Shuru
Apke Nagar Ki App…
धुळे–शिरपूर महामार्गावर गोराणे फाट्याजवळ ट्रकला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प धुळे–शिरपूर महामार्गावरील गोराने फाट्याजवळ आज दुपारी सुमारे ३.३० वाजेच्या सुमारास बॅटरी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात घबराट पसरली आणि महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.
Dhule News 24

More news from महाराष्ट्र and nearby areas
- होळी आणि गुढीपाडवा या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तब्बल ४० वर्षांपासून मुस्लिम कारागीर हिंदू सणांसाठी ‘हार कंगन’ तयार करत आहेत. रमजानचे रोजे सुरू असतानाही मुस्लिम बांधव या पारंपरिक गोड पदार्थाच्या निर्मितीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.1
- 🏛️✅🙏💯परिवहन विभागाने निर्णय घेतल्याने दिसून येत आहेत🏛️✅🙏💯1
- येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती येवला (प्रतिनिधी): थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली. प्रतिनिधी सचिन वखारे येवला4
- सिल्लोड तालुक्यातील अंभई घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातामागे भाजपचा केंद्रीय मंत्री मास्टरमाईड आहे का?दीपक केदार यांचा आरोप :रोहित पवार यांच्या प्रश्नाचे उत्तर भाजपचे नवनाथ बन आणि भातळकर का देताय असा प्रश्न दीपक केदार यांनी उपस्थित केला आहे1
- Post by AMJ NEWS1
- धुळे–शिरपूर महामार्गावरील गोराने फाट्याजवळ आज दुपारी सुमारे ३.३० वाजेच्या सुमारास बॅटरी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात घबराट पसरली आणि महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.1