logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ग्रामीण भागातील युवतींच्या स्वसंरक्षणासाठी जय भवानी महाविद्यालयाचा पुढाकार ----- जयभवानी महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीचा स्तुत्य उपक्रम... ------- (पाटोदा) - जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, पाटोदा येथील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी तीन महिन्यांच्या कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर’ दि. ०१ ऑगस्ट- २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन दि. ०१ ऑगस्ट- २०२६ रोजी श्री.शिवाजीराव पंडित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, गढीचे प्राचार्य डॉ.विश्वास कदम सर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदाशिव सरकटे होते. तर प्रमुख पाहुणे व कराटे प्रशिक्षक श्री.कंकरसिंग टाक, सहाय्यक प्रशिक्षक कु.मयुरी धनंजय जाधव यांची उपस्थिती होती. या वेळी प्रा.सोमनाथ घाडगे तसेच अंतर्गत मूल्यांकन हमी कक्षाचे प्रमुख प्रा.विनोद किर्दक उपस्थित होते. अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या पीठासीन अधिकारी प्रा.ज्योती रकटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा, उद्देश व उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली. विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाची भावना निर्माण करणे, शारीरिक तंदुरुस्ती वाढविणे, आत्मविश्वास विकसित करणे तसेच संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून देणे, हा या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ.विश्वास कदम म्हणाले की, “आजच्या काळात विद्यार्थिनींनी केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असणे पुरेसे नसून त्यांच्या मध्ये आत्मसंरक्षणाची जाणीव आणि आत्मविश्वास असणेही आवश्यक आहे. कराटे प्रशिक्षणामुळे शारीरिक क्षमता, मानसिक बळ, शिस्त आणि संकटांचा सामना करण्याची तयारी विकसित होते. महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.” प्रमुख पाहुणे व कराटे प्रशिक्षक श्री.कंकरसिंग टाक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कराटे ही केवळ मार्शल आर्ट नसून आत्मसंरक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. नियमित सरावामुळे शरीराची ताकद वाढण्याबरोबरच मनाची एकाग्रता, आत्मविश्वास आणि प्रसंगावधान विकसित होते.” या वेळी त्यांनी विद्यार्थिनींना कराटेच्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.सदाशिव सरकटे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच शारीरिक व मानसिक सक्षमीकरण आवश्यक आहे. विशेषतः विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाची कौशल्ये विकसित करण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचा निश्चितच फायदा होईल. विद्यार्थिनींनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून प्रशिक्षण सातत्याने पूर्ण करावे आणि आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करावा.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अशोक देवगुडे यांनी केले, तर प्रा.डॉ.वंदन जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिबिराच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. तीन महिन्यांच्या या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना कराटेच्या विविध तंत्रांसोबतच आत्मसंरक्षण, शिस्त, एकाग्रता आणि आत्मविश्वासाचे धडे मिळणार आहेत. ----- ---_--- ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण व कौतुकास पात्र ठरत आहे. या उपक्रमामुळे महाविद्यालयाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. ---

3 hrs ago
user_शेख महेशर ताहेर (पञकार)
शेख महेशर ताहेर (पञकार)
पाटोदा, बीड, महाराष्ट्र•
3 hrs ago
0217d46d-e399-425d-b049-740e4750641f

ग्रामीण भागातील युवतींच्या स्वसंरक्षणासाठी जय भवानी महाविद्यालयाचा पुढाकार ----- जयभवानी महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीचा स्तुत्य उपक्रम... ------- (पाटोदा) - जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, पाटोदा येथील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी तीन महिन्यांच्या कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर’ दि. ०१ ऑगस्ट- २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन दि. ०१ ऑगस्ट- २०२६ रोजी श्री.शिवाजीराव पंडित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर, गढीचे प्राचार्य डॉ.विश्वास कदम सर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदाशिव सरकटे होते. तर प्रमुख पाहुणे व कराटे प्रशिक्षक श्री.कंकरसिंग टाक, सहाय्यक प्रशिक्षक कु.मयुरी धनंजय जाधव यांची उपस्थिती होती. या वेळी प्रा.सोमनाथ घाडगे तसेच अंतर्गत मूल्यांकन हमी कक्षाचे प्रमुख प्रा.विनोद किर्दक उपस्थित होते. अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या पीठासीन अधिकारी प्रा.ज्योती रकटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा, उद्देश व उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली. विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाची भावना निर्माण करणे, शारीरिक तंदुरुस्ती वाढविणे, आत्मविश्वास विकसित करणे तसेच संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून देणे, हा या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ.विश्वास कदम म्हणाले की, “आजच्या काळात विद्यार्थिनींनी केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असणे पुरेसे

74af1949-b3f3-4560-a92d-9660bfe1dca2

नसून त्यांच्या मध्ये आत्मसंरक्षणाची जाणीव आणि आत्मविश्वास असणेही आवश्यक आहे. कराटे प्रशिक्षणामुळे शारीरिक क्षमता, मानसिक बळ, शिस्त आणि संकटांचा सामना करण्याची तयारी विकसित होते. महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.” प्रमुख पाहुणे व कराटे प्रशिक्षक श्री.कंकरसिंग टाक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कराटे ही केवळ मार्शल आर्ट नसून आत्मसंरक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. नियमित सरावामुळे शरीराची ताकद वाढण्याबरोबरच मनाची एकाग्रता, आत्मविश्वास आणि प्रसंगावधान विकसित होते.” या वेळी त्यांनी विद्यार्थिनींना कराटेच्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.सदाशिव सरकटे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच शारीरिक व मानसिक सक्षमीकरण आवश्यक आहे. विशेषतः विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाची कौशल्ये विकसित करण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचा निश्चितच फायदा होईल. विद्यार्थिनींनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून प्रशिक्षण सातत्याने पूर्ण करावे आणि आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करावा.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अशोक देवगुडे यांनी केले, तर प्रा.डॉ.वंदन जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिबिराच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. तीन महिन्यांच्या या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना कराटेच्या विविध तंत्रांसोबतच आत्मसंरक्षण, शिस्त, एकाग्रता आणि आत्मविश्वासाचे धडे मिळणार आहेत. ----- ---_--- ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण व कौतुकास पात्र ठरत आहे. या उपक्रमामुळे महाविद्यालयाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. ---

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे! Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!
    1
    Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!
Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!
    user_Ramprasad Gaikwad
    Ramprasad Gaikwad
    Lawyer बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) बीड: (महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.)मुप्टा चे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. *प्रमुख मागण्या:* 1)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात. 2) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार 30 विद्यार्थ्या ऐवजी प्रति 20 विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी. 3) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत. 4) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत. 6) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा. 7) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाइन करून ऑनलाईन स्लिप वितरित कराव्यात . 8) अनुदान प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा. 9) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे , जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे ,ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या निदर्शनास बहुसंख्येने उपस्थित राहावे.
    1
    मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने 
तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव)

मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने 
तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव)
बीड: (महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.)मुप्टा चे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. 
*प्रमुख मागण्या:* 
1)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात.
2) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार 30 विद्यार्थ्या ऐवजी प्रति 20 विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी.
3) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत.
4) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 
5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत.
6) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा.
7) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाइन करून ऑनलाईन स्लिप वितरित कराव्यात .
8) अनुदान प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा.
9) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे , जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे ,ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या निदर्शनास बहुसंख्येने उपस्थित राहावे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • *‘सड़क के गड्ढे नहीं, सिस्टम का आलस भर रहे हैं’—युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल का वायरल कारनामा!* शंकरगढ़(प्रयागराज) प्रयागराज के शंकरगढ़ में जब जर्जर सड़कों से परेशान जनता और बेपरवाह तंत्र के बीच उम्मीद की कोई किरण नहीं दिख रही थी, तब एक युवा आगे आया और उसने दिखा दिया कि जनसेवा भाषणों से नहीं, कर्मों से होती है। युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल ने किसी सरकारी बजट या प्रशासनिक मंजूरी का इंतजार किए बिना, अपनी जेब से पैसे खर्च कर सड़क के खतरनाक गड्ढों को भरवाने की एक अनूठी और प्रेरणादायक पहल शुरू की है। सोशल मीडिया पर प्रभाष सिंह पटेल के इस कदम की चौतरफा तारीफ हो रही है। लोग उनकी तस्वीरों और वीडियो को शेयर करते हुए लिख रहे हैं—"नेता सिर्फ वादे करते हैं, लेकिन प्रभाष जैसे युवा बदलाव लाते हैं।" *क्या बोले स्थानीय लोग?* इस सड़क से गुजरने वाले दैनिक यात्रियों और ग्रामीणों के चेहरे पर राहत साफ देखी जा सकती है। लोगों का कहना है कि आए दिन इन गड्ढों की वजह से हादसे हो रहे थे। प्रभाष पटेल ने अपने निजी खर्च से गिट्टी और मौरंग मंगवाकर न सिर्फ सड़क को चलने लायक बनाया, बल्कि कई अनमोल जिंदगियों को हादसों से भी बचा लिया। *प्रशासन की नींद कब खुलेगी?* युवा समाजसेवी की इस सराहनीय पहल ने जहां एक तरफ जनता का दिल जीत लिया है, वहीं दूसरी तरफ संबंधित प्रशासनिक अधिकारियों की कार्यशैली पर भी बड़े सवाल खड़े कर दिए हैं। *सामूहिक प्रयास ही असली समाधान* प्रभाष सिंह पटेल की यह पहल एक बड़ा संदेश देती है: अगर समाज का हर नागरिक और प्रशासनिक अमला एक साथ मिलकर कदम उठाए, तो आमजन को सुरक्षित, सुगम और दुर्घटनामुक्त आवागमन मिल सकता है। प्रभाष पटेल का यह जज्बा आज के युवाओं के लिए एक मिसाल बन चुका है। सलाम है ऐसे जनसेवकों को, जो समाज को गड्ढों से निकालकर प्रगति की राह पर ले जाने का दम रखते हैं!
    1
    *‘सड़क के गड्ढे नहीं, सिस्टम का आलस भर रहे हैं’—युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल का वायरल कारनामा!*
शंकरगढ़(प्रयागराज) प्रयागराज के शंकरगढ़ में जब जर्जर सड़कों से परेशान जनता और बेपरवाह तंत्र के बीच उम्मीद की कोई किरण नहीं दिख रही थी, तब एक युवा आगे आया और उसने दिखा दिया कि जनसेवा भाषणों से नहीं, कर्मों से होती है। युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल ने किसी सरकारी बजट या प्रशासनिक मंजूरी का इंतजार किए बिना, अपनी जेब से पैसे खर्च कर सड़क के खतरनाक गड्ढों को भरवाने की एक अनूठी और प्रेरणादायक पहल शुरू की है।
सोशल मीडिया पर प्रभाष सिंह पटेल के इस कदम की चौतरफा तारीफ हो रही है। लोग उनकी तस्वीरों और वीडियो को शेयर करते हुए लिख रहे हैं—"नेता सिर्फ वादे करते हैं, लेकिन प्रभाष जैसे युवा बदलाव लाते हैं।"
*क्या बोले स्थानीय लोग?*
इस सड़क से गुजरने वाले दैनिक यात्रियों और ग्रामीणों के चेहरे पर राहत साफ देखी जा सकती है। लोगों का कहना है कि आए दिन इन गड्ढों की वजह से हादसे हो रहे थे। प्रभाष पटेल ने अपने निजी खर्च से गिट्टी और मौरंग मंगवाकर न सिर्फ सड़क को चलने लायक बनाया, बल्कि कई अनमोल जिंदगियों को हादसों से भी बचा लिया।
*प्रशासन की नींद कब खुलेगी?*
युवा समाजसेवी की इस सराहनीय पहल ने जहां एक तरफ जनता का दिल जीत लिया है, वहीं दूसरी तरफ संबंधित प्रशासनिक अधिकारियों की कार्यशैली पर भी बड़े सवाल खड़े कर दिए हैं।
*सामूहिक प्रयास ही असली समाधान*
प्रभाष सिंह पटेल की यह पहल एक बड़ा संदेश देती है: अगर समाज का हर नागरिक और प्रशासनिक अमला एक साथ मिलकर कदम उठाए, तो आमजन को सुरक्षित, सुगम और दुर्घटनामुक्त आवागमन मिल सकता है। प्रभाष पटेल का यह जज्बा आज के युवाओं के लिए एक मिसाल बन चुका है। सलाम है ऐसे जनसेवकों को, जो समाज को गड्ढों से निकालकर प्रगति की राह पर ले जाने का दम रखते हैं!
    user_पवन कुमार पाल पत्रकार
    पवन कुमार पाल पत्रकार
    Georai, Beed•
    20 hrs ago
  • कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले. आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा; गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...” या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न
वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले.
आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा;
गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...”
या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला.
कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.
कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    22 hrs ago
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.
    1
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली

शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Rajendra kulthe
    Rajendra kulthe
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    20 min ago
  • फुलंब्री नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रमात फुलंब्री समाचार वृत्तपत्राचे मुख्य संपादक मा, श्री, संजयजी मोरे साहेब,
    1
    फुलंब्री नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रमात फुलंब्री समाचार वृत्तपत्राचे मुख्य संपादक मा, श्री, संजयजी मोरे साहेब,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    29 min ago
  • 🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ ; महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता 🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १०० हून अधिक भारतीय नागरिक नॉट रिचेबल असल्याने भारतातील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
    1
    🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ ;   महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता
🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ 
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १००  हून अधिक भारतीय नागरिक नॉट रिचेबल असल्याने भारतातील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.