भोलावडेतील मायलेक एकाच वेळी दहावी पास ;आईला ५१ टक्के तर मुलाला 64.80 टक्के मायलेक एकाच वेळी दहावी पास ;आईला ५१ टक्के तर मुलाला ६४.८० टक्के भोर दि.11 भोलावडे (ता.भोर) येथील गीता रवींद्र डोंबे आणि रुद्र रवींद्र डोंबे या मायलेकराने एकाच वेळी दहावीची बोर्ड परीक्षा पास केली असून शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे दाखवून दिले आहे.या मायलेकराने फेब्रवारी २०२६ मध्ये दहावीची बोर्ड परीक्षा दिली.रुद्र हा राजा रघूनाथराव विद्यालयाचा विद्यार्थी असून त्याची आई गीता या गृहिणी आहेत.मात्र मुलाचा अभ्यास घेताना त्यांना अभ्यासाची गोडी लागली आणि १७ नंबरचा परीक्षा अर्ज भरून दहावीची परीक्षा द्यायची हे ठरले.मायलेक दोघांनी एकमेकांच्या मदतीने शंकांचे निरसन करत एकत्र अभ्यास केला.दहावी बोर्ड परीक्षेत गीता यांना ५१ टक्के तर मुलगा रुद्र याला ६४.८० टक्के गुण मिळाले आहेत.गीता यांना १२ वर्षांपूर्वी घरगुती अडचणींमुळे अर्धवट शिक्षण सोडावे लागले होते.मात्र पती रवींद्र यांची यांची मोलाची साथ आणि सासू तुळसाबाई यांचा पाठिंबा यामुळे हे शक्य झाल्याचे गीता यांनी सांगितले.माय लेकाच्या यशाबद्दल कुटुंबीयांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.राजा रघुनाथराव विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,शिक्षक सोमनाथ कुंभार ,अनिल जावीर ,एम .एम. रंकाळे ,ज्ञानेश्वर शेडगे,कार्यालय प्रमुख अनंता शिर्के यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
भोलावडेतील मायलेक एकाच वेळी दहावी पास ;आईला ५१ टक्के तर मुलाला 64.80 टक्के मायलेक एकाच वेळी दहावी पास ;आईला ५१ टक्के तर मुलाला ६४.८० टक्के भोर दि.11 भोलावडे (ता.भोर) येथील गीता रवींद्र डोंबे आणि रुद्र रवींद्र डोंबे या मायलेकराने एकाच वेळी दहावीची बोर्ड परीक्षा पास केली असून शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे दाखवून दिले आहे.या मायलेकराने फेब्रवारी २०२६ मध्ये दहावीची बोर्ड परीक्षा दिली.रुद्र हा राजा रघूनाथराव विद्यालयाचा विद्यार्थी असून त्याची आई गीता या गृहिणी आहेत.मात्र मुलाचा अभ्यास घेताना त्यांना अभ्यासाची गोडी लागली आणि १७ नंबरचा परीक्षा अर्ज भरून दहावीची परीक्षा
द्यायची हे ठरले.मायलेक दोघांनी एकमेकांच्या मदतीने शंकांचे निरसन करत एकत्र अभ्यास केला.दहावी बोर्ड परीक्षेत गीता यांना ५१ टक्के तर मुलगा रुद्र याला ६४.८० टक्के गुण मिळाले आहेत.गीता यांना १२ वर्षांपूर्वी घरगुती अडचणींमुळे अर्धवट शिक्षण सोडावे लागले होते.मात्र पती रवींद्र यांची यांची मोलाची साथ आणि सासू तुळसाबाई यांचा पाठिंबा यामुळे हे शक्य झाल्याचे गीता यांनी सांगितले.माय लेकाच्या यशाबद्दल कुटुंबीयांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.राजा रघुनाथराव विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,शिक्षक सोमनाथ कुंभार ,अनिल जावीर ,एम .एम. रंकाळे ,ज्ञानेश्वर शेडगे,कार्यालय प्रमुख अनंता शिर्के यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
- भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी विक्रम शिंदे /भोर दि.११ भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.2
- इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते1
- माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती दडपशाहीचा गंभीर आरोप1
- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलिसांनी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात ४ अनधिकृत धार्मिक स्थळे बुलडोझरने जमीनदोस्त केली आहेत. २१ हून अधिक अनधिकृत स्थळे असल्याची माहिती असून, मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने अतिक्रमणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे यातून दिसून येते.1
- महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपांवर साधे पेट्रोल संपल्याचे सांगून ग्राहकांना सक्तीने पॉवर पेट्रोल विकले जात आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक जास्त पैसे मोजावे लागत असून त्यांची फसवणूक होत आहे.1
- पुणे जिल्ह्यातील कुदळवाडीत मध्यरात्री पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने खळबळ उडाली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या नावाने ही मोठी कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.1
- गडचिरोली पोलिसांनी मेंढा येथील एका हत्या प्रकरणाचा १२ तासांत छडा लावला. आरोपींना तातडीने अटक करून गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.1
- पत्रकारावरील हल्ल्याचे निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कापूरहोळ येथील तरुणाने मारली जाळीत उडी पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन विक्रम शिंदे /भोर दि.११ पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी कापूरहोळ (ता.भोर) येथील पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी सोमवार (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जाळीत उडी मारत अनोखे आंदोलन केले. २८ एप्रिल २०२६ रोजी कापूरव्होळ येथील हायवेवरील अतिक्रमण कारवाईचे मोबाईलवर चित्रीकरण करत असताना हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद दळवी, त्यांचा मुलगा व अन्य दोघांनी मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप पाचकाळे यांनी केला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून, हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने संज्ञेय गुन्हा दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच स्वतःस व कुटुंबास संरक्षण देण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.1