Shuru
Apke Nagar Ki App…
कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागतासाठी आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आर. आर. आबा पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राने पाहिला असून हा वाद आजवर संपलेला नाही. आमदार रोहित पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातही प्रत्येक निवडणुकीत जोरदार वादावादी पाहायला मिळते. मात्र, आज आरेवाडीच्या बनात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साक्षीने हे दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात एकत्रित पाहायला मिळाले.
EXPRESS NEWS
कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागतासाठी आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आर. आर. आबा पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राने पाहिला असून हा वाद आजवर संपलेला नाही. आमदार रोहित पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातही प्रत्येक निवडणुकीत जोरदार वादावादी पाहायला मिळते. मात्र, आज आरेवाडीच्या बनात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साक्षीने हे दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात एकत्रित पाहायला मिळाले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक वेगळेच आणि सुंदर गाणे समोर आले आहे.1
- Post by E city news network1
- आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरात आणि रुक्मिणी मंदिरामध्ये करण्यात आलेल्या रोषणाईचे छायाचित्र ड्रोनद्वारे टिपण्यात आले आहे. आषाढी वारीनिमित्त रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर शहरात ही विशेष रोषणाई करण्यात आली असून, ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने या रोषणाईची दृश्ये कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत.1
- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर २५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी आणि विविध संघटनांचे आंदोलन तीव्रतेने सुरू होते. या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.1
- आषाढी एकादशीच्या औचित्याने वडोद्यात विठ्ठल नामाचा गजर झाला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली आहे.1
- उत्तर रत्नागिरीतील खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने भाजपचे कोकणातील नेते वैभव खेडेकर व संबंधित कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, २३ जुलै २०२६ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे सार्वजनिक दहन करण्यात आले तसेच आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊन समाजात वैमनस्य पसरू शकते, तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे. लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी सार्वजनिक ठिकाणी पुतळा दहन, आक्षेपार्ह घोषणाबाजी व चिथावणीखोर कृत्ये करणे अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य त्या कायदेशीर कलमांन्वये कारवाई करावी, अशी मागणी उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने खेड पोलिसांकडे केली आहे.1
- कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागतासाठी आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आर. आर. आबा पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राने पाहिला असून हा वाद आजवर संपलेला नाही. आमदार रोहित पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातही प्रत्येक निवडणुकीत जोरदार वादावादी पाहायला मिळते. मात्र, आज आरेवाडीच्या बनात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साक्षीने हे दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात एकत्रित पाहायला मिळाले.1
- सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्माळ स्मशानभूमीजवळील कृष्णा नदीपात्रात गेल्या १६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. धोंडीराम दत्तू पाटील (वय ८५ वर्षे, रा. कवठेपिरान) असे या मयताचे नाव असून, ते बेपत्ता झाल्याची नोंद यापूर्वीच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्स (SRF) आपत्कालीन पथक व पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सांगली ग्रामीण पोलीस व स्पेशल रेस्क्यू फोर्सने अथक प्रयत्नांनंतर नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढून पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवला. नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असून आवश्यक पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत. या बचाव कार्यात कमांडर कैलास वडर, महेश गव्हाणे, इर्शाद कवठेकर, सागर जाधव, आमिर नदाफ आणि स्वप्निल जाधव यांनी सहभाग घेतला.1