logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील रमाई आवास योजना २०२३-२४ मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही निधी मिळवण्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. घरकुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही तब्बल सहा महिने उलटून गेले आहेत, तरी निधी मिळाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १५ जून रोजी संतप्त लाभार्थ्यांनी मंठा पंचायत समिती येथे धाव घेत गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. यावेळी काही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या हप्त्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केला, तसेच पैसे देऊनही त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. 'घरकुल मिळवण्यासाठी शासनाकडे हात जोडायचे की संबंधितांच्या मागण्या पूर्ण करायच्या?' असा संतप्त सवाल उपस्थित करत लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतही लाभार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाभार्थ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, पंधरा दिवसांच्या आत घरकुलाचा निधी खात्यात जमा झाला नाही, तर मंठा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असताना, कागदपत्रांची पूर्तता करूनही लाभार्थ्यांना निधीसाठी चकरा माराव्या लागत असतील, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. आता या लाभार्थ्यांच्या आरोपांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, की हे प्रकरण केवळ कागदोपत्रीच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2 hrs ago
user_AJINKYA S DAWANE
AJINKYA S DAWANE
मंठा, जालना, महाराष्ट्र•
2 hrs ago

मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील रमाई आवास योजना २०२३-२४ मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही निधी मिळवण्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. घरकुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही तब्बल सहा महिने उलटून गेले आहेत, तरी निधी मिळाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १५ जून रोजी संतप्त लाभार्थ्यांनी मंठा पंचायत समिती येथे धाव घेत गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. यावेळी काही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या हप्त्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केला, तसेच पैसे देऊनही त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. 'घरकुल मिळवण्यासाठी शासनाकडे हात जोडायचे की संबंधितांच्या मागण्या पूर्ण करायच्या?' असा संतप्त सवाल उपस्थित करत लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतही लाभार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाभार्थ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, पंधरा दिवसांच्या आत घरकुलाचा निधी खात्यात जमा झाला नाही, तर मंठा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असताना, कागदपत्रांची पूर्तता करूनही लाभार्थ्यांना निधीसाठी चकरा माराव्या लागत असतील, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. आता या लाभार्थ्यांच्या आरोपांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, की हे प्रकरण केवळ कागदोपत्रीच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील रमाई आवास योजना २०२३-२४ मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही निधी मिळवण्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. घरकुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही तब्बल सहा महिने उलटून गेले आहेत, तरी निधी मिळाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १५ जून रोजी संतप्त लाभार्थ्यांनी मंठा पंचायत समिती येथे धाव घेत गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. यावेळी काही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या हप्त्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केला, तसेच पैसे देऊनही त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. 'घरकुल मिळवण्यासाठी शासनाकडे हात जोडायचे की संबंधितांच्या मागण्या पूर्ण करायच्या?' असा संतप्त सवाल उपस्थित करत लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतही लाभार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाभार्थ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, पंधरा दिवसांच्या आत घरकुलाचा निधी खात्यात जमा झाला नाही, तर मंठा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असताना, कागदपत्रांची पूर्तता करूनही लाभार्थ्यांना निधीसाठी चकरा माराव्या लागत असतील, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. आता या लाभार्थ्यांच्या आरोपांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, की हे प्रकरण केवळ कागदोपत्रीच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील रमाई आवास योजना २०२३-२४ मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही निधी मिळवण्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. घरकुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही तब्बल सहा महिने उलटून गेले आहेत, तरी निधी मिळाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १५ जून रोजी संतप्त लाभार्थ्यांनी मंठा पंचायत समिती येथे धाव घेत गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला.

यावेळी काही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या हप्त्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केला, तसेच पैसे देऊनही त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. 'घरकुल मिळवण्यासाठी शासनाकडे हात जोडायचे की संबंधितांच्या मागण्या पूर्ण करायच्या?' असा संतप्त सवाल उपस्थित करत लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतही लाभार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लाभार्थ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, पंधरा दिवसांच्या आत घरकुलाचा निधी खात्यात जमा झाला नाही, तर मंठा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असताना, कागदपत्रांची पूर्तता करूनही लाभार्थ्यांना निधीसाठी चकरा माराव्या लागत असतील, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. आता या लाभार्थ्यांच्या आरोपांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, की हे प्रकरण केवळ कागदोपत्रीच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने सॅनरो नॉलेज सिटी, रवळगाव रोड, सेलू येथे बहुकोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी "PRINCE Infotainment Park" हा प्रकल्प साकारला जात आहे. "Ultimate Destination for Learning & Fun" या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प मराठवाड्यातील विद्यार्थी, पालक आणि पर्यटकांसाठी शिक्षण व मनोरंजनाचे नवे पर्व ठरणार असून, सन २०२६ च्या उत्तरार्धात तो नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे इन्फोटेंटमेंट पार्क विज्ञान, क्रीडा, निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडविणारे मराठवाड्यातील पहिले विज्ञान-पर्यटन केंद्र ठरणार आहे. या पार्कमध्ये Curiosity SIAC (Science Innovation & Activity Centre), ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, किड्स स्विमिंग पूल, बहुउद्देशीय क्रीडा संकुल, अटल टिंकरिंग लॅब, IgniteX स्किल लॅब, खुल्या वातावरणातील विज्ञान उद्यान, बोटॅनिकल गार्डन आणि बहुउद्देशीय सभागृह अशा विविध आकर्षणांचा समावेश असणार आहे. Curiosity SIAC हे महाराष्ट्रातील सातवे विज्ञान केंद्र ठरणार असून, त्यास राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग (RGSTC), नेहरू सायन्स सेंटर, मुंबई तसेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांचे सहकार्य लाभले आहे. या केंद्रात व्हर्च्युअल अॅनाटॉमी लॅब, स्पेस व्हॉयेज सिम्युलेटर, व्हीआर केमिस्ट्री लॅब, ऑगमेंटेड रिअॅलिटी लॅब, होलोग्राम थिएटर, रोबोटिक्स व कोडिंग लॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पात परभणी जिल्ह्यातील पहिला ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधा हे आणखी एक वैशिष्ट्य ठरेल. या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, क्रीडा आणि नवोपक्रम यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. याबाबत बोलताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी नमूद केले की, "भौगोलिक मर्यादा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आड येऊ नयेत, ही आमची भूमिका आहे. PRINCE Infotainment Park च्या माध्यमातून सेलू हे महाराष्ट्रातील विज्ञान-पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येईल. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आता विज्ञान केंद्रांचा अनुभव घेण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही." सुमारे १०,००० हून अधिक वार्षिक पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा लाभ परभणीसह नांदेड, लातूर आणि आसपासच्या पाच जिल्ह्यांतील ५०० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे. PRINCE Infotainment Park हा केवळ एक प्रकल्प नसून, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, नवोपक्रम आणि मनोरंजनाच्या नव्या संधी निर्माण करणारा एक ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे.
    2
    श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने सॅनरो नॉलेज सिटी, रवळगाव रोड, सेलू येथे बहुकोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी "PRINCE Infotainment Park" हा प्रकल्प साकारला जात आहे. "Ultimate Destination for Learning & Fun" या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प मराठवाड्यातील विद्यार्थी, पालक आणि पर्यटकांसाठी शिक्षण व मनोरंजनाचे नवे पर्व ठरणार असून, सन २०२६ च्या उत्तरार्धात तो नागरिकांच्या सेवेत दाखल होईल.

श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे इन्फोटेंटमेंट पार्क विज्ञान, क्रीडा, निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडविणारे मराठवाड्यातील पहिले विज्ञान-पर्यटन केंद्र ठरणार आहे. या पार्कमध्ये Curiosity SIAC (Science Innovation & Activity Centre), ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, किड्स स्विमिंग पूल, बहुउद्देशीय क्रीडा संकुल, अटल टिंकरिंग लॅब, IgniteX स्किल लॅब, खुल्या वातावरणातील विज्ञान उद्यान, बोटॅनिकल गार्डन आणि बहुउद्देशीय सभागृह अशा विविध आकर्षणांचा समावेश असणार आहे.

Curiosity SIAC हे महाराष्ट्रातील सातवे विज्ञान केंद्र ठरणार असून, त्यास राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग (RGSTC), नेहरू सायन्स सेंटर, मुंबई तसेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांचे सहकार्य लाभले आहे. या केंद्रात व्हर्च्युअल अॅनाटॉमी लॅब, स्पेस व्हॉयेज सिम्युलेटर, व्हीआर केमिस्ट्री लॅब, ऑगमेंटेड रिअॅलिटी लॅब, होलोग्राम थिएटर, रोबोटिक्स व कोडिंग लॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पात परभणी जिल्ह्यातील पहिला ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधा हे आणखी एक वैशिष्ट्य ठरेल. या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, क्रीडा आणि नवोपक्रम यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे.

याबाबत बोलताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी नमूद केले की, "भौगोलिक मर्यादा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आड येऊ नयेत, ही आमची भूमिका आहे. PRINCE Infotainment Park च्या माध्यमातून सेलू हे महाराष्ट्रातील विज्ञान-पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येईल. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आता विज्ञान केंद्रांचा अनुभव घेण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही." सुमारे १०,००० हून अधिक वार्षिक पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा लाभ परभणीसह नांदेड, लातूर आणि आसपासच्या पाच जिल्ह्यांतील ५०० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे.

PRINCE Infotainment Park हा केवळ एक प्रकल्प नसून, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, नवोपक्रम आणि मनोरंजनाच्या नव्या संधी निर्माण करणारा एक ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे.
    user_Nishikant rodge
    Nishikant rodge
    Farmer Selu, Parbhani•
    2 hrs ago
  • जालना जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आता दामिनी पथक पूर्णपणे सक्रिय झाले आहे. या पथकाच्या सक्रियतेमुळे टवाळ-खोरांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना धडा शिकवला जाईल. महिलांच्या सुरक्षेसाठी एक विशेष हेल्पलाइन नंबर देखील सक्रिय करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांना तात्काळ मदत मिळू शकेल.
    1
    जालना जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आता दामिनी पथक पूर्णपणे सक्रिय झाले आहे. या पथकाच्या सक्रियतेमुळे टवाळ-खोरांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना धडा शिकवला जाईल. महिलांच्या सुरक्षेसाठी एक विशेष हेल्पलाइन नंबर देखील सक्रिय करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांना तात्काळ मदत मिळू शकेल.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील क्रीडा संकुलास पहिल्याच पावसात अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. या घटनेमुळे क्रीडा संकुलाच्या स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील क्रीडा संकुलास पहिल्याच पावसात अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. या घटनेमुळे क्रीडा संकुलाच्या स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आम्ही स्वतः व्यायाम करतो आणि लोकांनाही व्यायाम करण्यास मदत करतो.
    1
    आम्ही स्वतः व्यायाम करतो आणि लोकांनाही व्यायाम करण्यास मदत करतो.
    user_Fitcoach Yunus Shaikh
    Fitcoach Yunus Shaikh
    Fitness Trainer जाफ्राबाद, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यात वादळी पावसामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी थेट बाधित शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली.
    1
    हिंगोली जिल्ह्यात वादळी पावसामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी थेट बाधित शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली.
    user_लोकराष्ट्र न्यूज
    लोकराष्ट्र न्यूज
    हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अप्पर तहसील यादीत सेवलीला डावलल्याच्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने धरणे व निदर्शने आंदोलनाचे आयोजन केले आहे.
    1
    अप्पर तहसील यादीत सेवलीला डावलल्याच्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने धरणे व निदर्शने आंदोलनाचे आयोजन केले आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • रविवारी पंढरपूरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला, ज्यात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक दुर्घटना पिकअप वाहन एका विहिरीत कोसळल्याने घडली. या अपघातात एका निष्पाप चिमुकल्याचाही बळी गेला असून, घटनेचे व्हिडिओ आणि फोटो मन हेलावून टाकणारे आहेत. श्रद्धेच्या प्रवासात काळाने घातलेल्या या घातामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    रविवारी पंढरपूरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला, ज्यात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक दुर्घटना पिकअप वाहन एका विहिरीत कोसळल्याने घडली.

या अपघातात एका निष्पाप चिमुकल्याचाही बळी गेला असून, घटनेचे व्हिडिओ आणि फोटो मन हेलावून टाकणारे आहेत. श्रद्धेच्या प्रवासात काळाने घातलेल्या या घातामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.