logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बाल युवा कीर्तनकारांच्या चक्री कीर्तनाने बहरले धर्मसंकीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प. श्री.स्वामी समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवात गोवा येथील कीर्तनकार सुहास वझे यांच्या गोमंतक संत मंडळ संचलीत कीर्तन विद्यालयातील बाल युवा कीर्तनकारांची उत्कृष्ट कीर्तने स्वामी दरबारात संपन्न झाली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील धर्मसंकीर्तन महोत्सवात बालकीर्तनकारांची कीर्तन मैफील रंगल्याने गोव्यातील बाल युवा कीर्तनकारांच्या चक्री कीर्तनाने धर्मसंकीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प बहरले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी उत्सव धर्मसंकीर्तन महोत्सवात आज दुसरे पुष्प बालयुवा कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांची एकाचवेळी कीर्तनं संपन्न झाली. या चक्री कीर्तन सेवेतून त्यांनी पुर्व रंगात आपल्या कीर्तनातुन नश्वर मनुष्य देहाच्या उन्नतीसाठी देवभक्ती, देशभक्ती, व गुरु भक्ती अंगी रुजविण्यासाठी आपल्या जीवनातील कांही वेळ द्यावा असे आवाहन केले. अनेक राष्ट्रपुरूष व समाज सुधारकांनी त्यांच्या जीवनातील जवळपास सर्वच वेळ समाजासाठी अर्पण केला, म्हणुन आज आपण सुखाचे क्षण अनुभवत आहोत, पण त्यात विकारी वृत्तीने धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडीयाचा वापर चुकीच्या मार्गाने जास्त प्रमाणात होत असून याचा परिणाम समाजाच्या नुकसानीत आहे. समाज संघटीत झाला तर असे बिकट प्रसंग निर्माण होणार नाहीत. माणसात नराचा नारायण होण्याची क्षमता आहे त्यासाठी योग्य साधन आपणास पाहिजे हे साधन फक्त संत चरित्राचा आभ्यास व आचरणातुन मिळेल असे विवेचन केले. कीर्तन सेवेच्या उत्तर रंगात संत चरित्र समजून घेवून त्याचं आचरण झालं तर समाज प्रगतशील होईल असेही विचार त्यांनी अनेक समाज पुरुष व संतांची दाखले देवुन व्यक्त करीत वेगवेगळ्या देव, देश, धर्म, संस्कृती तसेच हिंदू संस्कार, संताचे विचार, संत चरित्र, देश भक्तीचे विचार या चक्री कीर्तनात सांगितले. या कीर्तन सेवेत कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांना तबल्यावर उमेश नाईक, हार्मोनियमवर सुहास वझे, चिपळी साथ संदीप गावकर, दामोदर कामत यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ओंकार पाठक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार व सर्व मान्यवर कलाकारांचा श्री.स्वामी समर्थांचा प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीमुख जगदाळे, बाळासाहेब कुलकर्णी, अक्षय सरदेशमुख, अमर पाटील, रमेश शिंदे, श्रीशैल गवंडी, एम.बी.पाटील सर, प्रसाद पाटील सर, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, सागर गोंडाळ, स्वामी लोणारी, काशिनाथ इंडे, रवि महिंद्रकर, गिरीश पवार, संतोष पराणे, संजय पवार, मोहन जाधव, तुषार मोरे, बाळासाहेब एकबोटे आदींसह अनेक पुरुष व महिला स्वामी भक्त उपस्थित होते.

8 hrs ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
8 hrs ago

बाल युवा कीर्तनकारांच्या चक्री कीर्तनाने बहरले धर्मसंकीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प. श्री.स्वामी समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवात गोवा येथील कीर्तनकार सुहास वझे यांच्या गोमंतक संत मंडळ संचलीत कीर्तन विद्यालयातील बाल युवा कीर्तनकारांची उत्कृष्ट कीर्तने स्वामी दरबारात संपन्न झाली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील धर्मसंकीर्तन महोत्सवात बालकीर्तनकारांची कीर्तन मैफील रंगल्याने गोव्यातील बाल युवा कीर्तनकारांच्या चक्री कीर्तनाने धर्मसंकीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प बहरले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी उत्सव धर्मसंकीर्तन महोत्सवात आज दुसरे पुष्प बालयुवा कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांची एकाचवेळी कीर्तनं संपन्न झाली. या चक्री कीर्तन सेवेतून त्यांनी पुर्व रंगात आपल्या कीर्तनातुन नश्वर मनुष्य देहाच्या उन्नतीसाठी देवभक्ती, देशभक्ती, व गुरु भक्ती अंगी रुजविण्यासाठी आपल्या जीवनातील कांही वेळ द्यावा असे आवाहन केले. अनेक राष्ट्रपुरूष व समाज सुधारकांनी त्यांच्या जीवनातील जवळपास सर्वच वेळ समाजासाठी अर्पण केला, म्हणुन आज आपण सुखाचे क्षण अनुभवत आहोत, पण त्यात विकारी वृत्तीने धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडीयाचा वापर चुकीच्या मार्गाने जास्त प्रमाणात होत असून याचा परिणाम समाजाच्या नुकसानीत आहे. समाज संघटीत झाला तर असे बिकट प्रसंग निर्माण होणार नाहीत. माणसात नराचा नारायण होण्याची क्षमता आहे त्यासाठी योग्य साधन आपणास पाहिजे हे साधन फक्त संत चरित्राचा आभ्यास व आचरणातुन मिळेल असे विवेचन केले. कीर्तन सेवेच्या उत्तर रंगात संत चरित्र समजून घेवून त्याचं आचरण झालं तर समाज प्रगतशील होईल असेही विचार त्यांनी अनेक समाज पुरुष व संतांची दाखले देवुन व्यक्त करीत वेगवेगळ्या देव, देश, धर्म, संस्कृती तसेच हिंदू संस्कार, संताचे विचार, संत चरित्र, देश भक्तीचे विचार या चक्री कीर्तनात सांगितले. या कीर्तन सेवेत कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांना तबल्यावर उमेश नाईक, हार्मोनियमवर सुहास वझे, चिपळी साथ संदीप गावकर, दामोदर कामत यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ओंकार पाठक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार व सर्व मान्यवर कलाकारांचा श्री.स्वामी समर्थांचा प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीमुख जगदाळे, बाळासाहेब कुलकर्णी, अक्षय सरदेशमुख, अमर पाटील, रमेश शिंदे, श्रीशैल गवंडी, एम.बी.पाटील सर, प्रसाद पाटील सर, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, सागर गोंडाळ, स्वामी लोणारी, काशिनाथ इंडे, रवि महिंद्रकर, गिरीश पवार, संतोष पराणे, संजय पवार, मोहन जाधव, तुषार मोरे, बाळासाहेब एकबोटे आदींसह अनेक पुरुष व महिला स्वामी भक्त उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • लातूर शहरात वाहतुकीचे शिस्तबद्ध नियमन करणे, ध्वनीप्रदूषणावर आळा घालणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः बुलेट मोटार सायकलींना अनधिकृतरित्या बसविण्यात येणारे मोडिफाईड (फटाका आवाज करणारे) सायलेंसर वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि. ०४/०४/२०२६ रोजी लातूर शहरात मोठा आवाज करणारे फटाका सायलेंसर बसविलेल्या बुलेट वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १) बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 CC 0229 चे मालक वैजनाथ चंद्रसेन घोडके (वय २२ वर्षे, रा. एकुर्गा, ता. जि. लातूर) यांनी वाहनामध्ये अनधिकृत बदल करून कर्णकर्कश आवाजाचा मोडिफाईड सायलेंसर बसविला होता. सदर वाहन चालक किशोर सुरेश लाळगे (वय २९ वर्षे, रा. हरंगुळ बु., ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन एमआयडीसी, लातूर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २) बुलेट वाहन क्र. MH-24 BF 0833 चे चालक व मालक सुनील गुरुनाथ बिराजदार (वय ३८ वर्षे, रा. ताजपूर, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ३) बुलेट वाहन क्र. MH-24 AM 1777 चे चालक आलेश व्यंकट सुरवसे (वय २१ वर्षे, रा. चिकुर्डा, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४) बुलेट वाहन क्र. MH-24 BD 5703 चे चालक प्रणव प्रताप गरड (वय २१ वर्षे, रा. मासुर्डी, ता. औसा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे कारवाई करण्यात आली आहे. ५) बुलेट वाहन क्र. MH-24 AQ 4042 चे चालक प्रेम भास्कर चव्हाण (रा. प्रकाश नगर, लातूर) यांच्याविरुद्धही संबंधित कायद्यान्वये पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६)बुलेट मोटार सायकल क्र. MH-14 BG 3121 चे चालक तेजस भास्कर केंद्रे (वय ३३ वर्षे, रा. डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याने सदर वाहनाला अनधिकृतरित्या बदल केलेला (मोडिफाईड) सायलेंसर बसविण्यात आला होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे तपासणी केली असता १०१.७ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला, जो निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यांतर्गत पोलीस ठाणे गांधी चौक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७) दिपक दिलीप नवले (वय ३३ वर्षे, रा. चिंचोली (ब), ता. जि. लातूर) याने बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 BF 6983 ही धोकादायक पद्धतीने चालविताना आढळून आला. सदर वाहनालाही अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसविण्यात आलेला असून संबंधित कायद्यांनुसार पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८)बालाजी विशवनाथ कांबळे वय 45 वर्ष,राहणार गांधी नगर, उदगीर याने त्याची बुलेट क्र MH 24 BQ 3740 ही इतरांचे जिविताला घोका निर्माण होईल अशा भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवुन अनाधिकृतरित्या बदल केलेले मॉडीफाय सायलेन्सर बसून दोन्ही प्रदूषण केले म्हणून पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनधारकांनी सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगात, निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे आढळून आले. तसेच वाहनांमध्ये अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसवून कर्णकर्कश आवाज निर्माण करण्यात येत होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे (डेसीबल मीटर) तपासणी केली असता आवाजाची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले असल्याने वरनमूद आरोपी विरुद्ध कलम 281 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 184,198 मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार बाहन अधिनियम 1989 चे कलम 120 प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे. या प्रकारामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक, महिला, बालके, तसेच हृदयविकार व इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कडक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गित्ते, पोउपनि माधव केंद्रे तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला. लातूर पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या दुचाकी वाहनांमध्ये कंपनीने दिलेले मूळ सायलेंसरच वापरावेत. कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बदल करू नयेत किंवा मोडिफाईड सायलेंसर बसवू नयेत. ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई कायम सुरू राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शांततामय वातावरण राखण्यासाठी लातूर पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.
    1
    लातूर शहरात वाहतुकीचे शिस्तबद्ध नियमन करणे, ध्वनीप्रदूषणावर आळा घालणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः बुलेट मोटार सायकलींना अनधिकृतरित्या बसविण्यात येणारे मोडिफाईड (फटाका आवाज करणारे) सायलेंसर वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच  उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत दि. ०४/०४/२०२६ रोजी लातूर शहरात मोठा आवाज करणारे फटाका सायलेंसर बसविलेल्या बुलेट वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१) बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 CC 0229 चे मालक वैजनाथ चंद्रसेन घोडके (वय २२ वर्षे, रा. एकुर्गा, ता. जि. लातूर) यांनी वाहनामध्ये अनधिकृत बदल करून कर्णकर्कश आवाजाचा मोडिफाईड सायलेंसर बसविला होता. सदर वाहन चालक किशोर सुरेश लाळगे (वय २९ वर्षे, रा. हरंगुळ बु., ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन एमआयडीसी, लातूर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२) बुलेट वाहन क्र. MH-24 BF 0833 चे चालक व मालक सुनील गुरुनाथ बिराजदार (वय ३८ वर्षे, रा. ताजपूर, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
३) बुलेट वाहन क्र. MH-24 AM 1777 चे चालक आलेश व्यंकट सुरवसे (वय २१ वर्षे, रा. चिकुर्डा, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४) बुलेट वाहन क्र. MH-24 BD 5703 चे चालक प्रणव प्रताप गरड (वय २१ वर्षे, रा. मासुर्डी, ता. औसा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे कारवाई करण्यात आली आहे.
५) बुलेट वाहन क्र. MH-24 AQ 4042 चे चालक प्रेम भास्कर चव्हाण (रा. प्रकाश नगर, लातूर) यांच्याविरुद्धही संबंधित कायद्यान्वये पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६)बुलेट मोटार सायकल क्र. MH-14 BG 3121 चे चालक तेजस भास्कर केंद्रे (वय ३३ वर्षे, रा. डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याने सदर वाहनाला अनधिकृतरित्या बदल केलेला (मोडिफाईड) सायलेंसर बसविण्यात आला होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे तपासणी केली असता १०१.७ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला, जो निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यांतर्गत पोलीस ठाणे गांधी चौक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७) दिपक दिलीप नवले (वय ३३ वर्षे, रा. चिंचोली (ब), ता. जि. लातूर) याने बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 BF 6983 ही धोकादायक पद्धतीने चालविताना आढळून आला. सदर वाहनालाही अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसविण्यात आलेला असून संबंधित कायद्यांनुसार पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८)बालाजी विशवनाथ कांबळे वय 45 वर्ष,राहणार गांधी नगर, उदगीर याने त्याची बुलेट क्र MH 24 BQ 3740 ही इतरांचे जिविताला घोका निर्माण होईल अशा भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवुन अनाधिकृतरित्या बदल केलेले मॉडीफाय सायलेन्सर बसून दोन्ही प्रदूषण केले म्हणून पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
वरील सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनधारकांनी सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगात, निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे आढळून आले. तसेच वाहनांमध्ये अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसवून कर्णकर्कश आवाज निर्माण करण्यात येत होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे (डेसीबल मीटर) तपासणी केली असता आवाजाची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले असल्याने वरनमूद आरोपी विरुद्ध कलम 281 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 184,198 मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार बाहन अधिनियम 1989 चे कलम 120 प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे.
या प्रकारामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक, महिला, बालके, तसेच हृदयविकार व इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कडक कारवाई करण्यात येत आहे.
या मोहिमेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गित्ते, पोउपनि माधव केंद्रे तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
लातूर पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या दुचाकी वाहनांमध्ये कंपनीने दिलेले मूळ सायलेंसरच वापरावेत. कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बदल करू नयेत किंवा मोडिफाईड सायलेंसर बसवू नयेत. ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई कायम सुरू राहणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शांततामय वातावरण राखण्यासाठी लातूर पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • श्री गरुड पुराणकथा (कथा प्रवक्ते) श्री.ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे. संपर्क :9529144913.
    1
    श्री गरुड पुराणकथा (कथा प्रवक्ते) श्री.ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे.
संपर्क :9529144913.
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    38 min ago
  • --- (प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संपादक संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे. या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
    1
    ---
(प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे  संपादक संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे. या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • वडवणी प्रतिनिधी - आज दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव आंधळे, शिवाजी सानप , मंच्छिद्रनाथ झाटे, संजय आंधळे उपस्थित होते.
    1
    वडवणी प्रतिनिधी - आज दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव आंधळे, शिवाजी सानप , मंच्छिद्रनाथ झाटे, संजय आंधळे उपस्थित होते.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    10 hrs ago
  • बारामती विधानसभा पोटनिवडणूक लागली असून यामध्ये लक्ष्मण हाके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे संकेत दिले असून लोकशाहीत निवडणूक बिनविरोध होणे हे घातक असून निवडणुका लढले पाहिजे व संविधान व लोकशाहीचा सन्मान राखला पाहिजे असे सांगितले #Lakshmanhake #election #Baramati #politics #Pawar
    1
    बारामती विधानसभा पोटनिवडणूक लागली असून यामध्ये लक्ष्मण हाके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे संकेत दिले असून लोकशाहीत निवडणूक बिनविरोध होणे हे घातक असून निवडणुका लढले पाहिजे व संविधान व लोकशाहीचा सन्मान राखला पाहिजे असे सांगितले
#Lakshmanhake #election #Baramati #politics #Pawar
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    32 min ago
  • JAY PAWAR JANTA DARBAR : अजितदादांसारखीच स्टाईल आणि कामाचा तोच सपाटा.. आज बारामतीकरांना अनुभवायला मिळाला.. निमित्त होतं राष्ट्रवादी भवनात जय पवार यांच्या नागरीकांशी गाठीभेटीचं.. आज जय पवार यांनी नागरीकांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.. तसेच त्यावर तात्काळ उपाययोजनाही सुचवल्या.. या निमित्तानं बारामतीकरांना अजितदादांची आठवण झाली नसेल तरच नवल..
    1
    JAY PAWAR JANTA DARBAR : अजितदादांसारखीच स्टाईल आणि कामाचा तोच सपाटा.. आज बारामतीकरांना अनुभवायला मिळाला.. निमित्त होतं राष्ट्रवादी भवनात जय पवार यांच्या नागरीकांशी गाठीभेटीचं.. आज जय पवार यांनी नागरीकांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.. तसेच त्यावर तात्काळ उपाययोजनाही सुचवल्या.. या निमित्तानं बारामतीकरांना अजितदादांची आठवण झाली नसेल तरच नवल..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • एकाच अखंड हरिनाम सप्ताहातील दोन कीर्तनकारांची वेगवेगळ्या स्टाईलने एन्ट्री तुम्हाला कोणती आवडली हे नक्की कमेंट करून सांगा.
    1
    एकाच अखंड हरिनाम सप्ताहातील दोन कीर्तनकारांची वेगवेगळ्या स्टाईलने एन्ट्री तुम्हाला कोणती आवडली हे नक्की कमेंट करून सांगा.
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • वडवणी प्रतिनिधी. दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न
    1
    वडवणी प्रतिनिधी. दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी 
वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    10 hrs ago
  • --- अनाधिकृत पुतळे उभारून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी.. बीड जिल्ह्यात गेल्या २७ महिन्यात १२८ अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन नवीन वर्षाच्या ३ महिन्यात ३९ ठिकाणी अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन १०९ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तर ५०० पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे..राज्य सरकारची परवानगी घेऊन वादग्रस्त नसलेल्या तसेच वाहतुकीस अडथळा नसलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळे उभारणं आवश्यक असताना राजकीय हेतूने प्रेरित काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे.. अनाधिकृत पुतळ्याचे संरक्षण कोण करणार?? विटंबना होऊनही जातीय दंगली होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण?? त्यामुळे अनाधिकृत पुतळे उभारणी प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घ्यावी. --- (सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर)
    1
    ---
अनाधिकृत पुतळे उभारून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर  सरकारने कठोर कारवाई करावी.. बीड जिल्ह्यात गेल्या २७ महिन्यात १२८ अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन नवीन वर्षाच्या ३ महिन्यात ३९ ठिकाणी अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन १०९ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तर ५०० पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे..राज्य सरकारची परवानगी घेऊन वादग्रस्त नसलेल्या तसेच वाहतुकीस अडथळा नसलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळे उभारणं आवश्यक असताना राजकीय हेतूने प्रेरित काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे.. अनाधिकृत पुतळ्याचे संरक्षण कोण करणार?? विटंबना होऊनही जातीय दंगली होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण?? त्यामुळे अनाधिकृत पुतळे उभारणी प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घ्यावी.
---
(सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.