Drowning Death: मृत्यूचा 'ब्लॅक वीक'! केपेतील कालव्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू; आठवड्यात 8 बळी गेल्याने खळबळ /पणजी: गेल्या रविवारी कुडचडे येथील दोन भावंडांचा बेतुल येथील नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी बबरूमड्डी-केपे येथे कालव्यात बुडून इग्नेशियस शेरी फर्नाडिस (२२, फातोर्डा-मडगाव) आणि त्याचा मित्र हर्षित (२१, मूळ उत्तराखंड) या दोघांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांत या दोघांसह एकूण आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कुशावती नदी तसेच जलस्रोत खात्याच्या कालव्यात रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेकजण आंघोळीसाठी येतात. इग्नेशियस आणि हर्षित हे दोघेही आंघोळीसाठीच बबरूमड्डी-केपे येथील मुख्य कालव्यात आले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचाही कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती केपे पोलिसांनी दिली. कालव्याच्या एका बाजूला दोन मृतदेह तरंगताना आढळल्याचे एका स्थानिकाच्या निदर्शनास आले. त्याने तत्काळ केपे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुडचडे अग्निशामक दलाला पाचारण केले. आई-बहिणीला धक्का: इंग्रजेवाडा-फातोर्डा येथील इग्नेशियस शेरी फर्नांडिस हा होतकरू मुलगा होता. तो माजोर्डा येथील आयटीसी हॉटेलमध्ये कार्यरत होता. त्याचे वडील हयात नसून त्याच्या पश्चात आई व एक बहीण असा परिवार आहे. त्या दोघींची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी समजताच फातोर्डा परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इग्नेशियसच्या मृत्यूमुळे त्याच्या आई व बहिणीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. *जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष* गेल्या रविवारी बेतुल येथे बुडून भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी समुद्र, नद्या तसेच इतर पाणवठ्यांवरील धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी न उतरावे, अशा सूचना नागरिक व पर्यटकांना दिल्या होत्या. तसेच अशा ठिकाणी धोक्याचे फलक लावण्याचे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, संबंधितांकडून या प्रक्रियेला गती मिळालेली नसल्याने नागरिक व पर्यटक अशा ठिकाणी आंघोळीसाठी जात असल्याचे दिसून येते. इग्नेशियस व हर्षित यांचा ज्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला, तेथेही धोक्याचा कोणताही इशारा फलक नव्हता. फक्त पूल कमकुवत असल्याने त्यावरून वाहने नेऊ नयेत, असा फलक होता. उपनिरीक्षक दिगंबर बोद्रे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रविवारी तसेच इतर सुट्टीच्या दिवशी पोलिस अशा भागांत गस्त घालतात. धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते. मात्र, अशा ठिकाणी २४ तास बंदोबस्त ठेवणे शक्य नसते.

- आमदार निलेश राणे यांनी आज विविध प्रकरणांच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्यावरील केसेसची माहिती दिली, तसेच आमदार वैभव नाईक आणि रोहित पवार यांच्या वक्तव्यावर परखड भाष्य केले. न्यायालयात तीन वेगवेगळ्या प्रकरणांवर सुनावणी आज न्यायालयात आमदार निलेश राणे यांच्याशी संबंधित तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर तारखा होत्या. याबद्दल माहिती देताना राणे म्हणाले की, "आज एकूण तीन विषयांवर न्यायालयात सुनावणी होती. यात प्रामुख्याने हायवेवर करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणा संदर्भातील आंदोलन, आम्ही काढलेली 'संविधान रॅली' आणि मालवण येथे माझ्यावर दाखल झालेली वैयक्तिक केस यांचा समावेश होता. मालवणच्या केसची आज पहिलीच तारीख होती आणि ती आज 'स्टँड' झाली आहे." वैभव नाईक आणि टोल नाका: "पैसे काढण्याची ही जुनी स्टाईल" कणकवली ओसरगाव येथील टोल नाक्याच्या मुद्द्यावरून निलेश राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. टोलचे बांधकाम नितीन गडकरींच्या आगमनामुळे झालेले नसून ते दीड-दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राणे म्हणाले: "टोल नाक्याच्या कामावर त्यांचा डोळा आहे. आंदोलनाची धमकी द्यायची, पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि कॉन्ट्रॅक्टर घाबरला की त्याला जवळ करायचे, ही वैभव नाईकांची जुनी स्टाईल आहे. एकदा का कॉन्ट्रॅक्टरकडून 'तडजोड' झाली की उद्या वैभव नाईक स्वतःहून टोल हवा आहे असे सांगतील. त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही." रोहित पवारांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता, निलेश राणे यांनी सावध भूमिका घेतली. "मी त्यांचे नेमके स्टेटमेंट अद्याप बघितलेले नाही. ते कोणत्या संदर्भात आणि काय बोलले आहेत, याची पूर्ण माहिती नसल्यामुळे मी त्यावर सध्या कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. 3
- विक्रम शिंदे /भोर दि.२२ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या मात्र पैकी २४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने तालुक्यातील रावडी , अंगसुळे ,खडकी या ३ ग्रामपंचायतीसाठी पोट निवडणूक येत्या २८ होत आहे.या निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज (दि.22) पंचायत समिती भोर येथे पार पडले.रावडी आणि खडकी येथे सरपंचपदासाठी तर खडकी येथे केवळ एका वॉर्डमधील केवळ एका सदस्यपदासाठी ही पोट निवडणूक होत असल्याचे निवासी नायब तहसीलदार महसूल वैशाली घोरपडे यांनी सांगितले.1
- Post by मन्सूर शेख1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- सोलापूर शहरात आज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत काँग्रेस व खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना आपण आंदोलन का करतो याची माहिती तरी घ्यायची होती. वास्तव असे आहे की, महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले होते. या विधेयकाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांचा ठाम पाठिंबा होता. त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि १६ एप्रिल २०२६ रोजी मोदी सरकारने त्याची अधिसूचना देखील जारी केली. त्यामुळे महिला आरक्षणाचा कायदा अस्तित्वात असून तो केवळ अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे, ही बाब भाजयुमो कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. याउलट, अलीकडेच केंद्र सरकारने संसदेत मांडलेले विधेयक हे महिला आरक्षणाशी संबंधित नसून १३१ वी घटनादुरुस्ती अर्थात परिसीमन म्हणजेच (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक होते. या विधेयकाच्या माध्यमातून उत्तरेकडील राज्यांतील खासदारांची संख्या वाढवून देशावर कायम सत्ता गाजविण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत हे विधेयक फेटाळून लावले. भाजपला महिला आरक्षणाची एवढीच काळजी असेल तर १६, १७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या विशेष अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी स्पष्टपणे मागणी केली की, २०२३ मध्ये मंजूर झालेला महिला आरक्षण कायदा तात्काळ लागू करावा. मात्र, सरकारकडून अद्याप त्याबाबत ठोस अंमलबजावणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. जर खरोखरच महिलांच्या सक्षमीकरणाची काळजी असेल, तर आधीच मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकारवर दबावासाठी आंदोलन करणे अधिक योग्य ठरेल. गेल्या बारा वर्षांपासून विविध आश्वासनांच्या आधारे जनतेला दिशाभूल करण्याचे प्रयत्न झाले असले, तरी आता नागरिक अधिक सजग झाले आहेत. त्यामुळे आत्ता भाजपच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. लवकरच महिला आणि जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील.1
- पिंपरी चिंचवड :- महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आरटीई RTE प्रवेश प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. शहराचे तापमान ४२ अंशांवर गेलेले असताना, भर उन्हात ताटकळत उभे राहूनही पालकांच्या पदरी निराशा पडत आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के अर्जांचा निपटारा झाला असून, या विलंबाबाबत राज्य शासनाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे... आकुर्डीतील कै. फकीर भाई पानसरे उर्दू शाळा आणि पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्र या दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन केंद्रांवर मिळून केवळ १,१९४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. समितीने मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दरम्यान राज्य शिक्षण विभागाने याची दखल घेतली असून, महापालिकेला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन पालकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....2
- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आज कुडाळ दिवाणी न्यायालयात हजेरी लावली. 'संविधान बचाव' आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या एका खटल्याप्रकरणी ही हजेरी होती. न्यायालयीन प्रक्रियेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय प्रश्नांपासून ते कोकणच्या विकासकामांपर्यंत विविध विषयांवर आपली रोकठोक भूमिका मांडली. 'संविधान बचाव' केस: अंतिम निकालाकडे लक्ष न्यायालयात हजेरी लावल्यानंतर दरेकर म्हणाले की, "संविधान बचाव संदर्भात आम्ही जे आंदोलन केले होते, त्यावेळची ही केस आहे. कामाच्या व्यापामुळे आम्हा सर्व आंदोलनकर्त्यांना प्रत्येक वेळी एकत्र येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने आज सर्वांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज आम्ही हजेरी लावली असून, आता ही केस अंतिम निकालासाठी आली आहे." कोकणात म्हाडा घरांचे जाळे विणणार कोकणातील म्हाडा प्रकल्पांच्या विलंबाबाबत विचारले असता दरेकरांनी सकारात्मक आश्वासन दिले. "कोकणात म्हाडाची घरे उभारण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. विशेषतः पर्यटन केंद्रांच्या (Tourist Centers) आसपास म्हाडाची घरे उभी करता येतील. या संदर्भात मी निश्चितपणे चौकशी करून, स्वतः साईटवर जाऊन पाहणी करेन. कोकणवासीयांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे कशी मिळतील, याची पूर्ण काळजी शासन घेईल," असे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवारांवर टीका: "लोकांचे मत की तुमचे?" २०२९ च्या बारामती निवडणुकीत 'पवार विरुद्ध पवार' संघर्ष नको, असे लोकांचे मत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले होते. यावर दरेकर कडाडले. ते म्हणाले, "लोकांचे मत म्हणजे काही रोहित पवार यांचे मत नव्हे. हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. मात्र, स्वतःच्या मनातील गोष्टी लोकांच्या नावावर ढकलणे त्यांनी थांबवावे." टोलचा प्रश्न आणि वैभव नाईक यांचा समाचार मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावरून सुरू असलेल्या वादावर दरेकर म्हणाले की, "राज्यात टप्प्याटप्प्याने टोलमाफी सुरू आहे. मुंबईतील टोल बंद झाले आहेत. राज्याची एकूण आर्थिक स्थिती पाहून टोलबाबत योग्य तो निर्णय सरकार घेईल." याच वेळी आमदार वैभव नाईक यांनी नितीन गडकरींवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, "वैभव नाईक यांनी जर टीका केली नाही, तर त्यांचे अस्तित्व आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच त्यांना अधूनमधून असे राजकीय फुत्कार सोडावे लागतात." आमदार प्रवीण दरेकर यांच्या या कुडाळ दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे दिसून येत आहे. म्हाडा प्रकल्पांच्या पाहणीच्या आश्वासनामुळे घरकुल इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.3
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरात लोकांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळणारा एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक सहा-सात वर्षाचा अल्पवयीन चिमुकला वाकड परिसरातील फोनिक्स मॉल समोरील मुख्य रस्त्यावर ऑटो रिक्षा चालवत असतानाचा विडियो सध्या पिंपरी चिंचवड शहरात वायरल होत आहे. या विडियो माझे चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना आपण पाहू शकतो तसेच त्याचे वडील ऑटो रिक्षा मागील सीटवर बसून प्रवास करत आहेत असा आपल्याला या विडियो च्या माध्यमातून दिसून येत आहे. चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार ? असा प्रश्न आता सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर विचारत आहेत. तर चिमुकला मुलगा शहरातील मुख्य मार्गावर अशाप्रकारे ऑटो रिक्षा चालवत असताना शहरातील वाहतूक पोलीस काय करत होते ? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.... #पिंपरीचिंचवड #वाकड #धक्कादायक #व्हायरलव्हिडिओ #अल्पवयीन #रिक्षा #वाहतूकनियम #बेजबाबदारपणा #अपघाताचा_धोका #पोलिसप्रश्नचिन्ह #PimpriChinchwad #Wakad #Shocking #ViralVideo #MinorDriving #AutoRickshaw #TrafficViolation #Irresponsible #AccidentRisk #PoliceNegligence1
- शासनाचे टँकर जनतेसाठी नहीं तर पत्रकारांच्या घरात झोपडीत आलेले टँकर प्रायव्हेट सोसायटी मधे विकले जातात विकले जातात भर उन्हाळा मधे जनतेला पाणी नहीं गरिबांच्या हक्काचे टँकर विकले जातात1