Shuru
Apke Nagar Ki App…
Varsha fuse mundgoun grampanchayat image
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image1
- खामगाव : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाचे सामूहिक वाचन अत्यंत उत्साहात पार पडले. महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. या सामूहिक वाचन कार्यक्रमाचे अध्यक्षपद वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आकाश सरदार यांनी भूषविले. यावेळी आपल्या मनोगतातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा जागर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रामुख्याने रवींद्र चेके सर (जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ),शांताराम पाटेखेडे (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी),भाऊराव उमाळे (जिल्हा संघटक),विश्वभर गवई (कायदेविषयक सल्लागार) यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला मराठा सेवा संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने मराठा सेवा संघ सुभाषराव कोल्हे (राज्य कार्यकारिणी सदस्य), संजय धोरण (जिल्हा कार्याध्यक्ष), दीपकराव जाधव या सह दादाराव हेलोडे (शहराध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), विशाखाताई सावंग (जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी), धम्मपाल नितीनवरे (माजी शहराध्यक्ष), गौतम नाईक, गौतम सुरवाडे, धम्मपाल ससाणे साहेब, गजानन हिवराळे, मनोज दहिवाल, बबलूभाई कादरी, प्रशिक उमाळे, संघपाल वाकोडे, शुभम हिवराळे, नरेंद्र तायडे, शेख हसन, आणि महेंद्र तायडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ॲड. विश्वभर गवई यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गौतम सुरवाडे यांनी मानले. या उपक्रमामुळे शहरात एक वैचारिक चैतन्य निर्माण झाले असून, अशा सामूहिक वाचनातून सामाजिक सलोखा आणि प्रबोधन होण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.1
- जिगाव सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत येत असलेल्या जलंब येथील मुख्य पाईप यार्डला काल रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत प्रकल्पासाठी ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे एचडीपीई (HDPE) पाईप जळून खाक झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, जलंब परिसरातील जिगाव प्रकल्पाच्या पाईप साठवणूक केंद्राला (यार्ड) अचानक आग लागली. वाळलेले गवत आणि प्लास्टिकच्या पाईप्समुळे आगीने अवघ्या काही मिनिटांत रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की त्या लांबूनही स्पष्ट दिसत होत्या. आगीचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मोठं आर्थिक नुकसान जिगाव प्रकल्प हा या भागातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर पाईप्सचा साठा या ठिकाणी करून ठेवण्यात आला होता. आग नेमकी कशामुळे लागली—शॉर्ट सर्किटमुळे की अन्य काही कारणामुळे—याचा तपास अद्याप सुरू आहे. मात्र, या आगीत प्रकल्पाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बचावकार्य स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. पाईप प्लास्टिकचे असल्याने आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले1
- Post by Purn borse1
- Post by Sharad Dayedar1
- मालेगाव कारंजा रोडवरील जऊ ळका गावानजीक असलेल्या रेल्वे गेट नंबर 102 वर उडान पुलाची नागरिकांची मागणी1
- बालाजी नगर सिंभोरा रोड मोर्शी येथील नागरिकांचा मतदानासाठी व टॅक्स भरण्यासाठी वापर करून घेतल्या जात आहे . परंतु मूलभूत सुविधा देखीत येथे नाही. आता त्या करिता सर्व नागरिक एक होऊन आंदोलन करणार आहेत याचे पत्र मुखमंत्री यांना देण्यात आलेले आहे1
- खामगाव : भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि ग्रामिण अर्थव्यवस्थेचा प्राण असलेल्या गोवंशाला घटनात्मक सरंक्षण मिळावे, या पवित्र उद्देशाने संपुर्ण भारतात गो सन्मान आवाहन अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज २७ एप्रिल २६ रोजी गो सन्मान दिवसानिमित्त हिंदू बांधवांच्या वतीने फरशी येथून मोर्चा काढून उपविभागीय कारल्यावर धडकला. त्यानंतर राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यापुर्वी सकल हिंदू समाजाच्या वतीने सकाळी ११ वाजता श्री हनुमान मंदिर फरशी येथुन भव्य प्रार्थना मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या कार्यालयावर धडकला. यावेळी महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी महसुल यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमुद केल्यानुसार अखिल भारतीय वेदलक्षणा गोवंशाला राष्ट्रमाता किंवा राष्ट्रआराध्या दर्जा प्रदान करण्यात यावा. व गोवंशाच्या संवर्धनासाठी स्वतंत्र केंद्रीय गौसेवा मंत्रालय स्थापन करून एकात्मिक केंद्रीय गौसेवा आणि सरंक्षण कायदा लागु करावा. तसेच गोवंश तस्करी व वध अजामीनपात्र गुन्हा ठरवुन आजीवन कारावासासारख्या कठोर शिक्षेची तरतुद करावी, गो-आधारीत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे. शालेय अभ्यासक्रमात गो-विज्ञान अनिवार्य करावे, आदि मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात विविध फलके समाज बांधवांनी हातात घेतले होते. व गोमतेचा जयघोष करीत होते.यावेळी सकल हिंदू समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. तर महामहिम राष्ट्रपती यांना पाठविलेल्या निवेदनावर जवळपास २० हजार गोमाता प्रेर्मीच्या सह्या आहेत.1