logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्रावण मास कावड यात्रेची तयारी पूर्ण गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीपासून कावड यात्रेला प्रारंभ कोल्हापूर : मोठी आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या आणि धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या येथील श्री एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून या कावड यात्रेची जय्यत तयारी सुरू होती. श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कावड यात्रा काढण्यात येणार असून, गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडीद्वारे आणून शिवचरणी अर्पण करण्यात येणार आहे. गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पंचगंगा नदी येथे पूजन करून कावड यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर गंगावेस येथील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गुजरी, जैन मंदिर, महाद्वार रोड, श्री अंबाबाई मंदिर, बिनकामे गणेश मंदिर मार्गे कावड यात्रा श्री एकमुखी दत्त मंदिरात पोहोचेल. तेथे सामुदायिक आरती व प्रसादाने यात्रेचा समारोप होणार आहे. कावड यात्रा मार्गावर गुजरी मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी भक्त मंडळ यांच्यासह विविध संस्था व संघटनांच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात येणार आहे. या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवावी आणि कोल्हापूरची आध्यात्मिक ओळख अधिक व्यापक व अधोरेखित करावी, असे आवाहन मठाधिपती श्री संतोष गिरी गोसावी महाराज यांच्या प्रेरणेने पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी सागर ठाणेकर सह संयोजकांनी केले आहे.

2 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
c97ba71f-609e-4655-a86c-c9d425abed3c

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.
    1
    विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे 
इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.
    user_SUBHAN FAKIR PRESS
    SUBHAN FAKIR PRESS
    Photographer हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पेणमध्ये संभाजी महाराजांच्या लो-पॉली शिल्पावरून संताप; अभियंत्याच्या निलंबनाची मागणी
    1
    पेणमध्ये संभाजी महाराजांच्या लो-पॉली शिल्पावरून संताप; अभियंत्याच्या निलंबनाची मागणी
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे विक्रम शिंदे /भोर दि. 26 राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.
    1
    शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे 
विक्रम शिंदे /भोर दि. 26
राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • "आपल्यावर नाराज आहेत.., मागे शिव्या देत असतील 100 जण... आपल्यासमोर आल्यावर..!"
    1
    "आपल्यावर नाराज आहेत.., मागे शिव्या देत असतील 100 जण... आपल्यासमोर आल्यावर..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    15 min ago
  • शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन सराईत चटक्यांना अटक करत १८,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
    1
    शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन सराईत चटक्यांना अटक करत १८,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.
    1
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अकोटमध्ये बाइक चोरांचा पर्दाफाश! दोन आरोपी ताब्यात, ८ चोरीच्या दुचाकी जप्त
    1
    अकोटमध्ये बाइक चोरांचा पर्दाफाश! दोन आरोपी ताब्यात, ८ चोरीच्या दुचाकी जप्त
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    1
    अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या  पत्रकार परिषद..
बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना 
तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.