कर्जत-जामखेडच्या न्यायव्यवस्थेला बळकटी; अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला मंजुरी कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यांसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार रोहित पवार यांचा कर्जत तालुका वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्काराचा नम्र स्वीकार करताना आ. रोहित पवार यांनी, "पक्षकार आणि वकिलांना ज्या-ज्या वेळी गरज भासेल, त्या प्रत्येक वेळी न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि न्यायाच्या या कार्यात संपूर्ण सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू," अशी ग्वाही दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या स्थापनेसाठी कर्जत तालुका वकील संघाच्या विद्यमान तसेच माजी पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयापासून विविध स्तरांवर सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांच्या या योगदानाचे आ. रोहित पवार यांनी विशेष कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यापूर्वीही कर्जत येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर करून घेण्यासाठी आ. रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या न्यायालयाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्यानंतर आलेल्या शिंदे सरकारने या न्यायालयाच्या कार्यवाहीला स्थगिती दिली होती. मात्र, आ. रोहित पवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ती स्थगिती उठविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यक्रमास कर्जत तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संग्राम ढेरे, ज्येष्ठ विधीज्ञ बाळासाहेब शिंदे, ॲड. शेळके, ॲड. कदम, उपाध्यक्ष ॲड. चव्हाण, सचिव ॲड. मते, ॲड. राणे, ॲड. गायकवाड, ॲड. जगताप, ॲड. भोसले, ॲड. नेवसे, ॲड. खरात यांच्यासह वकील संघाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.3
- जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.3
- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी राहुरी फॅक्टरी, प्रतिनिधी : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवळाली प्रवरा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेन देण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे, शहराध्यक्ष शरदभाऊ लोखंडे, उपशहराध्यक्ष सुनीलभाऊ रोकडे, सेक्रेटरी सागरभाऊ उल्हारे तसेच सदस्य करण लोंढे, संदीप तोडमल, प्रफुल शिंदे उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे यांच्या वतीने गरजू दोन विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश भेट देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक समता आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.1
- ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे1
- रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास1
- हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.1
- अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!1