आजपासून पुसेगावात आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवाला प्रारंभ. पुसेगाव :- सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे आजपासून आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवाला भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. दि. 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान हा भव्य धार्मिक सोहळा संपन्न होणार असून संपूर्ण परिसरात आध्यात्मिक उत्साहाची लहर निर्माण झाली आहे. महोत्सवानिमित्त आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुमारे 15 ते 20 एकर विस्तीर्ण परिसरात आकर्षक मंडप उभारण्यात आला असून मुख्य वेदीची भव्य सजावट करण्यात आली आहे. धार्मिक विधींसाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था तसेच भाविकांसाठी सुयोग्य बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 100 ते 150 सर्व सुविधांनी युक्त खोल्यांची व्यवस्था करण्यात आली असून पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यावेळी विभवसागरजी महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पंचकल्याणक महोत्सव हा जैन धर्मातील अत्यंत पवित्र व महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळा आहे. या सोहळ्यात तीर्थंकरांच्या गर्भ, जन्म, दीक्षा, केवलज्ञान आणि मोक्ष या पंचकल्याणकांचे विधीपूर्वक स्मरण व पूजन केले जाते. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने सर्व नियोजन काटेकोरपणे करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने अशोक घारगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नर्सी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत राहावी व भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महोत्सव काळात विविध धार्मिक विधी, प्रवचने व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून पुसेगाव नगरीत या निमित्ताने सर्वत्र भक्तीमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून हा महोत्सव ऐतिहासिक ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीची शक्यता व्यक्त होत आहे; मात्र त्यांच्या भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
आजपासून पुसेगावात आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवाला प्रारंभ. पुसेगाव :- सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे आजपासून आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवाला भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. दि. 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान हा भव्य धार्मिक सोहळा संपन्न होणार असून संपूर्ण परिसरात आध्यात्मिक उत्साहाची लहर निर्माण झाली आहे. महोत्सवानिमित्त आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुमारे 15 ते 20 एकर विस्तीर्ण परिसरात आकर्षक मंडप उभारण्यात आला असून मुख्य वेदीची भव्य सजावट करण्यात आली आहे. धार्मिक विधींसाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था तसेच भाविकांसाठी सुयोग्य बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात
आली आहे. सुमारे 100 ते 150 सर्व सुविधांनी युक्त खोल्यांची व्यवस्था करण्यात आली असून पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यावेळी विभवसागरजी महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पंचकल्याणक महोत्सव हा जैन धर्मातील अत्यंत पवित्र व महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळा आहे. या सोहळ्यात तीर्थंकरांच्या गर्भ, जन्म, दीक्षा, केवलज्ञान आणि मोक्ष या पंचकल्याणकांचे विधीपूर्वक स्मरण व पूजन केले जाते. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने सर्व नियोजन काटेकोरपणे करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने अशोक घारगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नर्सी पोलीस ठाणे
यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत राहावी व भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महोत्सव काळात विविध धार्मिक विधी, प्रवचने व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून पुसेगाव नगरीत या निमित्ताने सर्वत्र भक्तीमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून हा महोत्सव ऐतिहासिक ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीची शक्यता व्यक्त होत आहे; मात्र त्यांच्या भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
- ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews1
- Post by Today One Live1
- Post by Mohammad Rafikh1
- मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील2
- गोदावरी नदी पात्रामध्ये कचरा तथा नाले व गटारीचे दूषित पाणी साचल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरत असून गोदावरी नदीपात्रातील जलजीव धोक्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुद्धा थोडक्यात येत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. गोदावरी नदी शुद्धीकरणा साठी करोडो निधी रुपये येऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य ती उपाययोजना स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत नसताना दिसत असल्याचे सुद्धा नागरिकांच्या भावनातून व्यक्त होत आहे. शिक बांधवांचे हिंदू बांधवांचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या ठिकाणी अनेक भाविक भक्त गुरुद्वारा इतर देवस्थानास दर्शनासाठी अनेक राज्यातून या ठिकाणी येतात . त्याच ठिकाणी अशा प्रकारे घाणीचे साम्राज्य बघून. आश्चर्यचकित होत आहेत. एवढा मोठा पवित्र स्थान आणि ऐतिहासिक स्थान असून सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य त्या सोयी सुविधा स्थानिक प्रशासनाच्या वतीने दिसत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या परिस्थितीत गोदावरी नदी पात्रात अनेक सर्व जसे की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करण्याचे महत्त्व असून सुद्धा अंघोळ करणे कठीण झाले आहे. तरीसुद्धा कुठलीही हालचाल स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत असताना दिसत नाही. याकरिता आज रोजी जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंघ खेड व त्यांच्या सहकार्याच्या वतीने. तक्रार देखील करण्यात आली आहे. लवकरात लवकर प्रदूषित होत असलेली गोदावरी नदी त्वरित गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छ करण्याच्या मार्गे शासनाने लागावे अशी मागणी केली आहे.4
- श्री चाफेश्वर भगवान पालखी नगर प्रदक्षिणा संपन्न! ................................................... ज्ञानेशप्रसाद ब्युरो चिफ वाशिम जिल्हा वाशिम: जिल्ह्यातील ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऋषीवट नगरी अर्थातच रिसोड येथे, महाशिवरात्रीचे पावन पर्वावर, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी, सायंकाळी 4 वा. येथील जागरूक देवस्थान चाफेश्वर भगवान यांची पालखी मिरवणूक अतिशय उत्साहात काढण्यात आली असून, या पालखी सोहळ्यामध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्त्रियांनी भजनी मंडळाद्वारे शिवस्तुती भक्ती गीत म्हणत, आपली भक्ती प्रकट केली. पालखी मार्गावर भाविक महिलांनी आपापल्या अंगणामध्ये पाणी शिंपडून रांगोळीची सजावट करून पालखीचे उत्साहात स्वागत केले. ज्ञानेश्वर थोरात यांनी, पालखीतील भक्तांकरिता, पालखी मार्गावर थंड पाण्याची व्यवस्था केली होती. प्रमुख मार्गाने पालखी मार्गक्रमण करत करत ही पालखी अमरदास बाबा मंदिर ते श्री आप्पास्वामी मंदिरा पासून जय संताजी चौक, संत रविदास चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन सराफ लाईन, गणेश मंदिर, अष्टभुजा देवी चौकातून, आपल्या नियोजित स्थळी श्री चाफेश्वर मंदिर परिसरामध्ये शिव शंकराची महाआरती केल्यानंतर, पालखीची सांगता करण्यात आली.1