logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक:आदिवासी मुलींसाठी सैन्य-पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी मुलींना सैन्य व पोलीस दलात प्रवेशासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेठ रोड, नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात (सत्र क्र. १०१) हे प्रशिक्षण होणार असून अर्ज करण्याची मुदत ६ ते २४ मार्च २०२६ अशी आहे. किमान १२ वी उत्तीर्ण, अनुसूचित जमाती प्रवर्गातील १८ ते २५ वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. उंची किमान १५० सें.मी. व वजन ४८ किलो आवश्यक आहे. २५ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता शारीरिक व बौद्धिक चाचणी होणार असून अधिक माहितीसाठी ९४२०२६९०२३ किंवा ८००७९८०९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

23 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
23 hrs ago
d964c97c-4b0e-40b3-843e-3134276dc8ca

नाशिक:आदिवासी मुलींसाठी सैन्य-पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी मुलींना सैन्य व पोलीस दलात प्रवेशासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेठ रोड, नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात (सत्र क्र. १०१) हे प्रशिक्षण होणार असून अर्ज करण्याची मुदत ६ ते २४ मार्च २०२६ अशी आहे. किमान १२ वी उत्तीर्ण, अनुसूचित जमाती प्रवर्गातील १८ ते २५ वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. उंची किमान १५० सें.मी. व वजन ४८ किलो आवश्यक आहे. २५ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता शारीरिक व बौद्धिक चाचणी होणार असून अधिक माहितीसाठी ९४२०२६९०२३ किंवा ८००७९८०९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिकमधील रामकुंड येथे काल घडलेली घटना संतापजनक असल्याची प्रतिक्रिया गोदाप्रेमींनी व्यक्त केली आहे. श्री गोदावरी नदीला आईचा दर्जा दिला जातो. मात्र महिला दिनाच्या दिवशी कुंडात चप्पल फेकून नदीच्या पवित्रतेचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नाशिककरांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून संबंधित व्यक्तींची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याने प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
    1
    नाशिकमधील रामकुंड येथे काल घडलेली घटना संतापजनक असल्याची प्रतिक्रिया गोदाप्रेमींनी व्यक्त केली आहे. श्री गोदावरी नदीला आईचा दर्जा दिला जातो. मात्र महिला दिनाच्या दिवशी कुंडात चप्पल फेकून नदीच्या पवित्रतेचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नाशिककरांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून संबंधित व्यक्तींची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याने प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • ठाणे: शहापूर तालुक्यातील भावसे गावात ८३ वर्षा पासुन रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिफनाथ महाराज सिध्द समाधी मंदीर (कोकण मढी) येथे मंदीराचे मुख्य पुजारी गुरूवर्य प्रभाकर महाराज गोदडे यांच्या मार्गर्दर्शानाने यात्राउत्सवाला सुरूवात झाली सकाळी समाधी अभिषेक झालं त्या नंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम व पारंपारीक देव गाण्याचा कार्यक्रम पारपडला सायंकाली नाथसरकार ढोलताशा पथक , कानीफनाथ सेवा मंडळ पारंपारीक भजन व बॅान्जोच्या गजरात पालखी छबिणा सोहळा व नाथांच्या मानाच्या काठ्या व ताईत भरण्याचा कार्यक्रम पारपडला तसेच गाव कमीटीने लावणीचा कार्यक्रम आयेजीत केला होता यात्रे साठी शेकडो दुकानदार व्यावसायीक आले होते . ठाणे , पालघर व मुंबई जिल्ह्यातील हाजारो भावीकांनी दर्शन घेतला.
    3
    ठाणे: शहापूर तालुक्यातील भावसे गावात ८३ वर्षा पासुन रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिफनाथ महाराज सिध्द समाधी मंदीर (कोकण मढी) येथे  मंदीराचे मुख्य पुजारी गुरूवर्य प्रभाकर महाराज गोदडे यांच्या मार्गर्दर्शानाने  यात्राउत्सवाला सुरूवात झाली सकाळी  समाधी अभिषेक झालं त्या नंतर नवस फेडण्याचा  कार्यक्रम व पारंपारीक देव गाण्याचा कार्यक्रम पारपडला सायंकाली  नाथसरकार ढोलताशा पथक , कानीफनाथ सेवा मंडळ पारंपारीक भजन व बॅान्जोच्या गजरात पालखी छबिणा सोहळा  व नाथांच्या मानाच्या काठ्या  व ताईत भरण्याचा कार्यक्रम पारपडला तसेच गाव कमीटीने  लावणीचा कार्यक्रम आयेजीत केला होता  यात्रे साठी शेकडो दुकानदार  व्यावसायीक आले होते . ठाणे , पालघर व मुंबई जिल्ह्यातील हाजारो भावीकांनी दर्शन घेतला.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • येवला शहरात चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, आता भरवस्तीतही नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नांदगाव बायपासलगत असलेल्या रमणपार्क सोसायटीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून मोठ्या रकमेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, पीडित कुटुंब प्रसूतीसाठी दवाखान्यात गेलेले असताना ही घटना घडली. ​मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी रवी पवार हे आपल्या गर्भवती पत्नीला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पवार यांनी आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ​दवाखान्यातून परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले पाहून पवार कुटुंबाला धक्काच बसला. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, "पोलिसांचा वचक संपला आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका गरीब कुटुंबाने अडचणीच्या काळासाठी साठवलेला पैसा चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येवला शहरात चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, आता भरवस्तीतही नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नांदगाव बायपासलगत असलेल्या रमणपार्क सोसायटीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून मोठ्या रकमेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, पीडित कुटुंब प्रसूतीसाठी दवाखान्यात गेलेले असताना ही घटना घडली.
​मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी रवी पवार हे आपल्या गर्भवती पत्नीला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पवार यांनी आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
​दवाखान्यातून परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले पाहून पवार कुटुंबाला धक्काच बसला. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, "पोलिसांचा वचक संपला आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका गरीब कुटुंबाने अडचणीच्या काळासाठी साठवलेला पैसा चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • कल्याण कडून भिवंडी कडे जाणाऱ्या कोनगाव टोल नाका या मेन रोडला येना जाणाऱ्या प्रवाशांकडून कचऱ्याचे साम्राज्य उभे करण्यात येत आहे यातून माणसांना आजारी पडण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्वरित यावर लक्ष घालून हा कचरा उचलण्यात यावा अशी मी ग्रामपंचायत कोनगाव यांना विनंती करत आहे 🙏
    1
    कल्याण कडून भिवंडी कडे जाणाऱ्या कोनगाव टोल नाका या मेन रोडला येना जाणाऱ्या प्रवाशांकडून कचऱ्याचे साम्राज्य उभे करण्यात येत आहे यातून माणसांना आजारी पडण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्वरित यावर लक्ष घालून हा कचरा उचलण्यात यावा अशी मी ग्रामपंचायत कोनगाव यांना विनंती करत आहे 🙏
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था राहुरी (प्रतिनिधी): राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
    1
    राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था
राहुरी (प्रतिनिधी):
राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली.
ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली.
या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    22 hrs ago
  • गाज़ियाबाद के नंदग्राम में हिंदू परिवार पर हमला, पीड़ितों ने मुस्लिम समुदाय के कुछ लोगों पर लगाया आरोप
    1
    गाज़ियाबाद के नंदग्राम में हिंदू परिवार पर हमला, पीड़ितों ने मुस्लिम समुदाय के कुछ लोगों पर लगाया आरोप
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • वीडियो में जो दिख रहा है मंदिरों की सच्चाई है आस्था के साथ ऐसे ही खिलवाड़ किया जाता है कुछ लोगों के द्वारा रामगढ़ ज़िला के प्रसिद्ध सिद्धपीठ रजरप्पा मंदिर का यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। बताया जा रहा है कि एक श्रद्धालु अपने पूरे परिवार के साथ माता का दर्शन करने आया था। तभी सुरक्षा में लगे जवानों के साथ उसकी बकझक हुई और पुलिस वालों ने परिवार के सामने ही उसकी पिटाई कर दी। स्थानीय लोगों ने पूरे मामले की जांच करवाने और दोषियों पर कारवाई करने की मांग की है। वर्दी के आड़ में गुंडा गर्दी करते है ओर बदनाम पूरा डिपार्टमेंट होता है।
    1
    वीडियो में जो दिख रहा है मंदिरों की सच्चाई है आस्था के साथ ऐसे ही खिलवाड़ किया जाता है कुछ लोगों के द्वारा 
रामगढ़ ज़िला के प्रसिद्ध सिद्धपीठ रजरप्पा मंदिर का यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। बताया जा रहा है कि एक श्रद्धालु अपने पूरे परिवार के साथ माता का दर्शन करने आया था। तभी सुरक्षा में लगे जवानों के साथ उसकी बकझक हुई और पुलिस वालों ने परिवार के सामने ही उसकी पिटाई कर दी। स्थानीय लोगों ने पूरे मामले की जांच करवाने और दोषियों पर कारवाई करने की मांग की है। 
वर्दी के आड़ में गुंडा गर्दी करते है ओर बदनाम पूरा डिपार्टमेंट होता है।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • ठाणे:मुसईवाडी येथील पाणी पुरवठा योजना एक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे पाण्यासाठी वन वन फिरावं लागणाऱ्या मुसई वाडी येथील महिलांनी योजना तातडीने कार्यान्वित करण्यात यावी, व जलजीवन योजनेचे कामही तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी पंचायत समितीला घेराव घातला. उन्हाचा पारा चढला असून आतापासूनच मुसईवाडीतील महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन योजना असूनही हंडाभर पाण्यासाठी महिला वणवण करत असून त्यांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे. योजना तातडीने सुरू करण्यात याव्यात यासाठी काँग्रेस कार्यकर्ते अन्वर शेख यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन जागे होत नसल्याने आज महिलांनी पंचायत समितीला घेराव घातला. आदिवासी महिलांचे आक्रमक रूप पाहून गटविकास अधिकारी राठोड यांनी येत्या चार दिवसाच्या आत पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र येत्या दहा दिवसात मुसईवाडी येथील पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर सर्व महिलांना सोबत घेऊन आमरण उपोषणाचा इशारा काँग्रेसचे तालूका उपाध्यक्ष अन्वर शेख यांनी दिला आहे. महिलांच्या घेराव आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अन्वर शेख, काँग्रेसचे सरचिटणीस प्रसाद दुमाडे व सचिन वाख यांनी केले
    2
    ठाणे:मुसईवाडी येथील पाणी पुरवठा योजना एक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे पाण्यासाठी वन वन फिरावं लागणाऱ्या मुसई वाडी येथील महिलांनी योजना तातडीने कार्यान्वित करण्यात यावी, व जलजीवन योजनेचे कामही तातडीने सुरू करण्यात यावे  यासाठी पंचायत समितीला घेराव घातला.  
उन्हाचा पारा चढला असून आतापासूनच मुसईवाडीतील महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन योजना असूनही हंडाभर पाण्यासाठी महिला वणवण करत असून त्यांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे. योजना तातडीने सुरू करण्यात याव्यात यासाठी काँग्रेस कार्यकर्ते अन्वर शेख यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन जागे होत नसल्याने आज महिलांनी पंचायत समितीला घेराव घातला. आदिवासी महिलांचे आक्रमक रूप पाहून गटविकास अधिकारी राठोड यांनी येत्या चार दिवसाच्या आत पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र येत्या दहा दिवसात मुसईवाडी येथील पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर सर्व महिलांना सोबत घेऊन आमरण उपोषणाचा इशारा काँग्रेसचे तालूका उपाध्यक्ष  अन्वर शेख यांनी दिला आहे. महिलांच्या घेराव आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अन्वर शेख, काँग्रेसचे सरचिटणीस प्रसाद दुमाडे व सचिन वाख यांनी केले
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नगर जिल्ह्यातील घटना मेंढपाळ बांधवाला शिवीगाळ व मारहाण
    1
    नगर जिल्ह्यातील घटना मेंढपाळ बांधवाला शिवीगाळ व मारहाण
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.