निलगाईंचा धुमाकूळ; दोन एकर सोयाबीन पीक फस्तऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याचे मोठे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे मंगरूळपीर : तालुक्यातील बोरव्हा खु. येथील शेतकरी ओमप्रकाश नारायण ठाकरे यांच्या तीन एकर शेतीपैकी दोन एकर क्षेत्रातील फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन पीक निलगाईंच्या कळपाने फस्त केल्याची घटना नुकतीच घडली. ऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर उभे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ठाकरे यांनी सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते, पेरणी, मजुरी, तणनाशक व फवारण्यांवर मोठा खर्च केला होता. वर्षभर मेहनत घेतल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी निलगाईंच्या कळपाने शेतात प्रवेश करून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे या पिकातून आता उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. उद्ध्वस्त झालेले पीक काढून शेत पुढील पिकासाठी तयार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. “एवढा खर्च करून पीक उभे केले; मात्र हातात येण्यापूर्वीच निलगाईंनी फस्त केले. आता शेतीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकरी ओमप्रकाश ठाकरे यांनी केली. निलगाई व इतर वन्यप्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. वनविभाग व प्रशासनाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
निलगाईंचा धुमाकूळ; दोन एकर सोयाबीन पीक फस्तऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याचे मोठे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे मंगरूळपीर : तालुक्यातील बोरव्हा खु. येथील शेतकरी ओमप्रकाश नारायण ठाकरे यांच्या तीन एकर शेतीपैकी दोन एकर क्षेत्रातील फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन पीक निलगाईंच्या कळपाने फस्त केल्याची घटना नुकतीच घडली. ऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर उभे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ठाकरे
यांनी सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते, पेरणी, मजुरी, तणनाशक व फवारण्यांवर मोठा खर्च केला होता. वर्षभर मेहनत घेतल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी निलगाईंच्या कळपाने शेतात प्रवेश करून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे या पिकातून आता उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. उद्ध्वस्त झालेले पीक काढून शेत पुढील पिकासाठी तयार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. “एवढा खर्च करून पीक
उभे केले; मात्र हातात येण्यापूर्वीच निलगाईंनी फस्त केले. आता शेतीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकरी ओमप्रकाश ठाकरे यांनी केली. निलगाई व इतर वन्यप्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. वनविभाग व प्रशासनाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
- वटकळी येथे जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील वटकळी या गावांमध्ये जागतिक आदिवासी दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सेनगावचे तत्कालीन गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या हस्ते बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानिमित्ताने गावातील प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाले होते. यामध्ये बंडू कोकाटे, दत्तराव आंबोरे,गजानन घुकसे गावातील माजी सरपंच देवराव शिंदे, शेषराव शिंदे,परसराम अंभोरे, गणेश डाखोरे यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांचा सत्कार1
- उमरखेड़ के चिल्ली में प्रशासन के साथ धोखाधड़ी महसूल विभाग खामोश क्यों? उमरखेड़ के चिल्ली में प्रशासन के साथ धोखाधड़ी महसूल विभाग खामोश क्यों? क्या कोई राजकीय कनेक्शन है या फिर कोई राजकीय नेता का दबाव? सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार शेख इरफान की प्रशासन से गुहार आखिर कब होगी कारवाही1
- *मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वाल कंपाऊंडच नाही* *मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वाल कंपाऊंडच नाही* अकोट तालुका प्रतिनिधी.... अकोट तालुक्या अंतर्गत येत असलेले मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला गेल्या 5ते6 वर्षापासून वाल कंपाऊंड पडून झाले मात्र अद्याप पर्यंत या शाळेतील समस्येकडे शिक्षण विभागाने अथवा मंचनपुर येथील ग्रामपंचायत ने लक्ष दिले नाही.सदर भिंती पडक्या अवस्थेत असल्याचे छायाचित्रात दिसून येते.तसेच उभी असलेली भिंत सुद्धा कोसळण्याच्या स्थितीत आहे.तरी सुद्धा प्रशासन कुठलेही दखल घेत नसल्याचे दिसून येते सदर शाळेच्या आवारा मध्ये कुत्रे माजरी व जनावरे जाऊन शाळेमध्ये घाण करीत आहेत.तसेच येथील शिक्षक सुद्धा नेहमीच घाण साफ करतात तसेच येथील शिक्षक सुद्धा या जनावरांना कंटाळले आहेत.तरीही प्रशासन कोणत्याही गोष्टीचे दखल न घेता या शाळेकडे दुर्लक्ष करत आहेत.या जिल्हा परिषद शाळेला लागूनच लहान मुलांन साठी अंगणवाडी सुद्धा असून जनावरांच्या कुत्र्या मांजरांच्या समस्याचा सामना येथील लहान मुलांना करावा लागत आहे.तसेच येथील कुत्र्याच्या पासून शालेय विद्यार्थ्यांना धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. तसेच येथील शिक्षकांनी या गोष्टीसाठी कित्येकदा पाठपुरावा केला आहे . पाठपुरावा करून सुद्धा कुठलीच दखल घेण्यात येत नसल्याने या शाळेत शिकणाऱ्या लहान लहान मुलांच्या आई, वडीलांनी ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.सदर शाळा ही मतदान केंद्र असून या शाळेला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे या शाळेला धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा या शाळेला कंपाऊंड वॉल बसविण्याची मागणी येथील विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गांनी केली आहे.4
- खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेचे 'जेल भरो' आंदोलन खामगाव : देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.शेतकरी आणि कामगारांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत 'जेल भरो' आंदोलन छेडले.यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार सर्व शेतीमालाला कायदेशीर आधारभूत हमीभाव लागू करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, केंद्र सरकारने लागू केलेल्या चारही कामगार विरोधी संहिता तात्काळ मागे घ्याव्यात,पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढते दर नियंत्रित करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा,मनरेगा अंतर्गत कामगारांना दैनिक ५०० रुपयांहून अधिक मजुरी आणि वर्षाला किमान २०० दिवस कामाची हमी मिळावी. या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आगामी काळात राज्यभर याहून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.4
- महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे तिरंगा महारॅली व जनजागृती अभियान खामगांव : स्थानिक 13 महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे वंदेमातरम राष्ट्र गाणला 150 वर्षपूर्ती निमित्त आयोजित सप्ताह निमित्त दिनांक 9 ऑगस्ट रोजी 13 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनात तिरंगा महारॅली, क्षयरोग मुक्ती व नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल आनंद जोशी यांच्या सूक्ष्म नियोजनात सकाळी साडेआठ वाजता रॅली गजानन महाराज मंदिर, जिल्हा परिषद शाळा सुटाळा खुर्द, अनिकट रोड नांदुरा रोड, बसस्थानक, नगर परिषद इमारत, रेल्वे स्थानक, पोलिस स्टेशन नांदुरा रोड 13महाराष्ट्र बटालियन या मार्गाने संपन्न झाली. रॅली दरम्यान कॅडेट्स नी नशामुक्ती तसेच क्षयरोग मुक्ती अभियानांतर्गत घोषणा दिल्या तसेच भारत माता की जय, वंदेमातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रैली ला पंचक्रोचोतील नागरिकांनी भर भरून प्रतिसाद दिला. कॅडेट्स च्या शिस्तबद्ध मार्चींग ने नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. सदर रॅलीत एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट यजुवेंद्रसिंग राजपूत, एन सी सी ऑफिसर गजानन पारधी, गणेश घोराळे, सचिन वानखेडे, सुटाळा खुर्द व वाडी ग्रामपंचायतचे प्रशासन अधिकारी कांबळे,सुभेदार तानाजी भंडलकर, सुभेदार नागोसिंग राठोड, सुभेदार रावण कुमार व समस्त पी आय स्टाफ सहभागी झाला होता.4
- रामापूर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा बिरसा मुंडांना अभिवादन, पारंपरिक नृत्याने आदिवासी संस्कृतीचा जागर रामापूर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा बिरसा मुंडांना अभिवादन, पारंपरिक नृत्याने आदिवासी संस्कृतीचा जागर अकोट तालुका प्रतिनिधी.... अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धारुळ रामापुर येथे 9ऑगस्ट हा दिवस 'विश्व जागतिक आदिवासी दिवस' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटना UNO च्या कार्यदलाने 1984 मध्ये आदिवासींच्या हक्क, कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी या दिनाची स्थापना केली. 1992 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर अकोट तालुक्यातील रामापूर येथे 'विश्व आदिवासी दिन महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल मडावी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशाच्या तालावर आदिवासी नृत्य सादर केले. नृत्य, घोषणाबाजी आणि महापुरुषांच्या विचारांनी संपूर्ण परिसरात आदिवासी एकतेचे दर्शन घडले. अध्यक्षीय भाषणात अमोल मडावी म्हणाले, "आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत आपण शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेलो पाहिजे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे." या महोत्सवासाठी यावेळी कार्यक्रमाला पत्रकार विठ्ठल येवोकार याच्या हस्ते बीरसा मुंडा याच्या फोटो चे हारार्पण व पुजन करण्यात आले.या वेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील आदिवासी बांधवानी परिश्रम घेतले त्यामध्ये कुलदीप मसराम, सुनील मसराम, विजय वरखडे, पद्मा दुरवे, संतोष मरकाम, अनिल टेकाम, अरुण दुरवे, सागर मडावी, हरीदास टेकाम, विठ्ठल वरखडे, केशवराव पुराम, विकी कोकाटे, नरेश उईके, संदीप दुरवे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. आदिवासी दिनानिमित्त रामापूर गावात एकतेचा आणि संस्कृतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.4
- ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भगवान यांच्या जटेतून साक्षात गंगा माता प्रगट होत आहे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भगवान यांच्या जटेतून साक्षात गंगा माता प्रगट होत आहे हे आमचं भाग्य आहे की महादेव मंदिर आमच्या गावांमध्ये आहे हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा हा श्रावण महिना या महिन्यांमध्ये भगवान महादेव चार महिने पूर्ण पाण्यामध्ये असतात हे पाहणे खूप कमी दिसून येत आहे आणि याच पवित्र महिन्यांमध्ये शेंदूर सनानगरीमध्ये भव्य दिव्य असा सप्ताह संपन्न होत आहे1
- निंबी मालोकर मे फायरिंग अमोल गजानन मालोकर की मौत 6 राऊंड फायरिंग होईल1