logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयात विद्यार्थी व पालक यांचा सत्कार अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयात विद्यार्थी व पालक यांचा सत्कार अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट शहरातील भाऊसाहेब पोटे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत २१ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार दि.१ मे रोजी करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरीष पोटे संस्था अध्यक्ष हे लाभले होते तर प्रमुख उपस्थिती संस्था सचिव डॉ. मेघनाताई पोटे, विज्ञान अध्यपाक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर,पि.एम.पोटे,आर. ए.धांडे,संस्था संचालक अमोल तळोकार, प्राचार्य पि. बि. रावणकर, पर्यवेक्षक पि. एम. गावंडे उपस्थित होतें.या वेळी एन एम एम एस मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला.या मध्ये कु. मनस्वी कातंखेडे SBC मधून जिल्ह्यातून प्रथम तर जिल्ह्यातून दुसरी येणारी कु. तन्वी गजेंद्र गुजर,आयेश शहा, आनंदी रेळे, संस्कृती धुळे, श्रावणी ताठे आनंदी पोंदे, धनश्री खडे,खुशी थोरात,वैदही गोंडचर, स्वरुप मगर,अभय शेगोकार, प्राप्ती नाथे, मनस्वी कातखेडे, ईश्वरी भावे, अनुष्का मालठाणकर, संस्कृती भावे, आदित्य थोटे, रोहित कळमकर, कृष्णा रेळे,मंथन बिजेवार, सोहम वायरे, या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

2 hrs ago
user_राजकुमार वानखडे
राजकुमार वानखडे
News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
2 hrs ago
9076289e-6343-4083-87fe-74af45efc129

अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयात विद्यार्थी व पालक यांचा सत्कार अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयात विद्यार्थी व पालक यांचा सत्कार अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट शहरातील भाऊसाहेब पोटे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत २१ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार दि.१ मे रोजी करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरीष पोटे संस्था अध्यक्ष हे लाभले होते तर प्रमुख उपस्थिती संस्था सचिव डॉ. मेघनाताई पोटे, विज्ञान अध्यपाक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर,पि.एम.पोटे,आर. ए.धांडे,संस्था संचालक अमोल तळोकार, प्राचार्य पि.

7cef28e7-e437-4c25-8770-2cc3ac07c22a

बि. रावणकर, पर्यवेक्षक पि. एम. गावंडे उपस्थित होतें.या वेळी एन एम एम एस मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला.या मध्ये कु. मनस्वी कातंखेडे SBC मधून जिल्ह्यातून प्रथम तर जिल्ह्यातून दुसरी येणारी कु. तन्वी गजेंद्र गुजर,आयेश शहा, आनंदी रेळे, संस्कृती धुळे, श्रावणी ताठे आनंदी पोंदे, धनश्री खडे,खुशी थोरात,वैदही गोंडचर, स्वरुप मगर,अभय शेगोकार, प्राप्ती नाथे, मनस्वी कातखेडे, ईश्वरी भावे, अनुष्का मालठाणकर, संस्कृती भावे, आदित्य थोटे, रोहित कळमकर, कृष्णा रेळे,मंथन बिजेवार, सोहम वायरे, या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​खामगाव : खामगाव-शेलोडी मार्गावर काल, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची अमोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चारही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी शेलोडी रोडवरून दोन दुचाकी भरधाव वेगाने जात असताना त्यांचा एकमेकांवर ताबा सुटला आणि अमोरासमोर धडक झाली. या अपघातात इकराम गफ्फार गवळी (वय २९), शे. अदनान शे. इरफान (वय २४), मुन्ना एजाज खान (वय २९, तिघेही रा. मोठे प्लॉट, खामगाव) आणि सौरव बलदेव भारवाड (वय १८, रा. शेलोडी) हे चौघे जण गंभीर जखमी झाले.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चौघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), अकोला येथे रेफर केले आहे.
    1
    ​खामगाव :  खामगाव-शेलोडी मार्गावर काल, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची अमोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चारही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी शेलोडी रोडवरून दोन दुचाकी भरधाव वेगाने जात असताना त्यांचा एकमेकांवर ताबा सुटला आणि अमोरासमोर धडक झाली. या अपघातात इकराम गफ्फार गवळी (वय २९), शे. अदनान शे. इरफान (वय २४), मुन्ना एजाज खान (वय २९, तिघेही रा. मोठे प्लॉट, खामगाव) आणि सौरव बलदेव भारवाड (वय १८, रा. शेलोडी) हे चौघे जण गंभीर जखमी झाले.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चौघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), अकोला येथे रेफर केले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    35 min ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.
    4
    मेडशी :-
अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला  गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न  करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
    1
    बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.
पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.
    1
    महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते.
यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले.
अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    4 hrs ago
  • ​खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. ​व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.​अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. ​या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. ​या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
    1
    ​खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे.
​व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.​अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. ​या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे.  ​या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आजनगाब े सोनेगाव रर्त7 ... धन्यवाद ! आमदार साहेब आापल्या असण्या मुके आन्हाला अश्या चांगल्या व सुंदर रस्ू्या नी सुरक्षित परवास करका थे्ो या मुके आापले समस्त गवकयान क्डून मनापापून धन्यवाद
    1
    आजनगाब े सोनेगाव रर्त7 ...
धन्यवाद ! आमदार साहेब आापल्या असण्या मुके आन्हाला अश्या
चांगल्या व सुंदर रस्ू्या नी सुरक्षित परवास करका थे्ो
या मुके आापले समस्त गवकयान क्डून मनापापून धन्यवाद
    user_Alex.vii
    Alex.vii
    Farmer धामणगाव रेल्वे, अमरावती, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • बुलढाणा जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!
    1
    बुलढाणा
जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.