logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेची धडक कारवाई, ४६ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त.... पिंपरी चिंचवड :- शहराचा नियोजनबद्ध विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या विविध भागांत राबविलेल्या धडक मोहिमेत पालिकेने ४६ अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडवर हातोडा चालवला आहे... या कारवाईत एकूण ४५ हजार २८९ चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या ब, क, इ, ग आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही व्यापक कारवाई करण्यात आली. यामध्ये चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १८ मध्ये सर्वाधिक मोठी कारवाई करत सुमारे २१ हजार ७९८ चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. तसेच भोसरी, सद्गुरूनगर आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात निवासी व व्यावसायिक आरसीसी बांधकामांवर कारवाई करून ३ हजार ८११ चौरस फूट क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. चिखली येथील शेलार वस्ती परिसरातही नियमांचे उल्लंघन करून उभारलेली ८ व्यावसायिक बांधकामे पाडण्यात आली. रहाटणी आणि पिंपळे सौदागर परिसरातील विविध कॉलनींमध्येही महापालिकेच्या पथकाने तीन दिवस सातत्यपूर्ण कारवाई केली. येथील नाल्यांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करत सुमारे १५ हजार चौरस फुटांहून अधिक जागा मोकळी केली. मोशी व डुडुळगाव परिसरातही अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंते, बीट निरीक्षक आणि अतिक्रमण विरोधी पथकाने सहभाग घेतला. जेसीबी, ट्रॅक्टर ब्रेकर यांसारख्या यंत्रसामग्रीसह पोलीस आणि एमएसएफ जवानांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. शहरात यापुढेही अनधिकृत बांधकामांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर मोहीम सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे....

7 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
7 hrs ago

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेची धडक कारवाई, ४६ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त.... पिंपरी चिंचवड :- शहराचा नियोजनबद्ध विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या विविध भागांत राबविलेल्या धडक मोहिमेत पालिकेने ४६ अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडवर हातोडा चालवला आहे... या कारवाईत एकूण ४५ हजार २८९ चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या ब, क, इ, ग आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही व्यापक कारवाई करण्यात आली. यामध्ये चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १८ मध्ये सर्वाधिक मोठी कारवाई करत सुमारे २१ हजार ७९८ चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. तसेच भोसरी, सद्गुरूनगर आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात निवासी व व्यावसायिक आरसीसी बांधकामांवर कारवाई करून ३ हजार ८११ चौरस फूट क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. चिखली येथील शेलार वस्ती परिसरातही नियमांचे उल्लंघन करून उभारलेली ८ व्यावसायिक बांधकामे पाडण्यात आली. रहाटणी आणि पिंपळे सौदागर परिसरातील विविध कॉलनींमध्येही महापालिकेच्या पथकाने तीन दिवस सातत्यपूर्ण कारवाई केली. येथील नाल्यांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करत सुमारे १५ हजार चौरस फुटांहून अधिक जागा मोकळी केली. मोशी व डुडुळगाव परिसरातही अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंते, बीट निरीक्षक आणि अतिक्रमण विरोधी पथकाने सहभाग घेतला. जेसीबी, ट्रॅक्टर ब्रेकर यांसारख्या यंत्रसामग्रीसह पोलीस आणि एमएसएफ जवानांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. शहरात यापुढेही अनधिकृत बांधकामांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर मोहीम सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे....

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Vruttshakti Digital News
    1
    Post by Vruttshakti Digital News
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • धुळे जिल्हा पोलीस घटकाने कारवाई केलेला अंमली पदार्थ मुद्देमाल केला नाश
    1
    धुळे जिल्हा पोलीस घटकाने कारवाई केलेला अंमली पदार्थ मुद्देमाल केला नाश
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • तीन दिवसांत ४५ हजार २८९ चौ.फूट अतिक्रमण हटवत पालिकेची मोठी धडक कारवाई
    1
    तीन दिवसांत ४५ हजार २८९ चौ.फूट अतिक्रमण हटवत पालिकेची मोठी धडक कारवाई
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आंबवडेत महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रांताधिकारी डॉ.विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन, जि.प.सदस्य स्वरूपा थोपटे यांच्या उपस्थितीत विविध दाखल्याचे वाटप विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र भूमी असलेल्या आंबवडे येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. सर्वसामान्य जनतेला छोटी-छोटी शासकीय कामे किंवा दाखल्यांसाठी अनेकदा कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, शासनाचे हे अभियान खऱ्या अर्थाने 'लोकाभिमुख प्रशासन' कसे असावे, याचा उत्तम वस्तुपाठ आल्याचे मत थोपटे यांनी व्यक्त केले. या शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार, सातबारा व ८-अ मधील दुरुस्त्या, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि विविध सामाजिक योजनांचे लाभ एकाच छताखाली आणि त्वरित देण्याचा जो प्रयत्न झाला, तो अत्यंत स्तुत्य आहे असे त्या म्हणाल्या. या शिबिराच्या निमित्ताने अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली असून, प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होताना पाहून समाधान वाटले. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या या नियोजनाबद्दल त्यांनी प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त केले . याप्रसंगी भोर पंचायत समितीच्या सदस्या सौ.सुषमा विक्रम चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती व संचालक श्री.आनंदा आंबवले, महसूल नायब तहसिलदार वैशाली घोरपडे, पुरवठा नायब तहसिलदार प्रितम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, आंबवडे मंडल अधिकारी मुजीब शेख, तलाठी किरण साळुंखे, तसेच सुनील जेधे, महेंद्र जेधे, गणेश मानकुंबरे, राजेंद्र जेधे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
    1
    आंबवडेत महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रांताधिकारी डॉ.विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन, जि.प.सदस्य स्वरूपा थोपटे यांच्या उपस्थितीत विविध दाखल्याचे वाटप 
विक्रम शिंदे /भोर दि.19
तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र भूमी असलेल्या आंबवडे येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी  उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
सर्वसामान्य जनतेला छोटी-छोटी शासकीय कामे किंवा दाखल्यांसाठी अनेकदा कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, शासनाचे हे अभियान खऱ्या अर्थाने 'लोकाभिमुख प्रशासन' कसे असावे, याचा उत्तम वस्तुपाठ आल्याचे मत थोपटे यांनी व्यक्त केले. या शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार, सातबारा व ८-अ मधील दुरुस्त्या, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि विविध सामाजिक योजनांचे लाभ एकाच छताखाली आणि त्वरित देण्याचा जो प्रयत्न झाला, तो अत्यंत स्तुत्य आहे असे त्या म्हणाल्या.
या शिबिराच्या निमित्ताने अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली असून, प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होताना पाहून समाधान वाटले. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या या नियोजनाबद्दल त्यांनी प्रशासनाचे  मनापासून आभार व्यक्त केले .
याप्रसंगी भोर पंचायत समितीच्या सदस्या सौ.सुषमा विक्रम चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती व संचालक श्री.आनंदा आंबवले, महसूल नायब तहसिलदार वैशाली घोरपडे, पुरवठा नायब तहसिलदार प्रितम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, आंबवडे मंडल अधिकारी मुजीब शेख, तलाठी किरण साळुंखे, तसेच सुनील जेधे, महेंद्र जेधे, गणेश मानकुंबरे, राजेंद्र जेधे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    40 min ago
  • अक्षय तृतीया निमित्त लोक हिंदच्या सर्व प्रेक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा.
    1
    अक्षय तृतीया निमित्त लोक हिंदच्या सर्व प्रेक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    10 min ago
  • मावळ पुणे :- यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हापूस उशिरा दाखल झाला असून दरातही मोठी वाढ झाली आहे.... अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अखेर बाजारात हापूस दाखल झाला असून किवळे विकासनगरसह विविध भागांत थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल ऑरगॅनिक हापूस चाखायला मिळत आहे.... मात्र केरळ आणि कर्नाटकमधील आंबे ‘रत्नागिरी हापूस’ नावाने विकले जात असल्याने फसवणुकीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आंबा खरेदी करताना योग्य ओळख पटवूनच खरेदी करण्याचे आवाहन विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे.... 1 ) अनुशा घाग (महिला शेतकरी) योगिता घाग 2 ) रोहित घाग (विक्रेता) 3 ) यशवंत घाग (शेतकरी) #रत्नागिरीहापूस #हापूसआंबा #आंबामौसम #मावळ #हवेली #पुणेबातम्या #पिंपरीचिंचवड #अक्षयतृतीया #शेतकरी #ऑरगॅनिकआंबा #आंबादरवाढ #फळबाजार #कोकणहापूस #ग्राहकजागरूकता #बनावटआंबा #RatnagiriHapus #AlphonsoMango #MangoSeason #Maval #Haveli #PuneNews #PimpriChinchwad #AkshayaTritiya #Farmers #OrganicMango #MangoPrices #FruitMarket #KonkanMango #ConsumerAwareness #FakeMango
    1
    मावळ पुणे :-
यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हापूस उशिरा दाखल झाला असून दरातही मोठी वाढ झाली आहे....
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अखेर बाजारात हापूस दाखल झाला असून किवळे विकासनगरसह विविध भागांत थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल ऑरगॅनिक हापूस चाखायला मिळत आहे....
मात्र केरळ आणि कर्नाटकमधील आंबे ‘रत्नागिरी हापूस’ नावाने विकले जात असल्याने फसवणुकीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आंबा खरेदी करताना योग्य ओळख पटवूनच खरेदी करण्याचे आवाहन विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे....
1 ) अनुशा घाग (महिला शेतकरी)
योगिता घाग
2 ) रोहित घाग (विक्रेता)
3 ) यशवंत घाग (शेतकरी)
#रत्नागिरीहापूस #हापूसआंबा #आंबामौसम #मावळ #हवेली #पुणेबातम्या #पिंपरीचिंचवड #अक्षयतृतीया #शेतकरी #ऑरगॅनिकआंबा #आंबादरवाढ #फळबाजार #कोकणहापूस #ग्राहकजागरूकता #बनावटआंबा
#RatnagiriHapus #AlphonsoMango #MangoSeason #Maval #Haveli #PuneNews #PimpriChinchwad #AkshayaTritiya #Farmers #OrganicMango #MangoPrices #FruitMarket #KonkanMango #ConsumerAwareness #FakeMango
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि. चिखलगाव (ता. भोर) गुरुदत्त कला, क्रीडा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ धोंडेवाडी-चिखलगाव यांच्या वतीने आयोजित 'श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्ती अनावरण सोहळा व शेतकरी मेळावा' आज (दि.18)अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी आमदार संग्रामदादा थोपटे आदी उपस्थित होते. या स्मारकाच्या उभारणीसाठी धोंडेवाडी व चिखलगाव येथील ग्रामस्थांनी आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान दिले . सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्या या तरुण रक्ताचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा थोपटे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.पोपटराव सुके, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालुका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रवींद्र कंक, राजगड तालुका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.उत्तमराव थोपटे, श्री.सुभाषराव कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर पंचायत समिती सदस्या सौ.गिता आनंदा आंबवले, सौ.सुषमा विक्रम चव्हाण, सदस्य श्री.माऊली पांगारे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री.प्रवीण बापू शिंदे, भाजपा उपाध्यक्ष श्री.काळुराम मळेकर, श्री.सचिन मांडके, युवा मोर्चा सरचिटणीस श्री.अमर बुदगुडे, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, धोंडेवाडी, चिखलगाव व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ बंधू - भगिनीं युवा, शेतकरी वर्ग आणि पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि. चिखलगाव (ता. भोर)
गुरुदत्त कला, क्रीडा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ धोंडेवाडी-चिखलगाव यांच्या वतीने आयोजित 'श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्ती अनावरण सोहळा व शेतकरी मेळावा' आज (दि.18)अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी  माजी आमदार संग्रामदादा थोपटे आदी उपस्थित होते. या स्मारकाच्या उभारणीसाठी धोंडेवाडी व चिखलगाव येथील ग्रामस्थांनी आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान दिले . सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्या या तरुण रक्ताचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्य  स्वरूपा थोपटे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.पोपटराव सुके, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालुका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रवींद्र कंक, राजगड तालुका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.उत्तमराव थोपटे, श्री.सुभाषराव कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर पंचायत समिती सदस्या सौ.गिता आनंदा आंबवले, सौ.सुषमा विक्रम चव्हाण, सदस्य श्री.माऊली पांगारे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री.प्रवीण बापू शिंदे, भाजपा उपाध्यक्ष श्री.काळुराम मळेकर, श्री.सचिन मांडके, युवा मोर्चा सरचिटणीस श्री.अमर बुदगुडे, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, धोंडेवाडी, चिखलगाव व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ बंधू - भगिनीं युवा, शेतकरी वर्ग आणि पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.