*सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले* *नायगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ उत्साहात; अभियानात दोन हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ* शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड, दि. १० मे:- शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नायगाव तहसील परिसरात दि. ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील सुमारे एक हजार नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवत विविध योजनांचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी तात्काळ सोडविल्या जाव्यात, हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यास पीठावर न बसता जिल्हाधिकारी राहुल कार्डिले सामान्य नागरिकांमध्ये खुर्ची टाकून बसले हे विशेष. यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. महसूल, पुरवठा, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, महावितरण, भूमी अभिलेख आदी विभागांनी उभारलेल्या स्टॉल्समुळे नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. या शिबिरात एकूण १२ विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रलंबित बँक केवायसी पूर्ण करून नवीन अर्ज स्वीकृत करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत डिजिटल रेशन कार्डचे वाटप तसेच दुरुस्तीबाबत माहिती देण्यात आली. महसूल विभागाने नागरिकांना जिवंत व डिजिटल सातबाराचे विनामूल्य वितरण केले, तर रहिवासी, उत्पन्न व जातीच्या प्रमाणपत्रांसाठी नवीन अर्ज स्वीकारण्यात आले. भूमी अभिलेख विभागामार्फत पी.आर. कार्ड, मोजणी प्रक्रिया व जमीन नोंदींबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. कृषी विभागाने पी.एम. किसान, महाडीबीटी, महाविस्तारख यांसारख्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आरोग्य विभागाकडून ‘आयुष्मान भारत’ आणि ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महावितरण विभागाने ‘मागेल त्याला सोलर’ व ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ या सारखी माहिती दिली. महिला व बालविकास विभागामार्फत लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बेबी केअर किट तसेच गरोदर मातांसाठी पोषण आहार योजनांची माहिती देण्यात आली. घरकुल योजना आणि वन विभागाच्या विविध योजनांबाबतही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात माहिती घेतली. या प्रसंगी विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. नागरिकांनी शासनाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांना अशा शिबिरांमुळे मोठा दिलासा मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत महिला शेतकरी श्रीमती आशाताई लक्ष्मण कदम रा. बाबुळगाव, महानंदा बापुराव तिजारे रा.पाटोदा यांना तुषार संच साठी पूर्व संमती पत्र देण्यात आले. ३२ आयुष्मान गोल्डन कार्ड, १० आयुष्मान वयवंदना कार्ड, ६० लाभार्थी मधुमेह व उच्च रक्तदाब स्क्रिनिंग तपासणी,३ क्षय रोगी रुग्णास फूड बास्केट चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास नायब तहसीलदार विजय येरावाड, नगर पंचायत च्या मुख्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर डोईवाड यांनी केले.
*सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले* *नायगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ उत्साहात; अभियानात दोन हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ* शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड, दि. १० मे:- शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नायगाव तहसील परिसरात दि. ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील सुमारे एक हजार नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवत विविध योजनांचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी
तात्काळ सोडविल्या जाव्यात, हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यास पीठावर न बसता जिल्हाधिकारी राहुल कार्डिले सामान्य नागरिकांमध्ये खुर्ची टाकून बसले हे विशेष. यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. महसूल, पुरवठा, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, महावितरण, भूमी अभिलेख आदी विभागांनी उभारलेल्या स्टॉल्समुळे नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. या शिबिरात एकूण १२ विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रलंबित बँक केवायसी पूर्ण करून नवीन अर्ज स्वीकृत करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत डिजिटल रेशन कार्डचे वाटप तसेच दुरुस्तीबाबत माहिती देण्यात आली. महसूल विभागाने
नागरिकांना जिवंत व डिजिटल सातबाराचे विनामूल्य वितरण केले, तर रहिवासी, उत्पन्न व जातीच्या प्रमाणपत्रांसाठी नवीन अर्ज स्वीकारण्यात आले. भूमी अभिलेख विभागामार्फत पी.आर. कार्ड, मोजणी प्रक्रिया व जमीन नोंदींबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. कृषी विभागाने पी.एम. किसान, महाडीबीटी, महाविस्तारख यांसारख्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आरोग्य विभागाकडून ‘आयुष्मान भारत’ आणि ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महावितरण विभागाने ‘मागेल त्याला सोलर’ व ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ या सारखी माहिती दिली. महिला व बालविकास विभागामार्फत लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बेबी केअर किट तसेच गरोदर मातांसाठी पोषण आहार योजनांची माहिती देण्यात आली. घरकुल योजना आणि वन विभागाच्या विविध योजनांबाबतही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात माहिती घेतली. या प्रसंगी विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात
प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. नागरिकांनी शासनाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांना अशा शिबिरांमुळे मोठा दिलासा मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत महिला शेतकरी श्रीमती आशाताई लक्ष्मण कदम रा. बाबुळगाव, महानंदा बापुराव तिजारे रा.पाटोदा यांना तुषार संच साठी पूर्व संमती पत्र देण्यात आले. ३२ आयुष्मान गोल्डन कार्ड, १० आयुष्मान वयवंदना कार्ड, ६० लाभार्थी मधुमेह व उच्च रक्तदाब स्क्रिनिंग तपासणी,३ क्षय रोगी रुग्णास फूड बास्केट चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास नायब तहसीलदार विजय येरावाड, नगर पंचायत च्या मुख्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर डोईवाड यांनी केले.
- *चिखलवाडी ते गुरुद्वारा कॉर्नर रस्ता 'नरकयातना'; प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे नागरिक आणि व्यापारी हैराण!* "*आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासन सुस्त; जुना मोंढा बाजारपेठेतील व्यापारावर मोठा परिणाम*" शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड: शहरातील अत्यंत गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना मोंढा भागाला जोडणारा चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा कॉर्नर हा मुख्य रस्ता मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून, स्थानिक प्रशासनाच्या 'बघ्याच्या भूमिके'वर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाहतूक कोंडी आणि धुळीचे साम्राज्य हा रस्ता शहराचा मुख्य दुवा असल्याने येथे २४ तास वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्ता खोदलेल्या अवस्थेत असल्याने येथे रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. वाहनधारकांना खड्ड्यांतून आणि चिखलातून कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून, पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले जुना मोंढा ही शहराची प्रमुख बाजारपेठ आहे. मात्र, रस्ता खराब असल्यामुळे ग्राहक या भागात येण्यास टाळाटाळ करत आहेत. याचा थेट परिणाम स्थानिक व्यापारी वर्गावर होत असून, व्यवसायात मोठी घट झाली आहे. "अनेकवेळा तक्रारी देऊनही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही, आम्ही जगायचे कसे?" असा सवाल येथील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आमदारांच्या सूचनेलाही केराची टोपली? या गंभीर प्रश्नावर दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोरकर यांनी देखील मध्यस्थी करून प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. स्थानिक वृत्तपत्रांतून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासकीय अधिकारी याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे "प्रशासन नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करतंय?" अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. नागरिकांची शेवटची विनंती स्थानिक नागरिक आणि व्यापारी संघटनेने प्रशासनाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती केली आहे की, पावसाळ्यापूर्वी किंवा लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करून सर्वसामान्यांची या त्रासातून मुक्तता करावी. आता या बातमीची दखल घेऊन प्रशासन हालचाल करणार की पुन्हा आश्वासनांची बोळवण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. #viralnews #viralpost #viralreelsシ #atulsave #MygovIndia #nandeddiaries #nandedkar #nanded #NWNC #maharashtra1
- अभिनेता विजय थालपती यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.1
- महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन पुकारण्यात आले. संतप्त आंदोलकांनी शासनाचा जीआर (सरकारी अध्यादेश) जाळून आपला निषेध नोंदवला.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- जनगणना २०२६ सर्व नागरिकांनी जनगणना करून घ्यावी ज्याने भविष्यात तुमच्या मुलांना नातवणा त्रास होणार नाही यवतमाळ जिल्हाधिकारी यांचे आव्हान1
- हिंदू, मुस्लीम अन् ख्रिश्चन... मुख्यमंत्री विजय जोसेफ़ यांच्या वक्तव्याची चर्चा का?1
- मयत कुटुंबियांची वैजनाथ पावडे यांनी घेतली भेट 👏👏👏 हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील रहिवासी धोंडीबा बार्शी हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करत आहेत. त्यांचा मुलगा योगेश धोंडीबा बार्शी हा देखील आपल्या आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी रात्रंदिवस रानोमाळ फिरून मेंढपाळ व्यवसाय करत होता. परंतु नियतीने अचानक घाला घातल्याने योगेश बार्शी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील पूर्णा परिसरामध्ये मेंढ्या चारत असताना दिनांक ६ मे रोजी योगेश यांनी मेंढ्यांना तलावावर पाणी पाजण्यासाठी नेले होते. त्यानंतर स्वतः आंघोळ करण्यासाठी तलावात उतरले असता अचानक पाय घसरल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतरही संबंधित प्रशासनाने अद्याप या कुटुंबाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष – वैजनाथ पावडे यांनी मयताच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संबंधित भागातील तहसीलदार आणि मतदारसंघातील आमदार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. “गरीब मेंढपाळ कुटुंबावर ओढवलेले हे संकट अत्यंत वेदनादायी असून शासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे करावा,” अशी अपेक्षा यावेळी वैजनाथ पावडे यांनी व्यक्त केली. धनगर समाज युवा मल्हार सेना ही सदैव मेंढपाळ समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास देखील त्यांनी कुटुंबियांना दिला.1
- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात सिंधगि, चालगनीसह अनेक गावांमध्ये ट्रेझर बोटी वापरून रेतीचा अवैध उपसा सर्रास सुरू आहे. या गंभीर प्रकारावर महसूल प्रशासन गप्प असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी कलेक्टर साहेबांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.1