भोर तालुक्यातील केंजळ येथे मूळचे रहिवासी व भोलावडे येथील माजी मुख्याध्यापक सुनील शंकराव चोरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वर्गीय आजोबा विठ्ठलराव लक्ष्मण चोरगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, नीतिमूल्य, माणुसकी आणि सामाजिक जाणीव दृढ व्हावी या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ व काळेवाडी तसेच गावातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत लेखक राजीव केळकर लिखित 'माणुसकीच्या वाटेवर' या पुस्तकाच्या ३०० प्रतींचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी लेखक राजीव केळकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत वाचन संस्कृती, संस्कार आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली. केंद्रप्रमुख मल्हारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय भेलके, माजी सैनिक आनंदराव जाधव, शांताराम भालेघरे, मुख्याध्यापक सुदाम ओंबळे, जे. के. पाटील, धनंजय भिलारे, राजेंद्र बांदल, शशिकांत गुरव, संगीता बोरगे, रत्नप्रभा डाळ, प्रिया नांदे, विनोद जाधव, सुरेश सुतार, चोरगे कुटुंबीय, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील चोरगे यांनी केले, सूत्रसंचालन जे. के. पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक सुदाम ओंबळे यांनी आभार मानले.

- पुण्याच्या भोर शहरात आषाढ महिना सुरू झाल्यामुळे चिकन, मटण आणि माशांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दुकानांमधील शिल्लक आणि विक्रीयोग्य नसलेले मांस उघड्यावर टाकले जात असल्याने सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांनी शहरात उच्छाद मांडला असून नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच चौपाटी परिसरात शिरवळ येथे कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या गोपीचंद संपत म्हस्के यांच्यावर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. कामानिमित्त दुचाकीवरून जाणारे नागरिक आणि सायकलवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही कुत्र्यांचे हे कळप सतत पाठलाग करत आहेत. रात्री अपरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याने आणि विव्हळण्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चौपाटी परिसरासह संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतरवर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मुलांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, दगडफेक आणि मुलींची छेडछाड असे प्रकार घडल्याच्या निषेधार्थ राज्यातील आंबेडकरी पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी २३ जुलै रोजी बंदची हाक दिली होती. या आवानाला प्रतिसाद देत ऐतिहासिक जावळीतील व्यापारी व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने जावळीत १००% बंद यशस्वी झाला. मात्र, दुसरीकडे मराठ्यांची राजधानी असलेले सातारा शहर भाजपच्या प्रभावाखाली असल्याने सर्व दुकाने सताड उघडी ठेवून बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दात विचकावून दाखवत होते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे वाटोळे झाले तरी चालेल पण राज्यकर्ते जगले पाहिजेत, जणू असेच सांगत शिवरायांची राजधानी असलेला सातारा भाजपच्या प्रभावाखाली राहिल्याचे पाहायला मिळाले.1
- एका व्यक्तीने मेडिकल शॉपमध्ये जाऊन साहित्य घेतले आणि त्याचे पैसे न देता तिथून पोबारा केला. या व्यक्तीने काल दिवसभरात अशाच प्रकारे एकूण ५ मेडिकल दुकानांना गंडा घातला आहे.1
- आंदोलनाचा दणका बसताच अखेर प्रशासनाला जाग आली आहे. या आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसून आला असून प्रशासनाने २४ तासांच्या आत तातडीने रस्त्याचे काम सुरू केले आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यार्थी तीव्र आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन शांततामय मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.1
- तरुण आंदोलकांना 'ड्रग्ज केस'मध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलकांना थेट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.1
- भोर तालुक्यातील केंजळ येथे मूळचे रहिवासी व भोलावडे येथील माजी मुख्याध्यापक सुनील शंकराव चोरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वर्गीय आजोबा विठ्ठलराव लक्ष्मण चोरगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, नीतिमूल्य, माणुसकी आणि सामाजिक जाणीव दृढ व्हावी या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ व काळेवाडी तसेच गावातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत लेखक राजीव केळकर लिखित 'माणुसकीच्या वाटेवर' या पुस्तकाच्या ३०० प्रतींचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी लेखक राजीव केळकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत वाचन संस्कृती, संस्कार आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली. केंद्रप्रमुख मल्हारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय भेलके, माजी सैनिक आनंदराव जाधव, शांताराम भालेघरे, मुख्याध्यापक सुदाम ओंबळे, जे. के. पाटील, धनंजय भिलारे, राजेंद्र बांदल, शशिकांत गुरव, संगीता बोरगे, रत्नप्रभा डाळ, प्रिया नांदे, विनोद जाधव, सुरेश सुतार, चोरगे कुटुंबीय, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील चोरगे यांनी केले, सूत्रसंचालन जे. के. पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक सुदाम ओंबळे यांनी आभार मानले.1
- पुण्यात 'मिशन क्रॅकडाऊन'अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून या मोहिमेचा जोरदार दणका बसला आहे. या कारवाईदरम्यान नशेच्या तब्बल 100 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.1