logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रत्नागिरी हापूसची आवक ३०% नी घट; पुणेकरांना गोडवा उशिरा..! मावळ पुणे :- यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हापूस उशिरा दाखल झाला असून दरातही मोठी वाढ झाली आहे.... अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अखेर बाजारात हापूस दाखल झाला असून किवळे विकासनगरसह विविध भागांत थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल ऑरगॅनिक हापूस चाखायला मिळत आहे.... मात्र केरळ आणि कर्नाटकमधील आंबे ‘रत्नागिरी हापूस’ नावाने विकले जात असल्याने फसवणुकीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आंबा खरेदी करताना योग्य ओळख पटवूनच खरेदी करण्याचे आवाहन विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे.... 1 ) अनुशा घाग (महिला शेतकरी) योगिता घाग 2 ) रोहित घाग (विक्रेता) 3 ) यशवंत घाग (शेतकरी) #रत्नागिरीहापूस #हापूसआंबा #आंबामौसम #मावळ #हवेली #पुणेबातम्या #पिंपरीचिंचवड #अक्षयतृतीया #शेतकरी #ऑरगॅनिकआंबा #आंबादरवाढ #फळबाजार #कोकणहापूस #ग्राहकजागरूकता #बनावटआंबा #RatnagiriHapus #AlphonsoMango #MangoSeason #Maval #Haveli #PuneNews #PimpriChinchwad #AkshayaTritiya #Farmers #OrganicMango #MangoPrices #FruitMarket #KonkanMango #ConsumerAwareness #FakeMango

1 hr ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago

रत्नागिरी हापूसची आवक ३०% नी घट; पुणेकरांना गोडवा उशिरा..! मावळ पुणे :- यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हापूस उशिरा दाखल झाला असून दरातही मोठी वाढ झाली आहे.... अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अखेर बाजारात हापूस दाखल झाला असून किवळे विकासनगरसह विविध भागांत थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल ऑरगॅनिक हापूस चाखायला मिळत आहे.... मात्र केरळ आणि कर्नाटकमधील आंबे ‘रत्नागिरी हापूस’ नावाने विकले जात असल्याने फसवणुकीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आंबा खरेदी करताना योग्य ओळख पटवूनच खरेदी करण्याचे आवाहन विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे.... 1 ) अनुशा घाग (महिला शेतकरी) योगिता घाग 2 ) रोहित घाग (विक्रेता) 3 ) यशवंत घाग (शेतकरी) #रत्नागिरीहापूस #हापूसआंबा #आंबामौसम #मावळ #हवेली #पुणेबातम्या #पिंपरीचिंचवड #अक्षयतृतीया #शेतकरी #ऑरगॅनिकआंबा #आंबादरवाढ #फळबाजार #कोकणहापूस #ग्राहकजागरूकता #बनावटआंबा #RatnagiriHapus #AlphonsoMango #MangoSeason #Maval #Haveli #PuneNews #PimpriChinchwad #AkshayaTritiya #Farmers #OrganicMango #MangoPrices #FruitMarket #KonkanMango #ConsumerAwareness #FakeMango

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Vruttshakti Digital News
    1
    Post by Vruttshakti Digital News
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • धुळे जिल्हा पोलीस घटकाने कारवाई केलेला अंमली पदार्थ मुद्देमाल केला नाश
    1
    धुळे जिल्हा पोलीस घटकाने कारवाई केलेला अंमली पदार्थ मुद्देमाल केला नाश
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • तीन दिवसांत ४५ हजार २८९ चौ.फूट अतिक्रमण हटवत पालिकेची मोठी धडक कारवाई
    1
    तीन दिवसांत ४५ हजार २८९ चौ.फूट अतिक्रमण हटवत पालिकेची मोठी धडक कारवाई
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आंबवडेत महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रांताधिकारी डॉ.विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन, जि.प.सदस्य स्वरूपा थोपटे यांच्या उपस्थितीत विविध दाखल्याचे वाटप विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र भूमी असलेल्या आंबवडे येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. सर्वसामान्य जनतेला छोटी-छोटी शासकीय कामे किंवा दाखल्यांसाठी अनेकदा कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, शासनाचे हे अभियान खऱ्या अर्थाने 'लोकाभिमुख प्रशासन' कसे असावे, याचा उत्तम वस्तुपाठ आल्याचे मत थोपटे यांनी व्यक्त केले. या शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार, सातबारा व ८-अ मधील दुरुस्त्या, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि विविध सामाजिक योजनांचे लाभ एकाच छताखाली आणि त्वरित देण्याचा जो प्रयत्न झाला, तो अत्यंत स्तुत्य आहे असे त्या म्हणाल्या. या शिबिराच्या निमित्ताने अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली असून, प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होताना पाहून समाधान वाटले. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या या नियोजनाबद्दल त्यांनी प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त केले . याप्रसंगी भोर पंचायत समितीच्या सदस्या सौ.सुषमा विक्रम चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती व संचालक श्री.आनंदा आंबवले, महसूल नायब तहसिलदार वैशाली घोरपडे, पुरवठा नायब तहसिलदार प्रितम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, आंबवडे मंडल अधिकारी मुजीब शेख, तलाठी किरण साळुंखे, तसेच सुनील जेधे, महेंद्र जेधे, गणेश मानकुंबरे, राजेंद्र जेधे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
    1
    आंबवडेत महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रांताधिकारी डॉ.विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन, जि.प.सदस्य स्वरूपा थोपटे यांच्या उपस्थितीत विविध दाखल्याचे वाटप 
विक्रम शिंदे /भोर दि.19
तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र भूमी असलेल्या आंबवडे येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी  उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
सर्वसामान्य जनतेला छोटी-छोटी शासकीय कामे किंवा दाखल्यांसाठी अनेकदा कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, शासनाचे हे अभियान खऱ्या अर्थाने 'लोकाभिमुख प्रशासन' कसे असावे, याचा उत्तम वस्तुपाठ आल्याचे मत थोपटे यांनी व्यक्त केले. या शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार, सातबारा व ८-अ मधील दुरुस्त्या, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि विविध सामाजिक योजनांचे लाभ एकाच छताखाली आणि त्वरित देण्याचा जो प्रयत्न झाला, तो अत्यंत स्तुत्य आहे असे त्या म्हणाल्या.
या शिबिराच्या निमित्ताने अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली असून, प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होताना पाहून समाधान वाटले. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या या नियोजनाबद्दल त्यांनी प्रशासनाचे  मनापासून आभार व्यक्त केले .
याप्रसंगी भोर पंचायत समितीच्या सदस्या सौ.सुषमा विक्रम चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती व संचालक श्री.आनंदा आंबवले, महसूल नायब तहसिलदार वैशाली घोरपडे, पुरवठा नायब तहसिलदार प्रितम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, आंबवडे मंडल अधिकारी मुजीब शेख, तलाठी किरण साळुंखे, तसेच सुनील जेधे, महेंद्र जेधे, गणेश मानकुंबरे, राजेंद्र जेधे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जीवनशैलीत  मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक असून प्रत्येक घरात छोटेखानी ग्रंथालय असावे, असे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. “पुस्तके वाचन ही आनंदाची वाट आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. येथील सनशाईन क्लबच्या वतीने ‘जीवनाच्या आनंदाच्या वाटा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, ऊर्जा दूध व्यवसायाचे प्रमुख प्रकाश कुतवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कळमकर म्हणाले, सध्याचे जगणे अधिकाधिक तणावग्रस्त होत चालले आहे.  एकत्र येण्याची सवय कमी झाली असून पैसा, आरोग्य आणि सुख यांच्या मागे धावतानाच अस्वस्थता वाढताना दिसते. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने आनंदाचे क्षण निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलचा वापर हा कल्याणासाठी करायचा की व्यसनासाठी, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. “ सध्याच्या आभासी जीवनशैलीमुळे संवेदनांचा अभाव निर्माण होत असून माणसे रोबोटसारखी वागू लागली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “आनंद मोठ्या गोष्टीत नव्हे तर छोट्या क्षणांत व गोष्टीत  शोधावा लागतो,” असे ते म्हणाले. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना संधीमध्ये अडचणी दिसतात, तर सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींना अडचणीतही संधी दिसते, असा आशयपूर्ण संदेश त्यांनी दिला. प्रास्ताविकात किशोर राजे निंबाळकर यांनी सनशाईन क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. स्वागत व आभार एलआयसी अधिकारी अनिल पडवळ  यांनी मानले.
    4
    शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जीवनशैलीत  मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक असून प्रत्येक घरात छोटेखानी ग्रंथालय असावे, असे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. “पुस्तके वाचन ही आनंदाची वाट आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
येथील सनशाईन क्लबच्या वतीने ‘जीवनाच्या आनंदाच्या वाटा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, ऊर्जा दूध व्यवसायाचे प्रमुख प्रकाश कुतवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कळमकर म्हणाले, सध्याचे जगणे अधिकाधिक तणावग्रस्त होत चालले आहे.  एकत्र येण्याची सवय कमी झाली असून पैसा, आरोग्य आणि सुख यांच्या मागे धावतानाच अस्वस्थता वाढताना दिसते. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने आनंदाचे क्षण निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोबाईलचा वापर हा कल्याणासाठी करायचा की व्यसनासाठी, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. “ सध्याच्या आभासी जीवनशैलीमुळे संवेदनांचा अभाव निर्माण होत असून माणसे रोबोटसारखी वागू लागली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “आनंद मोठ्या गोष्टीत नव्हे तर छोट्या क्षणांत व गोष्टीत  शोधावा लागतो,” असे ते म्हणाले. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना संधीमध्ये अडचणी दिसतात, तर सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींना अडचणीतही संधी दिसते, असा आशयपूर्ण संदेश त्यांनी दिला.
प्रास्ताविकात किशोर राजे निंबाळकर यांनी सनशाईन क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. स्वागत व आभार एलआयसी अधिकारी अनिल पडवळ  यांनी मानले.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    28 min ago
  • पिंपरी चिंचवड :- शहराचा नियोजनबद्ध विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या विविध भागांत राबविलेल्या धडक मोहिमेत पालिकेने ४६ अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडवर हातोडा चालवला आहे... या कारवाईत एकूण ४५ हजार २८९ चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या ब, क, इ, ग आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही व्यापक कारवाई करण्यात आली. यामध्ये चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १८ मध्ये सर्वाधिक मोठी कारवाई करत सुमारे २१ हजार ७९८ चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. तसेच भोसरी, सद्गुरूनगर आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात निवासी व व्यावसायिक आरसीसी बांधकामांवर कारवाई करून ३ हजार ८११ चौरस फूट क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. चिखली येथील शेलार वस्ती परिसरातही नियमांचे उल्लंघन करून उभारलेली ८ व्यावसायिक बांधकामे पाडण्यात आली. रहाटणी आणि पिंपळे सौदागर परिसरातील विविध कॉलनींमध्येही महापालिकेच्या पथकाने तीन दिवस सातत्यपूर्ण कारवाई केली. येथील नाल्यांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करत सुमारे १५ हजार चौरस फुटांहून अधिक जागा मोकळी केली. मोशी व डुडुळगाव परिसरातही अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंते, बीट निरीक्षक आणि अतिक्रमण विरोधी पथकाने सहभाग घेतला. जेसीबी, ट्रॅक्टर ब्रेकर यांसारख्या यंत्रसामग्रीसह पोलीस आणि एमएसएफ जवानांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. शहरात यापुढेही अनधिकृत बांधकामांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर मोहीम सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे....
    1
    पिंपरी चिंचवड :-
शहराचा नियोजनबद्ध विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या विविध भागांत राबविलेल्या धडक मोहिमेत पालिकेने ४६ अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडवर हातोडा चालवला आहे...
या कारवाईत एकूण ४५ हजार २८९ चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या ब, क, इ, ग आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही व्यापक कारवाई करण्यात आली. यामध्ये चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १८ मध्ये सर्वाधिक मोठी कारवाई करत सुमारे २१ हजार ७९८ चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. तसेच भोसरी, सद्गुरूनगर आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात निवासी व व्यावसायिक आरसीसी बांधकामांवर कारवाई करून ३ हजार ८११ चौरस फूट क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. चिखली येथील शेलार वस्ती परिसरातही नियमांचे उल्लंघन करून उभारलेली ८ व्यावसायिक बांधकामे पाडण्यात आली. रहाटणी आणि पिंपळे सौदागर परिसरातील विविध कॉलनींमध्येही महापालिकेच्या पथकाने तीन दिवस सातत्यपूर्ण कारवाई केली. येथील नाल्यांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करत सुमारे १५ हजार चौरस फुटांहून अधिक जागा मोकळी केली. मोशी व डुडुळगाव परिसरातही अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंते, बीट निरीक्षक आणि अतिक्रमण विरोधी पथकाने सहभाग घेतला. जेसीबी, ट्रॅक्टर ब्रेकर यांसारख्या यंत्रसामग्रीसह पोलीस आणि एमएसएफ जवानांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. शहरात यापुढेही अनधिकृत बांधकामांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर मोहीम सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे....
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूर आणि बार्शी तालुका हद्दीतील तीन मोठ्या ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई केली आहे. ​सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण ९१ आरोपींविरुद्ध ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १,२१,८३,२३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    1
    सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूर आणि बार्शी तालुका हद्दीतील तीन मोठ्या ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई केली आहे. 
​सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण ९१ आरोपींविरुद्ध ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १,२१,८३,२३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • विक्रम शिंदे /भोर दि. चिखलगाव (ता. भोर) गुरुदत्त कला, क्रीडा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ धोंडेवाडी-चिखलगाव यांच्या वतीने आयोजित 'श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्ती अनावरण सोहळा व शेतकरी मेळावा' आज (दि.18)अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी आमदार संग्रामदादा थोपटे आदी उपस्थित होते. या स्मारकाच्या उभारणीसाठी धोंडेवाडी व चिखलगाव येथील ग्रामस्थांनी आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान दिले . सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्या या तरुण रक्ताचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा थोपटे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.पोपटराव सुके, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालुका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रवींद्र कंक, राजगड तालुका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.उत्तमराव थोपटे, श्री.सुभाषराव कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर पंचायत समिती सदस्या सौ.गिता आनंदा आंबवले, सौ.सुषमा विक्रम चव्हाण, सदस्य श्री.माऊली पांगारे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री.प्रवीण बापू शिंदे, भाजपा उपाध्यक्ष श्री.काळुराम मळेकर, श्री.सचिन मांडके, युवा मोर्चा सरचिटणीस श्री.अमर बुदगुडे, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, धोंडेवाडी, चिखलगाव व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ बंधू - भगिनीं युवा, शेतकरी वर्ग आणि पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि. चिखलगाव (ता. भोर)
गुरुदत्त कला, क्रीडा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ धोंडेवाडी-चिखलगाव यांच्या वतीने आयोजित 'श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्ती अनावरण सोहळा व शेतकरी मेळावा' आज (दि.18)अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी  माजी आमदार संग्रामदादा थोपटे आदी उपस्थित होते. या स्मारकाच्या उभारणीसाठी धोंडेवाडी व चिखलगाव येथील ग्रामस्थांनी आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान दिले . सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्या या तरुण रक्ताचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्य  स्वरूपा थोपटे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.पोपटराव सुके, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालुका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रवींद्र कंक, राजगड तालुका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.उत्तमराव थोपटे, श्री.सुभाषराव कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर पंचायत समिती सदस्या सौ.गिता आनंदा आंबवले, सौ.सुषमा विक्रम चव्हाण, सदस्य श्री.माऊली पांगारे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री.प्रवीण बापू शिंदे, भाजपा उपाध्यक्ष श्री.काळुराम मळेकर, श्री.सचिन मांडके, युवा मोर्चा सरचिटणीस श्री.अमर बुदगुडे, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, धोंडेवाडी, चिखलगाव व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ बंधू - भगिनीं युवा, शेतकरी वर्ग आणि पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.