मुखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; रेबीजने एका रुग्णाचा बळी! शहरात भीतीचे वातावरण; तात्काळ बंदोबस्त करण्याची ‘IMA’ मागणी मुखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; रेबीजने एका रुग्णाचा बळी! शहरात भीतीचे वातावरण; तात्काळ बंदोबस्त करण्याची ‘IMA’ मागणी मुखेडची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी मुखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, कुत्र्यांच्या चाव्यामुळेरेबीज (Rabies) सारख्या जीवघेण्या आजाराने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तात्काळपावले उचलण्याची मागणी भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) मुखेड शाखेने केली आहे. ‘आयएमए‘ने मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मागील आठवड्यात एका रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांच्या संघटनेने थेट पत्राद्वारे ही माहिती दिल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होत आहे. रस्त्यारस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या वावरत असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. विशेषतः शाळेत जाणारी मुले आणि पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या वृद्धांच्या जीवाला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. रेबीज हा अत्यंत घातक आजार असून वेळेत बंदोबस्त न झाल्यास अजून बळीजाण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी नगर परिषदेने तातडीने नियमाप्रमाणे याभटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ‘आयएमए‘ मुखेडचे अध्यक्ष डॉ. अशोक कौरवार, सचिव डॉ. कैलास पाटील ,डॉ रामराव श्रीरामे,डॉ पत्की आणि युवा उद्योजक कृष्णा देबडवार यांनी केली आहे.

- Post by Mohammad Rafikh1
- देविदास गुरधाळे मामांच्या समरणार्थ 92 फुटी अस्थी विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे रस्ते विकास महामंडळाचे MD डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देविदास गुरधाळे मामा यांच्या समरणार्थ डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने भव्य अस्थी विसर्जन घाट सोबतच मनोहरी गार्डन, पूजा विधिसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिव मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. या भव्य कार्याचा भूमिपूजन समारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळी सलगरा येथील ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात कुठेही अस्थी विसर्जन घाट, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट नाही. यासाठी जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर नाशिक येथे जावे लागते. धोबी घाट नसल्याने दगडावरून पडल्याने अपघाताच्या घटना येथे घडल्या होत्या. गावाकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवाकुंड ट्रस्टकडे ही मागणी केली. सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या गायकवाड यांनी देविदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक बांधण्याची घोषणा केली. या मध्ये अस्थी विसर्जन घाट, गार्डन, शिव मंदिर, सांभामंडप, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट उभारण्याचा निर्णय घेतला. सेवाकुंडचे पदाधिकारी स्वतः इंजिनियर असलेले दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- Post by विलास बारहाते1
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सोमवारी दिग्रसच्या बीएसएनएल टॉवरवर चढून विविध मागण्यांसाठी वीरूगिरी आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी चौथ्या दिवशी रात्री तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. श्याम गायकवाड याने इसापूर ग्रामपंचायतसंदर्भात विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. सोमवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन चौथ्या दिवशी सायंकाळीदरम्यान सोडवण्यात आले. वादळी पावसातही आंदोलन सुरूच होते. दरम्यान गायकवाडवर मधमाश्यांनी हल्ला चढविला.1
- Post by Mohammad Rafikh1
- Post by विलास बारहाते1
- Post by AapTak Hindi News Channel1