Shuru
Apke Nagar Ki App…
खादी ग्रामोद्योग चे व्हा चेअरमन समाजरत्न पुरस्काराने रोहन कदम यांचा सन्मान
Malave subhash
खादी ग्रामोद्योग चे व्हा चेअरमन समाजरत्न पुरस्काराने रोहन कदम यांचा सन्मान
More news from महाराष्ट्र and nearby areas
- #अर्थसंकल्प २०२६-२०२७ हा अर्थसंकल्प अतिशय प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासनावर आधारित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसोबतच महिला सक्षमीकरणासाठी यात लाडकी बहीण योजना, लखपती दीदी व बचत गटांसाठी उमेद मॉल यांसारख्या भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा खऱ्या अर्थाने शेतकरी, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. - डॉ. सुधा कांकरिया, सामाजिक कार्यकर्त्या, अहिल्यानगर #महाअर्थसंकल्प२०२६ #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession20261
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- ------- (प्रतिनिधी) - राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या राजमाता जिजाऊ नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने या पूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आज ही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. या कडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार दिनांक ०९ रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. या बाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या दुरावस्थेच्या या पूर्वीही बीड जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाटोदा - बीड - परभणी मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती. नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अंबेजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते. या घटनांमुळे लालपरीमधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.1
- Post by Dattatray Funde1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था राहुरी (प्रतिनिधी): राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.1
- मोहोळ :- आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मोहोळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस शहराध्यक्ष किशोरराजे पवार आणि ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष किशोर पवार म्हणाले की, मोहोळ शहरातील महिलांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि विविध क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे व प्रेरणादायी आहे. भविष्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी खंबीरपणे उभा राहील. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या राजवर्धिनी राजन घाडगे या विद्यार्थिनीने आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थित महिलांची मने जिंकली. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती घाडगे, रिल स्टार मोहिनी मस्के, नेत्र तंत्रज्ञ मंजिरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या नंदा गोरे, शिवसेना शहर महिला काँग्रेस अध्यक्षा मुक्ता खंदारे, दिक्षा मोहिते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष केरप्पा गाढवे मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष शालन मोहन पवार, किसान सेल काँग्रेस तालुकाध्यक्ष दाजी साहेब कोकाटे, संभाजी ब्रिगेडच्या चव्हाण, प्रहार संघटनेच्या अध्यक्षा अनिता बळवंतकर, कोषागार विभागातील महिला अधिकारी छबुताई वाघमोडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजा खिलारे, आशा वर्कर अर्चना सुतार, काँग्रेसच्या उपाध्यक्ष यशोदा कांबळे, तसेच करमुद्दीन पठाण, समरीन शेख, छाया पवार, कमळा माळी आदी मान्यवर महिला उपस्थित होते.2
- ------- (प्रतिनिधी) - आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश आण्णा धस यांनी नगर पंचायत आष्टी, नगर पंचायत पाटोदा व नगर पंचायत शिरूर कासार या तीन ही नगर पंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान योजने अंतर्गत शहर व वाडी-वस्त्यांवर सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजना व नळजोडणीच्या कामांची माहिती आष्टी येथे झालेल्या बैठकीत घेतली. या वेळी तीन ही नगर पंचायती अंतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, पाणीपुरवठा, नळांचे वितरण, पाण्याची टाकी, पाणी फिल्टर युनिट तसेच उपलब्ध पाणीसाठा व शहरांमध्ये सध्या मिळणारा पाणी पुरवठा या बाबत आढावा घेतला. शहरातील नागरिकांना स्वच्छ व फिल्टर झालेले पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, या करिता सुरू असलेली सर्व कामे पावसाळ्यापूर्वी गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या बाबत सविस्तर माहिती घेऊन संबंधित योजनेच्या कामाचे ठेकेदारांना सूचना केल्या. तसेच नागरिकांना पाणी पुरवठ्याबाबत कोणती ही अडचण निर्माण होऊ नये या कडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. या वेळी नगर पंचायतचे मुख्याधिकारी बाळदत्त मोरे, मुख्याधिकारी अभय जोशी, मुख्याधिकारी गणेश दहिफळे, नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर, नगराध्यक्ष जिया बेग, नगराध्यक्ष राजेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रंगनाथ अण्णा धोंडे, अभियंता बेग, अभियंता शिरसाट, अभियंता कदम तसेच तीन ही पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार व नगर पंचायतीचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.1