logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बाबुराव नगरच्या रस्त्यांची दुरवस्था; ग्रामपंचायतीवर मोर्चाचा इशारा 15 ते 20 हजार लोकसंख्येच्या परिसरातील नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडून दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचा दावा शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बाबुराव नगर परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, बंदिस्त गटार योजनेतील बिघाड आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रश्न तातडीने न सोडवल्यास ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच नितीन बोऱ्हाडे यांनी दिला आहे. बाबुराव नगरमध्ये सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्या वास्तव्यास असून, या परिसरातून सर्वाधिक कर वसूल केला जातो. मात्र त्यानुसार मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप बोऱ्हाडे यांनी केला. परिसरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बंदिस्त गटार योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असला तरी ती सध्या नादुरुस्त अवस्थेत असून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या रस्त्यांवरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून अनेकांना किरकोळ दुखापती झाल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. "नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला जातो, मात्र त्याच्या बदल्यात आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीत. रस्ते आणि गटारांची तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा नागरिकांचा भव्य मोर्चा ग्रामपंचायतीवर काढण्यात येईल," असा इशारा नितीन बोऱ्हाडे यांनी दिला. दरम्यान, या संदर्भात उपसरपंच संजय शिंदे यांनी ग्रामपंचायतीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, बाबुराव नगरातील बंदिस्त गटार योजनेचा पाइप अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे दाबला गेल्याने गटार लाईन चोकअप झाली आहे. त्यामुळे सांडपाणी चेंबरमधून बाहेर येऊ लागले. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गेल्या चार दिवसांपासून अहोरात्र काम सुरू असून, ब्रेकरच्या सहाय्याने रस्ता फोडून सुमारे 150 फूट नवीन गटार लाईन मोकळी करण्यात आली आहे. उद्यापासून नवीन पाइप टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार असून पुढील दोन दिवसांत गटार योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा शिंदे यांनी केला. या कामांमुळे स्थानिक नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होत असल्याची जाणीव ग्रामपंचायतीला असून, समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

16 hrs ago
user_Satish Dhumal
Satish Dhumal
Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
16 hrs ago

बाबुराव नगरच्या रस्त्यांची दुरवस्था; ग्रामपंचायतीवर मोर्चाचा इशारा 15 ते 20 हजार लोकसंख्येच्या परिसरातील नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडून दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचा दावा शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बाबुराव नगर परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, बंदिस्त गटार योजनेतील बिघाड आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रश्न तातडीने न सोडवल्यास ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच नितीन बोऱ्हाडे यांनी दिला आहे. बाबुराव नगरमध्ये सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्या वास्तव्यास असून, या परिसरातून सर्वाधिक कर वसूल केला जातो. मात्र त्यानुसार मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप बोऱ्हाडे यांनी केला. परिसरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बंदिस्त गटार योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असला तरी ती सध्या नादुरुस्त अवस्थेत असून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या रस्त्यांवरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून अनेकांना किरकोळ दुखापती झाल्याचा दावा

3e7ddadb-7844-4029-bca7-a9d18bfa86da

त्यांनी केला. भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. "नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला जातो, मात्र त्याच्या बदल्यात आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीत. रस्ते आणि गटारांची तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा नागरिकांचा भव्य मोर्चा ग्रामपंचायतीवर काढण्यात येईल," असा इशारा नितीन बोऱ्हाडे यांनी दिला. दरम्यान, या संदर्भात उपसरपंच संजय शिंदे यांनी ग्रामपंचायतीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, बाबुराव नगरातील बंदिस्त गटार योजनेचा पाइप अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे दाबला गेल्याने गटार लाईन चोकअप झाली आहे. त्यामुळे सांडपाणी चेंबरमधून बाहेर येऊ लागले. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गेल्या चार दिवसांपासून अहोरात्र काम सुरू असून, ब्रेकरच्या सहाय्याने रस्ता फोडून सुमारे 150 फूट नवीन गटार लाईन मोकळी करण्यात आली आहे. उद्यापासून नवीन पाइप टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार असून पुढील दोन दिवसांत गटार योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा शिंदे यांनी केला. या कामांमुळे स्थानिक नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होत असल्याची जाणीव ग्रामपंचायतीला असून, समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • "कचरा संकलन केंद्र हटवण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर...!"
    1
    "कचरा संकलन केंद्र हटवण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लाईव्ह योवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संदेश दिला
    1
    पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लाईव्ह योवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संदेश दिला
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Artist Haveli, Pune•
    13 hrs ago
  • अनधिकृत बांधकामांवर कारवाईची; सुरुवात माझ्यापासून करा - आमदार सुनील शेळके... मावळ पुणे : मावळातील तळेगाव दाभाडे शहराच्या व्हिजन २०३५ अंतर्गत शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नैसर्गिक नाले-ओढ्यांवरील अडथळे हटविणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावत, "माझेही कोणते बांधकाम अनधिकृत असेल तर तेही पाडा; कारवाईची सुरुवात माझ्यापासून करा," अशी स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती गंभीर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली... : सुनील शेळके, आमदार मावळ #SunilShelke #Maval #TalegaonDabhade #Vision2035 #अनधिकृतबांधकाम #अतिक्रमण #कारवाई #तळेगावदाभाडे #मावळ #सुनीलशेळके #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #TheNayakNews #LocalNews #Development #UrbanPlanning #SmartCity #PoliticalNews #LatestNews
    1
    अनधिकृत बांधकामांवर कारवाईची; सुरुवात माझ्यापासून करा - आमदार सुनील शेळके...
मावळ पुणे :
मावळातील तळेगाव दाभाडे शहराच्या व्हिजन २०३५ अंतर्गत शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नैसर्गिक नाले-ओढ्यांवरील अडथळे हटविणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावत, "माझेही कोणते बांधकाम अनधिकृत असेल तर तेही पाडा; कारवाईची सुरुवात माझ्यापासून करा," अशी स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती गंभीर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली...
: सुनील शेळके, आमदार मावळ
#SunilShelke #Maval #TalegaonDabhade #Vision2035 #अनधिकृतबांधकाम #अतिक्रमण #कारवाई #तळेगावदाभाडे #मावळ #सुनीलशेळके #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #TheNayakNews #LocalNews #Development #UrbanPlanning #SmartCity #PoliticalNews #LatestNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मांजरी बुद्रुक रास्ता रोको आंदोलन जनता अदालतला न्यूज मांजरी बुद्रुक पुणे
    1
    मांजरी बुद्रुक रास्ता रोको आंदोलन जनता अदालतला न्यूज मांजरी बुद्रुक पुणे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • दिनांक 2/8/2026 आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची? काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडल्यानंतर एक दिवस पाणी आलं. आम्हाला वाटलं आता समस्या सुटली. पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा पाणी आलंच नाही. आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची?
    1
    दिनांक 2/8/2026 आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची? 
काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडल्यानंतर एक दिवस पाणी आलं. आम्हाला वाटलं आता समस्या सुटली. पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा पाणी आलंच नाही.
आज पुन्हा दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी भरावं लागलं. ही परिस्थिती किती दिवस सहन करायची?
    user_Yuvraj Upade
    Yuvraj Upade
    Pimpri Chanchwad, Pune•
    17 hrs ago
  • कृषिमंत्र्यांच्या हस्ते कृषी यंत्र यंत्रसामग्रीच वितरण....मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मारला छोट्या पॉवर टिलर वरून फेरफटका
    1
    कृषिमंत्र्यांच्या हस्ते कृषी यंत्र यंत्रसामग्रीच वितरण....मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मारला छोट्या पॉवर टिलर वरून फेरफटका
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • "इथे नाना पटोलेच स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेतायेत...!"
    1
    "इथे नाना पटोलेच स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेतायेत...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात मोठ्या उत्साहात स्वागत. कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात मोठ्या उत्साहात स्वागत लोणंद शहरात पंढरपूर ते आळंदी परतीच्या प्रवासात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन ऑगस्ट रोजी साडेतीन वाजता लोणंद निरा रोडवर सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या समोर दर्शनासाठी काही काळ थांबला होता यावेळी महिला पुरुष आभाळवृद्ध ग्रामस्थ सोलापूर पोलीस व सातारा पोलीस यंत्रणेने लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही
    1
    कैवल्य साम्राज्य  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात  मोठ्या उत्साहात स्वागत.
कैवल्य साम्राज्य  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात  मोठ्या उत्साहात स्वागत
लोणंद शहरात पंढरपूर ते आळंदी परतीच्या प्रवासात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन ऑगस्ट रोजी साडेतीन वाजता लोणंद निरा रोडवर सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या समोर दर्शनासाठी काही काळ थांबला होता यावेळी महिला पुरुष आभाळवृद्ध ग्रामस्थ सोलापूर पोलीस व सातारा पोलीस यंत्रणेने लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात वहुन निघल . Watch full video
    1
    पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात
पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात वहुन निघल .
Watch full video
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.