अल्पसंख्यांक मागासवर्गीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.
SURYA MARATHI NEWS
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अल्पसंख्यांक मागासवर्गीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अल्पसंख्यांक मागासवर्गीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.1
- नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि मारहाणीचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली होती. देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला अखेर यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आणि हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा व लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, राजीव गांधी पंचायत राज समितीचे समन्वयक अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष ॲड. अमर पाचपोर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, नगरसेविका वैशाली तायडे, ॲड. संदीप मानकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आजम कुरेशी, सुनील बोदडे, श्रीराम भिडे, रोशन तायडे, विजय सातव यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.1
- आषाढी एकादशीनिमित्त विदर्भाचे प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानामध्ये भाविकांचा भक्तिसागर उसळला आहे. पंढरपूरला प्रत्यक्ष जाणे शक्य न झालेल्या हजारो भाविकांनी शेगावात हजेरी लावली असून, मराठवाडा, खान्देश, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावतीसह विदर्भातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन संस्थानाने शुक्रवारी (२४ जुलै) रात्री मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. पहाटेपासूनच श्रींच्या समाधी दर्शनासाठी लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. या सोहळ्यानिमित्त संस्थानतर्फे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडा आरतीने उत्सवाला सुरुवात झाली असून त्यानंतर भजन, दुपारचे प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा आणि रात्री ८ ते १० या वेळेत श्रीहरी कीर्तन होणार आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थानने श्री समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद तसेच भक्त निवासामध्ये निवासाची विशेष सोय केली आहे. मंदिर परिसरात स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, वाहतूक नियंत्रण आणि सेवेकऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली असून अधिकारी व सेवेकरी दिवसरात्र कार्यरत आहेत. पंढरपूरप्रमाणेच शेगावातही भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा अविस्मरणीय सोहळा साकारला असून गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.1
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५–२६ अंतर्गत अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत लोहारी खुर्दची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर विभागीय स्तरावरील पाहणी प्रक्रियासुद्धा यशस्वीरित्या पार पडली असून, विभागीय पथकाने लोहारी खुर्द ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांची सविस्तर पाहणी करून सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. विभागीय स्तरावर निवड झाल्यास गट ग्रामपंचायत लोहारी खुर्दची पुढील राज्यस्तरीय फेरीसाठी निवड होणार आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर, सर्व ग्रामस्थांचे सहकार्य, विश्वास आणि विकासाचा ध्यास हेच कार्यकर्त्यांचे मुख्य बळ मानून सर्वांनी ग्रामविकासाचा ध्यास उराशी बाळगून कामाला लागावे, असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे.1
- राजीनाम्यानंतर दिल्लीच्या जंतरमंतरवर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला आहे. सरन्यायाधीशांच्या विधानावरून सुरू झालेल्या चळवळीला अखेर मोठे यश मिळाले असून, या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा लोकशाहीचा एक मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे.1
- अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात 'ऑपरेशन प्रहार'अंतर्गत मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत दारू वाहतूक उधळली आहे. या कारवाईत पोलिसांनी 500 देशी दारूचे पाऊच आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले मारुती ओमनी वाहन असा एकूण ₹1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- खरीप हंगामातील पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन अटींमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात या नव्या नियमांच्या परिणामांमुळे अपेक्षेपेक्षा कमी, म्हणजेच केवळ ६४ हजार शेतकऱ्यांनीच यंदा पीक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. या वादाचा मुख्य मुद्दा म्हणजे पीक विम्याचा अर्ज करताना शेतकऱ्यांकडून "मी कोणत्याही प्रकारचे कृषी पीक कर्ज घेतलेले नाही" या आशयाचे हमीपत्र भरून घेतले जात असल्याचा दावा केला जात आहे. दरवर्षी बँकांकडून शेतीसाठी पीक कर्ज घेणारे अनेक शेतकरी यामुळे प्रचंड संभ्रमात आहेत. भविष्यात या हमीपत्राचा आधार घेऊन विमा नाकारला जाईल का, असा भीतीचा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. या हमीपत्राबाबत शासनाने तातडीने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधीच पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असताना, अशा जाचक अटी लादून शेतकऱ्यांना योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तुपकर यांनी सरकारकडे जुनी पीक विमा योजना पूर्ववत लागू करण्याची आणि अशा अटी तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.1
- ड्रग्ज माफियांच्या विरोधात मोठी कारवाई करत २१४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान एमडी ड्रग्ज आणि स्विफ्ट कारसह आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांना मोठा धक्का बसला आहे.1