logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगाव येथे 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाचे सामूहिक वाचन संपन्न ​पुरोगामी विचारांच्या जागरानिमित्त वंचित बहुजन आघाडी व मराठा सेवा संघाचा पुढाकार ​ खामगाव : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाचे सामूहिक वाचन अत्यंत उत्साहात पार पडले. महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. ​​या सामूहिक वाचन कार्यक्रमाचे अध्यक्षपद वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आकाश सरदार यांनी भूषविले. यावेळी आपल्या मनोगतातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा जागर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ​याप्रसंगी प्रामुख्याने रवींद्र चेके सर (जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ),​शांताराम पाटेखेडे (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी),​भाऊराव उमाळे (जिल्हा संघटक),​विश्वभर गवई (कायदेविषयक सल्लागार) यांनी आपले विचार मांडले. ​कार्यक्रमाला मराठा सेवा संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने ​मराठा सेवा संघ सुभाषराव कोल्हे (राज्य कार्यकारिणी सदस्य), संजय धोरण (जिल्हा कार्याध्यक्ष), दीपकराव जाधव या सह दादाराव हेलोडे (शहराध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), विशाखाताई सावंग (जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी), धम्मपाल नितीनवरे (माजी शहराध्यक्ष), गौतम नाईक, गौतम सुरवाडे, धम्मपाल ससाणे साहेब, गजानन हिवराळे, मनोज दहिवाल, बबलूभाई कादरी, प्रशिक उमाळे, संघपाल वाकोडे, शुभम हिवराळे, नरेंद्र तायडे, शेख हसन, आणि महेंद्र तायडे यांची उपस्थिती होती. ​सूत्रसंचालन व आभार ​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ॲड. विश्वभर गवई यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गौतम सुरवाडे यांनी मानले. या उपक्रमामुळे शहरात एक वैचारिक चैतन्य निर्माण झाले असून, अशा सामूहिक वाचनातून सामाजिक सलोखा आणि प्रबोधन होण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

2 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
2 hrs ago

खामगाव येथे 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाचे सामूहिक वाचन संपन्न ​पुरोगामी विचारांच्या जागरानिमित्त वंचित बहुजन आघाडी व मराठा सेवा संघाचा पुढाकार ​ खामगाव : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाचे सामूहिक वाचन अत्यंत उत्साहात पार पडले. महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. ​​या सामूहिक वाचन कार्यक्रमाचे अध्यक्षपद वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आकाश सरदार यांनी भूषविले. यावेळी आपल्या मनोगतातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा जागर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ​याप्रसंगी प्रामुख्याने रवींद्र चेके सर (जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ),​शांताराम पाटेखेडे (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी),​भाऊराव उमाळे (जिल्हा संघटक),​विश्वभर गवई (कायदेविषयक सल्लागार) यांनी आपले विचार मांडले. ​कार्यक्रमाला मराठा सेवा संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने ​मराठा सेवा संघ सुभाषराव कोल्हे (राज्य कार्यकारिणी सदस्य), संजय धोरण (जिल्हा कार्याध्यक्ष), दीपकराव जाधव या सह दादाराव हेलोडे (शहराध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), विशाखाताई सावंग (जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी), धम्मपाल नितीनवरे (माजी शहराध्यक्ष), गौतम नाईक, गौतम सुरवाडे, धम्मपाल ससाणे साहेब, गजानन हिवराळे, मनोज दहिवाल, बबलूभाई कादरी, प्रशिक उमाळे, संघपाल वाकोडे, शुभम हिवराळे, नरेंद्र तायडे, शेख हसन, आणि महेंद्र तायडे यांची उपस्थिती होती. ​सूत्रसंचालन व आभार ​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ॲड. विश्वभर गवई यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गौतम सुरवाडे यांनी मानले. या उपक्रमामुळे शहरात एक वैचारिक चैतन्य निर्माण झाले असून, अशा सामूहिक वाचनातून सामाजिक सलोखा आणि प्रबोधन होण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​ खामगाव : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाचे सामूहिक वाचन अत्यंत उत्साहात पार पडले. महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. ​​या सामूहिक वाचन कार्यक्रमाचे अध्यक्षपद वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आकाश सरदार यांनी भूषविले. यावेळी आपल्या मनोगतातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा जागर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ​याप्रसंगी प्रामुख्याने रवींद्र चेके सर (जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ),​शांताराम पाटेखेडे (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी),​भाऊराव उमाळे (जिल्हा संघटक),​विश्वभर गवई (कायदेविषयक सल्लागार) यांनी आपले विचार मांडले. ​कार्यक्रमाला मराठा सेवा संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने ​मराठा सेवा संघ सुभाषराव कोल्हे (राज्य कार्यकारिणी सदस्य), संजय धोरण (जिल्हा कार्याध्यक्ष), दीपकराव जाधव या सह दादाराव हेलोडे (शहराध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), विशाखाताई सावंग (जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी), धम्मपाल नितीनवरे (माजी शहराध्यक्ष), गौतम नाईक, गौतम सुरवाडे, धम्मपाल ससाणे साहेब, गजानन हिवराळे, मनोज दहिवाल, बबलूभाई कादरी, प्रशिक उमाळे, संघपाल वाकोडे, शुभम हिवराळे, नरेंद्र तायडे, शेख हसन, आणि महेंद्र तायडे यांची उपस्थिती होती. ​सूत्रसंचालन व आभार ​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ॲड. विश्वभर गवई यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गौतम सुरवाडे यांनी मानले. या उपक्रमामुळे शहरात एक वैचारिक चैतन्य निर्माण झाले असून, अशा सामूहिक वाचनातून सामाजिक सलोखा आणि प्रबोधन होण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
    1
    ​ खामगाव : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाचे सामूहिक वाचन अत्यंत उत्साहात पार पडले. महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
​​या सामूहिक वाचन कार्यक्रमाचे अध्यक्षपद वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आकाश सरदार यांनी भूषविले. यावेळी आपल्या मनोगतातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा जागर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
​याप्रसंगी प्रामुख्याने रवींद्र चेके सर (जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ),​शांताराम पाटेखेडे (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी),​भाऊराव उमाळे (जिल्हा संघटक),​विश्वभर गवई (कायदेविषयक सल्लागार) यांनी आपले विचार मांडले.
​कार्यक्रमाला मराठा सेवा संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने ​मराठा सेवा संघ सुभाषराव कोल्हे (राज्य कार्यकारिणी सदस्य), संजय धोरण (जिल्हा कार्याध्यक्ष), दीपकराव जाधव या सह दादाराव हेलोडे (शहराध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), विशाखाताई सावंग (जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी), धम्मपाल नितीनवरे (माजी शहराध्यक्ष), गौतम नाईक, गौतम सुरवाडे, धम्मपाल ससाणे साहेब, गजानन हिवराळे, मनोज दहिवाल, बबलूभाई कादरी, प्रशिक उमाळे, संघपाल वाकोडे, शुभम हिवराळे, नरेंद्र तायडे, शेख हसन, आणि महेंद्र तायडे यांची उपस्थिती होती.
​सूत्रसंचालन व आभार
​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ॲड. विश्वभर गवई यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गौतम सुरवाडे यांनी मानले. या उपक्रमामुळे शहरात एक वैचारिक चैतन्य निर्माण झाले असून, अशा सामूहिक वाचनातून सामाजिक सलोखा आणि प्रबोधन होण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जिगाव सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत येत असलेल्या जलंब येथील मुख्य पाईप यार्डला काल रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत प्रकल्पासाठी ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे एचडीपीई (HDPE) पाईप जळून खाक झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, जलंब परिसरातील जिगाव प्रकल्पाच्या पाईप साठवणूक केंद्राला (यार्ड) अचानक आग लागली. वाळलेले गवत आणि प्लास्टिकच्या पाईप्समुळे आगीने अवघ्या काही मिनिटांत रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की त्या लांबूनही स्पष्ट दिसत होत्या. आगीचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ​मोठं आर्थिक नुकसान ​जिगाव प्रकल्प हा या भागातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर पाईप्सचा साठा या ठिकाणी करून ठेवण्यात आला होता. आग नेमकी कशामुळे लागली—शॉर्ट सर्किटमुळे की अन्य काही कारणामुळे—याचा तपास अद्याप सुरू आहे. मात्र, या आगीत प्रकल्पाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ​बचावकार्य ​स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. पाईप प्लास्टिकचे असल्याने आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले
    1
    जिगाव सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत येत असलेल्या जलंब येथील मुख्य पाईप यार्डला काल रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत प्रकल्पासाठी ठेवलेले कोट्यवधी रुपयांचे एचडीपीई (HDPE) पाईप जळून खाक झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, जलंब परिसरातील जिगाव प्रकल्पाच्या पाईप साठवणूक केंद्राला (यार्ड) अचानक आग लागली. वाळलेले गवत आणि प्लास्टिकच्या पाईप्समुळे आगीने अवघ्या काही मिनिटांत रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की त्या लांबूनही स्पष्ट दिसत होत्या. आगीचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
​मोठं आर्थिक नुकसान
​जिगाव प्रकल्प हा या भागातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर पाईप्सचा साठा या ठिकाणी करून ठेवण्यात आला होता. आग नेमकी कशामुळे लागली—शॉर्ट सर्किटमुळे की अन्य काही कारणामुळे—याचा तपास अद्याप सुरू आहे. मात्र, या आगीत प्रकल्पाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
​बचावकार्य
​स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. पाईप प्लास्टिकचे असल्याने आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले
    user_Siddheshwar
    Siddheshwar
    खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जळगाव जामोद हादरले: राजुरा प्रकल्पा जवळ अज्ञात महिलेचा शिरच्छेद करून मृतदेह अर्धवट जाळला.. ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन...
    1
    जळगाव जामोद हादरले: राजुरा प्रकल्पा जवळ अज्ञात महिलेचा शिरच्छेद करून मृतदेह अर्धवट जाळला.. ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन...
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास' असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हरणखेड ते मलकापूर मार्ग, जिल्हा बुलढाणामलकापूर आगाराची एक बस हनवतखेडवरून प्रवाशांना घेऊन परत येत होती. बस पूर्ण वेगात असताना अचानक चालकाच्या बाजूचे किंवा मागील बाजूचे चाक निखळून बाहेर पडले.धावत्या बसचे चाक निखळल्याचे लक्षात येताच, बसचालकाने अत्यंत संयमाने आणि कौशल्याने बस रस्त्याच्या कडेला नियंत्रित करून थांबवली. चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे बस उलटली नाही किंवा मोठा अपघात झाला नाही.सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेमुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत एसटीच्या ताफ्यात नादुरुस्त आणि भंगार बसेसची संख्या वाढत आहे का? बस डेपोमध्ये गाड्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स (देखभाल) केले जात नाही का? प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ कधीपर्यंत सुरू राहणार? निष्कर्ष: बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेने एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जुन्या बसेसची दुरुस्ती करावी किंवा नवीन बसेस ताफ्यात सामील कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
    1
    सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास' असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका धावत्या एसटी बसचे चाक निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हरणखेड ते मलकापूर मार्ग, जिल्हा बुलढाणामलकापूर आगाराची एक बस हनवतखेडवरून प्रवाशांना घेऊन परत येत होती. बस पूर्ण वेगात असताना अचानक चालकाच्या बाजूचे किंवा मागील बाजूचे चाक निखळून बाहेर पडले.धावत्या बसचे चाक निखळल्याचे लक्षात येताच, बसचालकाने अत्यंत संयमाने आणि कौशल्याने बस रस्त्याच्या कडेला नियंत्रित करून थांबवली. चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे बस उलटली नाही किंवा मोठा अपघात झाला नाही.सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेमुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत
एसटीच्या ताफ्यात नादुरुस्त आणि भंगार बसेसची संख्या वाढत आहे का?
बस डेपोमध्ये गाड्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स (देखभाल) केले जात नाही का?
प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ कधीपर्यंत सुरू राहणार?
निष्कर्ष:
बुलढाणा जिल्ह्यातील या घटनेने एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जुन्या बसेसची दुरुस्ती करावी किंवा नवीन बसेस ताफ्यात सामील कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • चिखली तालुक्यातील धोत्रा . भंनगोजी येथे. दगडूबा शिंदे यांच्या घराला, रात्री आग,, लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवित हानी टळली,
    1
    चिखली तालुक्यातील धोत्रा . भंनगोजी येथे. दगडूबा शिंदे यांच्या घराला, रात्री आग,, लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवित हानी टळली,
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image
    1
    Post by Varsha fuse mundgoun grampanchayat image
    user_Varsha fuse mundgoun grampanchayat image
    Varsha fuse mundgoun grampanchayat image
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भोकरदन या ठिकाणी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यात भजन आणि ओव्या गात मागणी केली आहे
    1
    भोकरदन या ठिकाणी आज वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज पोलीस ठाण्यात भजन आणि ओव्या गात मागणी केली आहे
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • खामगाव : भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि ग्रामिण अर्थव्यवस्थेचा प्राण असलेल्या गोवंशाला घटनात्मक सरंक्षण मिळावे, या पवित्र उद्देशाने संपुर्ण भारतात गो सन्मान आवाहन अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज २७ एप्रिल २६ रोजी गो सन्मान दिवसानिमित्त हिंदू बांधवांच्या वतीने फरशी येथून मोर्चा काढून उपविभागीय कारल्यावर धडकला. त्यानंतर राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यापुर्वी सकल हिंदू समाजाच्या वतीने सकाळी ११ वाजता श्री हनुमान मंदिर फरशी येथुन भव्य प्रार्थना मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या कार्यालयावर धडकला. यावेळी महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी महसुल यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमुद केल्यानुसार अखिल भारतीय वेदलक्षणा गोवंशाला राष्ट्रमाता किंवा राष्ट्रआराध्या दर्जा प्रदान करण्यात यावा. व गोवंशाच्या संवर्धनासाठी स्वतंत्र केंद्रीय गौसेवा मंत्रालय स्थापन करून एकात्मिक केंद्रीय गौसेवा आणि सरंक्षण कायदा लागु करावा. तसेच गोवंश तस्करी व वध अजामीनपात्र गुन्हा ठरवुन आजीवन कारावासासारख्या कठोर शिक्षेची तरतुद करावी, गो-आधारीत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे. शालेय अभ्यासक्रमात गो-विज्ञान अनिवार्य करावे, आदि मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात विविध फलके समाज बांधवांनी हातात घेतले होते. व गोमतेचा जयघोष करीत होते.यावेळी सकल हिंदू समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. तर महामहिम राष्ट्रपती यांना पाठविलेल्या निवेदनावर जवळपास २० हजार गोमाता प्रेर्मीच्या सह्या आहेत.
    1
    खामगाव :  भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि ग्रामिण अर्थव्यवस्थेचा प्राण असलेल्या गोवंशाला घटनात्मक सरंक्षण मिळावे, या पवित्र उद्देशाने संपुर्ण भारतात गो सन्मान आवाहन अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज २७ एप्रिल २६ रोजी गो सन्मान दिवसानिमित्त हिंदू बांधवांच्या वतीने फरशी येथून मोर्चा काढून उपविभागीय कारल्यावर धडकला. त्यानंतर राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यापुर्वी सकल हिंदू समाजाच्या वतीने सकाळी ११ वाजता श्री हनुमान मंदिर फरशी येथुन भव्य प्रार्थना मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या कार्यालयावर धडकला. यावेळी महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी महसुल यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमुद केल्यानुसार अखिल भारतीय वेदलक्षणा गोवंशाला राष्ट्रमाता किंवा राष्ट्रआराध्या दर्जा प्रदान करण्यात यावा. व गोवंशाच्या संवर्धनासाठी स्वतंत्र केंद्रीय गौसेवा मंत्रालय स्थापन करून एकात्मिक केंद्रीय गौसेवा आणि सरंक्षण कायदा लागु करावा. तसेच गोवंश तस्करी व वध अजामीनपात्र गुन्हा ठरवुन आजीवन कारावासासारख्या कठोर शिक्षेची तरतुद करावी, गो-आधारीत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे. शालेय अभ्यासक्रमात गो-विज्ञान अनिवार्य करावे, आदि मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात विविध फलके समाज बांधवांनी हातात घेतले होते. व गोमतेचा जयघोष करीत होते.यावेळी सकल हिंदू समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. तर महामहिम राष्ट्रपती यांना पाठविलेल्या निवेदनावर जवळपास २० हजार गोमाता प्रेर्मीच्या सह्या आहेत.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.