साकोलीत नारीशक्ती वंदन विधेयकाच्या सन्मानार्थ भव्य महिला पदयात्रेचे आयोजन साकोली साकोलीतील प्रकाशपर्व ते लहरीबाबा मठापर्यंत राष्ट्रीय महामार्गाने महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि राजकीय सहभागाला बळ देणाऱ्या “नारीशक्ती वंदन अधिनियम” या ऐतिहासिक निर्णयाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य महिला पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मधुरा मदनकर साकोली नगराध्यक्ष देवश्री कापगते ,जि प सदस्य वनिता डोये, मा. नगराध्यक्ष धनवंता राऊत जिल्हा महामंत्री श्रद्धा डोंगरे तसेच नगर परिषदेच्या उपाध्यक्षा रोहिणी मुंगलमारे जिल्हा सचिव प्रीती मल्लेवार सरपंच उषा डोंगरवार विद्या खेडीकर सुशीला पटले वैशाली पटले सपना बुरडे चंद्रकला भोपे श्वेता निमकर,साकोली नगर परिषदेच्या नगरसेविका उपस्थित होत्या यावेळी प्रकाश पर्व येथे झालेल्या कार्यक्रमात माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधदे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राम्हणकर जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, श्रावण कापगते यांनी मार्गदर्शन केले. मा. जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे यांनी सांगितले हे विधेयक महिलांना सन्मान देणारे असले तरी यामुळे संपूर्ण देशात मोठी क्रांती होणार आहे .सशक्तपणे घर चालवणारी महिला आता राजकीय निर्णयात देखील 33%ने सहभागी होणार असल्याने आरोग्य शिक्षण स्वच्छता व सुरक्षा या क्षेत्रामध्ये युद्ध पातळीवर काम केले जाईल आणि यामुळे देशाचे चित्र बदलेल या विधेयकामुळे देश विकसित होण्यास मदत होणार आहे तर अविनाश ब्राम्हणकर यांनी सांगितले महिला ही संवेदनशील असते त्यामुळे शासनाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग या विधेयकामुळे वाटणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिलांकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे आमदार आणि खासदार झाल्यानंतर महिला नक्कीच या देशाचे चित्र बदलवतील नारीशक्ती वंदन हे विधेयक महिलांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे तर जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे यांनी ही पदयात्रा केवळ एक कार्यक्रम नसून, महिला शक्तीच्या एकजुटीचा, आत्मविश्वासाचा आणि परिवर्तनाच्या नव्या पर्वाचा घोष आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत महिला सक्षमीकरणाचा संदेश पोहोचवण्याचा हा एक प्रभावी उपक्रम आहे.कार्यक्रमाचे संचालन भूमीता धकाते तर आभार प्रीती डोंगरवार यांनी मानले या रॅलीत बचत गट महिला, सामाजिक व धार्मिक संस्था, महिला मंडळ, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, लाभार्थी महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. 👉 सर्व महिला भगिनींना मनःपूर्वक आवाहन करण्यात येते की, या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महिला एकजूट, सामर्थ्य आणि नेतृत्वाची भव्य ताकद संपूर्ण समाजासमोर प्रदर्शित करावी. “सशक्त महिला – सशक्त भारत” या संकल्पनेला साकार रूप देण्यासाठी, चला एकत्र येऊया आणि या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग बनूया.
साकोलीत नारीशक्ती वंदन विधेयकाच्या सन्मानार्थ भव्य महिला पदयात्रेचे आयोजन साकोली साकोलीतील प्रकाशपर्व ते लहरीबाबा मठापर्यंत राष्ट्रीय महामार्गाने महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि राजकीय सहभागाला बळ देणाऱ्या “नारीशक्ती वंदन अधिनियम” या ऐतिहासिक निर्णयाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य महिला पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मधुरा मदनकर साकोली नगराध्यक्ष देवश्री कापगते ,जि प सदस्य वनिता डोये, मा. नगराध्यक्ष धनवंता राऊत जिल्हा महामंत्री श्रद्धा डोंगरे तसेच नगर परिषदेच्या उपाध्यक्षा रोहिणी मुंगलमारे जिल्हा सचिव प्रीती मल्लेवार सरपंच उषा डोंगरवार विद्या
खेडीकर सुशीला पटले वैशाली पटले सपना बुरडे चंद्रकला भोपे श्वेता निमकर,साकोली नगर परिषदेच्या नगरसेविका उपस्थित होत्या यावेळी प्रकाश पर्व येथे झालेल्या कार्यक्रमात माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधदे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राम्हणकर जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, श्रावण कापगते यांनी मार्गदर्शन केले. मा. जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे यांनी सांगितले हे विधेयक महिलांना सन्मान देणारे असले तरी यामुळे संपूर्ण देशात मोठी क्रांती होणार आहे .सशक्तपणे घर चालवणारी महिला आता राजकीय निर्णयात देखील 33%ने सहभागी होणार असल्याने आरोग्य शिक्षण स्वच्छता व सुरक्षा या क्षेत्रामध्ये युद्ध पातळीवर काम केले जाईल आणि
यामुळे देशाचे चित्र बदलेल या विधेयकामुळे देश विकसित होण्यास मदत होणार आहे तर अविनाश ब्राम्हणकर यांनी सांगितले महिला ही संवेदनशील असते त्यामुळे शासनाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग या विधेयकामुळे वाटणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिलांकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे आमदार आणि खासदार झाल्यानंतर महिला नक्कीच या देशाचे चित्र बदलवतील नारीशक्ती वंदन हे विधेयक महिलांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे तर जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे यांनी ही पदयात्रा केवळ एक कार्यक्रम नसून, महिला शक्तीच्या एकजुटीचा, आत्मविश्वासाचा आणि परिवर्तनाच्या नव्या पर्वाचा घोष आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत महिला सक्षमीकरणाचा
संदेश पोहोचवण्याचा हा एक प्रभावी उपक्रम आहे.कार्यक्रमाचे संचालन भूमीता धकाते तर आभार प्रीती डोंगरवार यांनी मानले या रॅलीत बचत गट महिला, सामाजिक व धार्मिक संस्था, महिला मंडळ, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, लाभार्थी महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. 👉 सर्व महिला भगिनींना मनःपूर्वक आवाहन करण्यात येते की, या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महिला एकजूट, सामर्थ्य आणि नेतृत्वाची भव्य ताकद संपूर्ण समाजासमोर प्रदर्शित करावी. “सशक्त महिला – सशक्त भारत” या संकल्पनेला साकार रूप देण्यासाठी, चला एकत्र येऊया आणि या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग बनूया.
- Post by मनिषा विजय काशीवार2
- फुलसावंगीतील ट्रान्सफॉर्मरला आग; मोठा अनर्थ टळला, नागरिकांमध्ये संताप फुलसावंगी येथील ग्रामपंचायतला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मागील २० ते २५ दिवसांपासून तांत्रिक बिघाड (फॉल्ट) होता. यामुळे परिसरातील वार्डात कमी व्होल्टेजचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. याबाबत वारंवार तक्रारी करूनही विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, आज आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या डीपीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. बाजारात मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून हा धोका लक्षात आणून देऊनही संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जबाबदारांवर कारवाई करण्याची व तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.1
- नटवरलाल माणिक लाल दलाल महाविद्यालय, गोंदिया में विश्वरत्न, भारतरत्न, संविधान निर्माता और राष्ट्रनिर्माता परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई।1
- गौरीटोला जिल्हा परिषद शाळेत सोयीसुविधांचा वनवास; शाळा व्यवस्थापन समितीची साहित्यासाठी मागणी गोरेगाव (प्रतिनिधी): गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील तिल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गौरीटोला येथील आदर्श वरिष्ठ प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत मूलभूत सुविधांची प्रचंड वानवा असल्याचे समोर आले आहे. शाळेत विद्युत फिटिंग नसल्याने विद्यार्थ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून, पंखे आणि बसण्यासाठी योग्य फर्निचर नसल्यामुळे शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत आहे. शाळेतील या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासनाकडे तातडीने विद्युत पुरवठा आणि फर्निचर उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली आहे. "विद्यार्थ्यांच्या हितासाठी या सुविधा प्राधान्याने पूर्ण कराव्यात," अशी मागणी पालकांमधूनही होत आहे. प्रशासक काय म्हणतात? या तक्रारींची दखल घेत तिल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सध्याचे प्रशासक यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले की, "शाळेच्या विकासासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. मागील काही दिवसांत शाळेमध्ये अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित विद्युत फिटिंग आणि फर्निचरचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे." शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन आणि व्यवस्थापन समिती यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्ष सोयीसुविधा कधीपर्यंत उपलब्ध होतात, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- Post by Johney Raiborde1
- Post by कु सुषमा डबराल1
- Post by मनिषा विजय काशीवार4