logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चिपळूण : अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे गुरुवारचे ओपीडी वेळापत्रक जाहीर प्रतिनिधी: स्वाती हडकर चिपळूण : अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे गुरुवारचे ओपीडी वेळापत्रक जाहीर चिपळूण येथील सावित्री एन्क्लेव्ह, LIC ऑफिस समोर, भोगाळे येथे कार्यरत असलेल्या अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे गुरुवार, १६ एप्रिल २०२६ रोजीचे दैनंदिन ओपीडी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विविध तज्ञ डॉक्टरांकडून दिवसभर रुग्णसेवा उपलब्ध राहणार आहे. स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. पूजा भुरण या सकाळी १०.०० ते २.०० व संध्याकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत उपलब्ध राहतील. हृदयरोग, मधुमेह व अंतर्गत विकार तज्ञ डॉ. अतुल बोरोडे सकाळी १० ते २ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत रुग्ण तपासणी करतील. एमडी फिजिशियन व क्रिटिकल केअर तज्ञ डॉ. ओंकार खोत सकाळी ९.०० ते दुपारी १.३० आणि दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.३० या वेळेत सेवा देतील. फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. सौरभ सुर्वे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० तसेच संध्याकाळी ३.०० ते ६.०० या वेळेत उपलब्ध राहतील. जनरल, एन्डोस्कोपिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. सद्गुरु पाटणकर सकाळी १०.०० ते दुपारी २.०० आणि संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत उपस्थित राहतील. जनरल सर्जन डॉ. भक्ती पालांडे सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत रुग्णसेवा देतील. ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. श्रीश भास्करवार सकाळी १०.०० ते दुपारी २.०० तसेच संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत उपलब्ध राहतील. दंतचिकित्सक व इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. प्रविण दाभाडे आणि स्माईल डिझायनर डॉ. सविता दाभाडे सकाळी १०.३० ते दुपारी २.०० आणि संध्याकाळी ५.३० ते ८.०० या वेळेत सेवा देतील. रेडिओलॉजिस्ट डॉ. सचिन विधाते यांच्याकडून X-Ray व CT Scan सुविधा २४x७ उपलब्ध असून सोनोग्राफी सेवा सकाळी १० ते २ आणि संध्याकाळी ४.३० ते ७ या वेळेत दिली जाईल. आहार तज्ञ डॉ. ऋषिकेश बर्वे सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत मार्गदर्शन करतील. एमडी पॅथोलॉजिस्ट डॉ. सूरज शिकलगर यांच्या मार्गदर्शनाखाली पॅथोलॉजी सेवा तसेच आपत्कालीन सेवा २४x७ उपलब्ध राहणार आहे. रुग्णांनी अपॉइंटमेंटसाठी ७९९८८९८९८९ / ७९९८७३७३७३ या मोबाईल क्रमांकांवर किंवा (०२३५५) २५४२५४ / २५४३४५ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. “आरोग्याची सर्व सेवा – एकाच छताखाली!” हा ब्रीदवाक्य जपत हॉस्पिटलमार्फत सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

19 hrs ago
user_चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
19 hrs ago

चिपळूण : अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे गुरुवारचे ओपीडी वेळापत्रक जाहीर प्रतिनिधी: स्वाती हडकर चिपळूण : अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे गुरुवारचे ओपीडी वेळापत्रक जाहीर चिपळूण येथील सावित्री एन्क्लेव्ह, LIC ऑफिस समोर, भोगाळे येथे कार्यरत असलेल्या अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे गुरुवार, १६ एप्रिल २०२६ रोजीचे दैनंदिन ओपीडी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विविध तज्ञ डॉक्टरांकडून दिवसभर रुग्णसेवा उपलब्ध राहणार आहे. स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. पूजा भुरण या सकाळी १०.०० ते २.०० व संध्याकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत उपलब्ध राहतील. हृदयरोग, मधुमेह व अंतर्गत विकार तज्ञ डॉ. अतुल बोरोडे सकाळी १० ते २ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत रुग्ण तपासणी करतील. एमडी फिजिशियन व क्रिटिकल केअर तज्ञ डॉ. ओंकार खोत सकाळी ९.०० ते दुपारी १.३० आणि दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.३० या वेळेत सेवा देतील. फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. सौरभ सुर्वे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० तसेच संध्याकाळी ३.०० ते ६.०० या वेळेत उपलब्ध राहतील. जनरल, एन्डोस्कोपिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. सद्गुरु पाटणकर सकाळी १०.०० ते दुपारी २.०० आणि संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत उपस्थित राहतील. जनरल सर्जन डॉ. भक्ती पालांडे सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत रुग्णसेवा देतील. ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. श्रीश भास्करवार सकाळी १०.०० ते दुपारी २.०० तसेच संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत उपलब्ध राहतील. दंतचिकित्सक व इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. प्रविण दाभाडे आणि स्माईल डिझायनर डॉ. सविता दाभाडे सकाळी १०.३० ते दुपारी २.०० आणि संध्याकाळी ५.३० ते ८.०० या वेळेत सेवा देतील. रेडिओलॉजिस्ट डॉ. सचिन विधाते यांच्याकडून X-Ray व CT Scan सुविधा २४x७ उपलब्ध असून सोनोग्राफी सेवा सकाळी १० ते २ आणि संध्याकाळी ४.३० ते ७ या वेळेत दिली जाईल. आहार तज्ञ डॉ. ऋषिकेश बर्वे सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत मार्गदर्शन करतील. एमडी पॅथोलॉजिस्ट डॉ. सूरज शिकलगर यांच्या मार्गदर्शनाखाली पॅथोलॉजी सेवा तसेच आपत्कालीन सेवा २४x७ उपलब्ध राहणार आहे. रुग्णांनी अपॉइंटमेंटसाठी ७९९८८९८९८९ / ७९९८७३७३७३ या मोबाईल क्रमांकांवर किंवा (०२३५५) २५४२५४ / २५४३४५ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. “आरोग्याची सर्व सेवा – एकाच छताखाली!” हा ब्रीदवाक्य जपत हॉस्पिटलमार्फत सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का? मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..! @highlight #kondhwa #all
    1
    आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का?
मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..!
@highlight #kondhwa #all
    user_MAHARASHTRA MANTHAN
    MAHARASHTRA MANTHAN
    Advertising agency पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
    1
    कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    18 min ago
  • पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
    1
    पिंपरी चिंचवड वाकड, तपास पथकाची कामगिरी ४८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बारामतीत साजरी करण्यात आली भव्य असे मिरवणूक काढून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आल्या.
    1
    महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बारामतीत साजरी करण्यात आली भव्य असे मिरवणूक काढून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आल्या.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..
    1
    काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • #news #trending news
    1
    #news #trending news
    user_Bombay Press Original
    Bombay Press Original
    Local News Reporter उरण, रायगड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आज एका भरधाव थार जीप आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये रुग्णवाहिकेचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेत एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, रावेत पोलीस स्टेशनसमोरील मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका आणि थार कारची जोरात धडक झाली. याच दरम्यान एक दुचाकीस्वारही या अपघाताच्या कचाट्यात सापडला. अपघाताचा आवाज ऐकताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना पोलिसांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात रुग्णवाहिकेचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपला गेला असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास रावेत पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे....
    2
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आज एका भरधाव थार जीप आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये रुग्णवाहिकेचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेत एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे....
मिळालेल्या माहितीनुसार, रावेत पोलीस स्टेशनसमोरील मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका आणि थार कारची जोरात धडक झाली. याच दरम्यान एक दुचाकीस्वारही या अपघाताच्या कचाट्यात सापडला. अपघाताचा आवाज ऐकताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना पोलिसांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात  रुग्णवाहिकेचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपला गेला असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास रावेत पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे....
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
    1
    पिंपरी चिंचवड काळेवाडीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले . कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत. दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
    3
    शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}: श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील प्रीतम प्रकाश नगर परिसरात भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली. “स्वामी समर्थ महाराज की जय”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
प्रीतम प्रकाश नगरमधील विविध रस्त्यांवरून पालखी मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरासह संपूर्ण भाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भक्तांच्या उपस्थितीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मिरवणुकीनंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायक श्रीहरी विठ्ठल मेहंदरकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. यावेळी सादर झालेल्या भजन व भक्तीगीतांनी आध्यात्मिक अनुभूती दिली. कार्यक्रमाची सुरुवात “खेळ मांडियेला” या अभंगाने होत “रूपे सुंदर”, “ॐ ओंकार प्रधान” आणि “ग सारेगमप” यांसारख्या सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. त्यानंतर “रचिला ऋषीमुनींनी”, “विठू माऊली” व “सेवा धर्मी पुण्य आहे” या गीतांनी श्रद्धेची उंची वाढवली, तर “धाव पाव स्वामी” आणि “हरी म्हणा” या गजरांनी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पुढे “मन लागो रे”, “स्वामी समर्था सदगुरु समर्था”, “कानडा राजा पंढरीचा” आणि “वृंदावनी वेणु” या सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. “शाम तेरी बंसी” व “धरिला ला पंढरीचा चोर” यानंतर “माझी रेणुका माऊली” आणि “सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा” ही गीते सादर करण्यात आली “घागर घेऊन”, “भवरा भवरा” व “अबीर गुलाल” “तीर्थ विठ्ठल”, “अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांनी वातावरण अधिकच भारावले
. कार्यक्रमाची सांगता “निघालो घेऊन दत्ताची पालखी” या भक्तिगीताने होत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव देत सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष योगेश वाळकीकर, उपाध्यक्ष अॅड. नारायण पवार, सचिव दीपक वर्मा, खजिनदार गणेश घाडगे यांच्यासह संपत लोखंडे, प्रमोद पवार, विष्णू वेताळ, मंगला बागमार, भूषण कडेकर, चंद्रकांत निघोजकर आदी पदाधिकारी आहेत.
दरम्यान, संस्थेच्या वतीने प्रीतम प्रकाश नगर येथे स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून येथे नियमित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच गरजूंना वॉकर, वॉटर बेड आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे सामाजिक कार्यही सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष योगेश वाळकीकर व श्यामसुंदर चिखलीकर यांनी दिली. गरजूंनी या बाबत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.