logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भोरच्या स्काऊट गाईड राज्य प्रशिक्षण केंद्र येथे निवासी शिबिर संपन्न विद्यार्थांनी लुटला निसर्ग निवास शिबिराचा आनंद ; ७४ विद्यार्थांसह शिक्षक सहभागी विक्रम शिंदे /भोर दि.२४ भोर - शिरवळ मार्गावरील राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग येथे स्काऊट गाईड विद्यार्थांचे निसर्ग निवास शालेय प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले.भोर भोलावडे (ता.भोर )येथील राजा रघुनाथराव विद्यालयातील इयत्ता सहावी आणि सातवीच्या स्काऊट गाईड विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये एकूण ७४ स्काऊट गाईड विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.यावेळी शिबिरार्थीना स्काऊट गाईडचे वचन ,नियम, ध्येय , दोरीच्या विविध गाठी,गॅझेटचे विविध प्रकार तसेच बँडेज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बिनविस्तवाचे विविध पदार्थ तयार करून त्याचा आस्वाद घेतला. शेकोटीच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.स्काऊट मास्टर वंदना किरवे , सिद्धनाथ पर्वते ,संजय खरमरे,कृष्णा तामकर यांनी मार्गदर्शन केले.नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,उपाध्यक्ष अँड.मुकुंद तांबेकर ,सचिव डॉ. सुरेश गोरेगावकर, मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे यांनी सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.

2 hrs ago
user_पत्रकार विक्रम शिंदे
पत्रकार विक्रम शिंदे
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

भोरच्या स्काऊट गाईड राज्य प्रशिक्षण केंद्र येथे निवासी शिबिर संपन्न विद्यार्थांनी लुटला निसर्ग निवास शिबिराचा आनंद ; ७४ विद्यार्थांसह शिक्षक सहभागी विक्रम शिंदे /भोर दि.२४ भोर - शिरवळ मार्गावरील राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग येथे स्काऊट गाईड विद्यार्थांचे निसर्ग निवास शालेय प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले.भोर भोलावडे (ता.भोर )येथील राजा रघुनाथराव विद्यालयातील इयत्ता सहावी आणि सातवीच्या स्काऊट गाईड विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये एकूण ७४ स्काऊट गाईड विद्यार्थांनी सहभाग घेतला

0f0f3c4b-d4f2-4b10-abff-f06b61f94cd2

होता.यावेळी शिबिरार्थीना स्काऊट गाईडचे वचन ,नियम, ध्येय , दोरीच्या विविध गाठी,गॅझेटचे विविध प्रकार तसेच बँडेज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बिनविस्तवाचे विविध पदार्थ तयार करून त्याचा आस्वाद घेतला. शेकोटीच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.स्काऊट मास्टर वंदना किरवे , सिद्धनाथ पर्वते ,संजय खरमरे,कृष्णा तामकर यांनी मार्गदर्शन केले.नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,उपाध्यक्ष अँड.मुकुंद तांबेकर ,सचिव डॉ. सुरेश गोरेगावकर, मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे यांनी सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विद्यार्थांनी लुटला निसर्ग निवास शिबिराचा आनंद ; ७४ विद्यार्थांसह शिक्षक सहभागी विक्रम शिंदे /भोर दि.२४ भोर - शिरवळ मार्गावरील राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग येथे स्काऊट गाईड विद्यार्थांचे निसर्ग निवास शालेय प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले.भोर भोलावडे (ता.भोर )येथील राजा रघुनाथराव विद्यालयातील इयत्ता सहावी आणि सातवीच्या स्काऊट गाईड विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये एकूण ७४ स्काऊट गाईड विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.यावेळी शिबिरार्थीना स्काऊट गाईडचे वचन ,नियम, ध्येय , दोरीच्या विविध गाठी,गॅझेटचे विविध प्रकार तसेच बँडेज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बिनविस्तवाचे विविध पदार्थ तयार करून त्याचा आस्वाद घेतला. शेकोटीच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.स्काऊट मास्टर वंदना किरवे , सिद्धनाथ पर्वते ,संजय खरमरे,कृष्णा तामकर यांनी मार्गदर्शन केले.नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,उपाध्यक्ष अँड.मुकुंद तांबेकर ,सचिव डॉ. सुरेश गोरेगावकर, मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे यांनी सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
    2
    विद्यार्थांनी लुटला निसर्ग निवास शिबिराचा आनंद ; ७४ विद्यार्थांसह शिक्षक सहभागी 
विक्रम शिंदे /भोर दि.२४
भोर - शिरवळ मार्गावरील राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग येथे स्काऊट गाईड विद्यार्थांचे निसर्ग निवास शालेय प्रशिक्षण शिबिर नुकतेच  पार पडले.भोर भोलावडे (ता.भोर )येथील राजा रघुनाथराव विद्यालयातील इयत्ता सहावी आणि  सातवीच्या स्काऊट  गाईड विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये एकूण ७४ स्काऊट गाईड विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.यावेळी शिबिरार्थीना स्काऊट गाईडचे वचन ,नियम, ध्येय , दोरीच्या विविध गाठी,गॅझेटचे विविध प्रकार तसेच बँडेज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बिनविस्तवाचे विविध पदार्थ तयार करून त्याचा आस्वाद घेतला. शेकोटीच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.स्काऊट मास्टर  वंदना किरवे , सिद्धनाथ पर्वते ,संजय  खरमरे,कृष्णा तामकर यांनी मार्गदर्शन केले.नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,उपाध्यक्ष अँड.मुकुंद तांबेकर ,सचिव डॉ. सुरेश गोरेगावकर, मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे यांनी सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे  अभिनंदन केले.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    1
    Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सातारा रोड रांका ज्वेलर्स चौकात पोलीस रात्री दहा वाजेपर्यंत थांबावे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी खूप मोठा प्रमाणात वाढली आहे. नातूबाग बस स्टॉप बीआरटी रस्ता बंद केले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्याच चौकात मध्ये खाजगी बस Uturn मारत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
    1
    सातारा रोड रांका ज्वेलर्स चौकात पोलीस रात्री दहा वाजेपर्यंत थांबावे.
मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी खूप मोठा प्रमाणात वाढली आहे.
नातूबाग बस स्टॉप बीआरटी रस्ता बंद केले आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
त्याच चौकात मध्ये खाजगी बस Uturn मारत आहे.
त्यामुळे अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
    user_Vibhav Salkar
    Vibhav Salkar
    City Star पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Pune RTO Action: रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या निवेदनाची दखल; १०० खासगी बसांवर कारवाई, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दणका पुणे : शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) सुमारे १०० खासगी बसांवर दंडात्मक कारवाई केली आहे. रुग्ण हक्क संघर्ष समिती, महाराष्ट्र पुणे यांच्या निवेदनाची दखल घेत ही मोहीम राबविण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून, रेल्वे आणि एसटीसोबतच खासगी ट्रॅव्हल्सकडे मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गांवर धावणाऱ्या खासगी बसांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. रुग्ण हक्क संघर्ष समितीचे संस्थापक प्रमुख डॉ. विश्वासराव पंडित आणि प्रदेशाध्यक्ष संजय बवळेकर यांनी दिनांक १३/०३/२०२६ रोजी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनात पुणे शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. निवेदनात असे नमूद करण्यात आले की, काही वाहन वितरकांकडून नवीन वाहने नोंदणी न करता थेट ग्राहकांच्या ताब्यात दिली जात आहेत. तसेच बाहेरील राज्यातील नोंदणी असलेल्या वाहनांद्वारे (ट्रॅव्हल्स) पुणे शहर व जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. या प्रकरणात Dhone Automobile Pune यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली होती. संबंधित प्रकरणात २०१६ मध्ये वाहन नोंदणी न करता ग्राहकाला वाहन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली होती. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे – ४११००१) यांनी दिनांक २०/०४/२०२६ रोजी आदेश काढत संबंधित प्रकरणात तपासणी करून दोषी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले. या आदेशानुसार, पुणे शहर व जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बाहेरील राज्यातील नोंदणी असलेल्या ट्रॅव्हल्स वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १०० खासगी बसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईमुळे खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायात खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच संबंधित वाहन वितरक आणि नियम मोडणाऱ्या घटकांवरही कारवाई करण्याची मागणी रुग्ण हक्क संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी RTOची ही मोहीम महत्त्वाची ठरत असून, नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
    1
    Pune RTO Action: रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या निवेदनाची दखल; १०० खासगी बसांवर कारवाई, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दणका
पुणे : शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) सुमारे १०० खासगी बसांवर दंडात्मक कारवाई केली आहे. रुग्ण हक्क संघर्ष समिती, महाराष्ट्र पुणे यांच्या निवेदनाची दखल घेत ही मोहीम राबविण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे.
शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून, रेल्वे आणि एसटीसोबतच खासगी ट्रॅव्हल्सकडे मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गांवर धावणाऱ्या खासगी बसांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
रुग्ण हक्क संघर्ष समितीचे संस्थापक प्रमुख डॉ. विश्वासराव पंडित आणि प्रदेशाध्यक्ष संजय बवळेकर यांनी दिनांक १३/०३/२०२६ रोजी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनात पुणे शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
निवेदनात असे नमूद करण्यात आले की, काही वाहन वितरकांकडून नवीन वाहने नोंदणी न करता थेट ग्राहकांच्या ताब्यात दिली जात आहेत. तसेच बाहेरील राज्यातील नोंदणी असलेल्या वाहनांद्वारे (ट्रॅव्हल्स) पुणे शहर व जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. या प्रकरणात Dhone Automobile Pune यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली होती. संबंधित प्रकरणात २०१६ मध्ये वाहन नोंदणी न करता ग्राहकाला वाहन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली होती.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे – ४११००१) यांनी दिनांक २०/०४/२०२६ रोजी आदेश काढत संबंधित प्रकरणात तपासणी करून दोषी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या आदेशानुसार, पुणे शहर व जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बाहेरील राज्यातील नोंदणी असलेल्या ट्रॅव्हल्स वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १०० खासगी बसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या कारवाईमुळे खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायात खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच संबंधित वाहन वितरक आणि नियम मोडणाऱ्या घटकांवरही कारवाई करण्याची मागणी रुग्ण हक्क संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी RTOची ही मोहीम महत्त्वाची ठरत असून, नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आरटीई RTE प्रवेश प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. शहराचे तापमान ४२ अंशांवर गेलेले असताना, भर उन्हात ताटकळत उभे राहूनही पालकांच्या पदरी निराशा पडत आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के अर्जांचा निपटारा झाला असून, या विलंबाबाबत राज्य शासनाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे... आकुर्डीतील कै. फकीर भाई पानसरे उर्दू शाळा आणि पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्र या दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन केंद्रांवर मिळून केवळ १,१९४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. समितीने मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दरम्यान राज्य शिक्षण विभागाने याची दखल घेतली असून, महापालिकेला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन पालकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
    2
    पिंपरी चिंचवड :-
महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आरटीई RTE प्रवेश प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. शहराचे तापमान ४२ अंशांवर गेलेले असताना, भर उन्हात ताटकळत उभे राहूनही पालकांच्या पदरी निराशा पडत आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के अर्जांचा निपटारा झाला असून, या विलंबाबाबत राज्य शासनाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे...
आकुर्डीतील कै. फकीर भाई पानसरे उर्दू शाळा आणि पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्र या दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन केंद्रांवर मिळून केवळ १,१९४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. समितीने मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दरम्यान राज्य शिक्षण विभागाने याची दखल घेतली असून, महापालिकेला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन पालकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली. “जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे. नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. “सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली.
“जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे.
नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
“सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • भोर शहरातील वाघजाईनगर मागील डोंगराला अज्ञाताने लावली आग भोर दि.२३ भोर शहराच्या दक्षिणेकडील वाघजाई नगर ,संजय नगर रहिवासी वस्ती मागील डोंगराला अज्ञाताने आज संध्याकाळी 7 च्या दरम्यान आग लावल्याचे निदर्शनास आले.तासाभरात आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग दूरवर पसरल्याने आगीत जैवविविधता धोक्यात आल्याने अनेक पशू पक्षी मृत पावल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.मात्र रहिवासी वस्ती जवळ आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून आग लावणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    1
    भोर शहरातील वाघजाईनगर  मागील डोंगराला अज्ञाताने लावली आग 
भोर दि.२३
भोर शहराच्या दक्षिणेकडील वाघजाई नगर ,संजय नगर रहिवासी वस्ती मागील डोंगराला अज्ञाताने आज संध्याकाळी 7 च्या दरम्यान आग लावल्याचे निदर्शनास आले.तासाभरात आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग दूरवर पसरल्याने आगीत जैवविविधता धोक्यात आल्याने अनेक पशू पक्षी मृत पावल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.मात्र रहिवासी वस्ती जवळ आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून आग लावणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.