गो सन्मान आवाहन अभियान अंतर्गत भव्य प्रार्थना मोर्चा सकल हिंदू समाजाच्या वतीने राष्ट्रपती यांना निवेदन निवेदनावर २० हजार गोमाता प्रेमींच्या सह्या खामगाव : भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि ग्रामिण अर्थव्यवस्थेचा प्राण असलेल्या गोवंशाला घटनात्मक सरंक्षण मिळावे, या पवित्र उद्देशाने संपुर्ण भारतात गो सन्मान आवाहन अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज २७ एप्रिल २६ रोजी गो सन्मान दिवसानिमित्त हिंदू बांधवांच्या वतीने फरशी येथून मोर्चा काढून उपविभागीय कारल्यावर धडकला. त्यानंतर राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यापुर्वी सकल हिंदू समाजाच्या वतीने सकाळी ११ वाजता श्री हनुमान मंदिर फरशी येथुन भव्य प्रार्थना मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या कार्यालयावर धडकला. यावेळी महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी महसुल यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमुद केल्यानुसार अखिल भारतीय वेदलक्षणा गोवंशाला राष्ट्रमाता किंवा राष्ट्रआराध्या दर्जा प्रदान करण्यात यावा. व गोवंशाच्या संवर्धनासाठी स्वतंत्र केंद्रीय गौसेवा मंत्रालय स्थापन करून एकात्मिक केंद्रीय गौसेवा आणि सरंक्षण कायदा लागु करावा. तसेच गोवंश तस्करी व वध अजामीनपात्र गुन्हा ठरवुन आजीवन कारावासासारख्या कठोर शिक्षेची तरतुद करावी, गो-आधारीत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे. शालेय अभ्यासक्रमात गो-विज्ञान अनिवार्य करावे, आदि मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात विविध फलके समाज बांधवांनी हातात घेतले होते. व गोमतेचा जयघोष करीत होते.यावेळी सकल हिंदू समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. तर महामहिम राष्ट्रपती यांना पाठविलेल्या निवेदनावर जवळपास २० हजार गोमाता प्रेर्मीच्या सह्या आहेत.

- Post by Jansagar 9 Marathi1
- भगवंत महोत्सवात डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशनचा सेवाभाव: भाविकांच्या मोफत पाणी वाटप1
- Madrasa Issue: Owaisi vs Himanta Biswa Sarma 🔥 Tez Rajneetik Takkar!1
- चाळीसगाव घाटात मृत्यूचा थरार! झाड धावून आले म्हणून 'ते' वाचले; प्रशासन झोपलेय की मेलेय? प्रतिनिधी: गौतम हिवराळे रविवार, २६ एप्रिल २०२६ चाळीसगाव-कन्नड घाट: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! रविवारी मध्यरात्री चाळीसगाव घाटातील त्या 'खुनी' वळणाने पुन्हा एकदा एका कुटुंबाचा घास घेण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगातील कार १०० फूट खोल दरीत झेपावली, मृत्यू समोर उभा होता, पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. एका झाडाने या कारला आपल्या बाहूत घेतले आणि मृत्यूला हुलकावणी देत पाच प्रवाशांचे प्राण वाचले. पण या घटनेनंतर आता संतापाचा वणवा पेटला आहे—हा अपघात होता की प्रशासनाने रचलेला मृत्यूचा सापळा? १. कठड्यांचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात? घाटातील संरक्षक कठडे हे प्रवाशांच्या रक्षणासाठी आहेत की निव्वळ ठेकेदारांची घरे भरण्यासाठी? कार आदळताच हे कठडे पत्त्यांसारखे का कोसळले? २. प्रशासनाला अजून किती बळी हवेत? नऊ नंबरचे वळण 'डेथ झोन' झाले असताना तिथे कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत? प्रत्येक अपघातानंतर फक्त पंचनामा करून प्रशासन हात झटकणार का? ३. रात्रीचा प्रवास म्हणजे आत्महत्याच का? घाटात ना विजेचे दिवे, ना रेडियमचे चमकणारे फलक. डोळ्यांना पट्टी बांधून प्रवाशांनी प्रवास करायचा का? ४. मदतकार्य की नशिबाचा खेळ? घाटात मोबाईल रेंज नाही, सीसीटीव्ही नाहीत. जर त्या झाडाने कार अडकवली नसती आणि सकाळी कुणाला गाडी दिसलीच नसती, तर त्या मृतदेहांचा शोध तरी लागला असता का? घटनेचा थरार: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ती काळरात्र. वैजापूर येथील हे प्रवासी आपल्या कारने कन्नडहून चाळीसगावच्या दिशेने येत होते. मध्यरात्रीचा सुमार, घाटातील ते जीवघेणे 'नऊ नंबर'चे वळण आणि अचानक चालकाचा ताबा सुटला. कारने संरक्षक कठडा अक्षरशः उडवला आणि थेट दरीत झेप घेतली. क्षणभर वाटले की आता सर्व संपले! पण १०० फुटांवर असलेल्या एका वटवृक्षाने 'देवदूत' बनून कारला अडकवले. मृत्यूच्या दाढेतून सुटका: कार झाडात अडकल्यामुळे झालेल्या आवाजाने घाटातील इतर प्रवाशांचे लक्ष गेले. तातडीने रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी दोरखंडाच्या साहाय्याने दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. कारचा चक्काचूर झाला आहे, पण प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत बचावले आहेत. सध्या त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळजळीत वास्तव: आता तरी जागे व्हा! हा केवळ अपघात नाही, तर यंत्रणेच्या नाकर्तेपणाचा पुरावा आहे. आज झाड वाचवायला आले, उद्या प्रत्येक वेळी झाड नसेल! सार्वजनिक बांधकाम विभागाने या 'ब्लॅक स्पॉट'वर तातडीने कडक कारवाई न केल्यास, संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. "आज झाड होते म्हणून जीव वाचले, उद्या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कुणाचा संसार उघड्यावर पडला, तर त्याला जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभाग की टोल घेणारी यंत्रणा?" 1
- मालेगाव कारंजा रोडवरील जऊ ळका गावानजीक असलेल्या रेल्वे गेट नंबर 102 वर उडान पुलाची नागरिकांची मागणी1
- *भुवन रेती घाटावर अवैध उपसा जोमात; ठेकेदार–महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा आरोप* (एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक, कोऱ्या पावत्या आढळल्याने लाखो रुपयांच्या महसूल घोटाळ्याची शक्यता) मंठा तालुक्यातील भुवन येथील रेती घाटावर अवैध रेती उपसा जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अधिकृत लिलावधारकाच्या ताब्यात घाट देण्यात आला असला तरी, महसूल कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याची चर्चा आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, एकाच रॉयल्टी पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारल्या जात आहेत. दोन ब्रासच्या पावतीवर चार ब्रासची गाडी, तर चार ब्रासच्या पावतीवर सहा ब्रासपर्यंत वाळू भरली जात असल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक पावत्यांवर तारीख, वेळ आणि ब्रासची नोंदच नसून काही पावत्या कोऱ्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.1
- Post by Shivaji Bhosale1
- Ek Hi Mard Nazar Aa Raha’ 🤣 — Owaisi ka viral savage moment 🔥1
- विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये मागील एक महिन्यापासून रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. हा उपक्रम सायन्स किड्झ मुंबई अॅकॅडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन (प्रशिक्षक) रवी गुप्ता यांनी केले,जे सध्या अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांनी तेथील प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊन, येथील विद्यार्थ्यांना आधुनिक रोबोटिक्स आणि AI विषयी सखोल मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः काही नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार केले, जसे की स्मार्ट फूड बॉक्स फॉर नॉन-प्रिव्हिलेज्ड पीपल हा प्रकल्प गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यामुळे अन्नाची नासाडी कमी होऊन गरजूंना मदत मिळू शकते.शेतकऱ्यांसाठी ऑटोमॅटिक वेदर सिस्टीम या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती आणि अलर्ट मिळू शकतात,ज्यामुळे ते आपल्या पिकांची योग्य काळजी घेऊ शकतात.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे हा होता. आजच्या युगात रोबोटिक्स आणि AI हे केवळ विषय नसून भविष्यातील तंत्रज्ञानाची पायाभरणी आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,तार्किक विचारशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पनांची आवड विकसित झाली आहे.विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील हा उपक्रम लहान शहरांतील विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. खरंच,आजचे हे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक,अभियंते आणि नवोन्मेषक बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची आज सांगता करण्यात आली. हा उपक्रम शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री. संदीप दादा बाहेकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. रश्मी यादव मॅडम, (प्रशिक्षक) रवी गुप्ता सर,राठोड सर,सर्व शिक्षक वृंद,तसेच पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाहेकर सर व यादव मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर उपक्रमाचे मार्गदर्शक रवी गुप्ता सर यांना श्रीफळ,शाल,गुच्छ देऊन,सन्मानित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रकल्पाची पाहणी बाहेकर सर यादव मॅडम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी शाळेचे अध्यक्ष बाहेकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम शाळेमार्फत राबवली जातील. असे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले.तसेच शाळेचे विद्यार्थी भविष्यात प्रकल्पाच्या माध्यमातून, योग्य प्रशिक्षण घेऊन,देश विदेशात गरुड झेप घेतील.अशी आशा व्यक्त केली. या प्रकल्पाचे पंचक्रोशीसह इतर सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. शाळेने असे उत्कृष्ट उपक्रम यापुढेही विद्यार्थ्यांसाठी राबवावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.1