Shuru
Apke Nagar Ki App…
सदर व्यक्ती डोणगाव येथील रहिवासी असून दिनांक 9.04.2026 गुरुवारपासून सकाळी 9 वाजता घरी जाऊन आंघोळ करून जेवण करून कामावर येतो असे सांगून निघून गेले अजून परत आले नाही तरी कोणाला दिसल्यास. खालील नंबर वर फोन करून कळवा. मो. नं.8007326891.मो.नं.8390640474.मो.नं.9561507371. आपल्याकडील जेवढे ग्रुप आहे त्या ग्रुप वर पाठवणे.
महेंद्र कुमार महाजन
सदर व्यक्ती डोणगाव येथील रहिवासी असून दिनांक 9.04.2026 गुरुवारपासून सकाळी 9 वाजता घरी जाऊन आंघोळ करून जेवण करून कामावर येतो असे सांगून निघून गेले अजून परत आले नाही तरी कोणाला दिसल्यास. खालील नंबर वर फोन करून कळवा. मो. नं.8007326891.मो.नं.8390640474.मो.नं.9561507371. आपल्याकडील जेवढे ग्रुप आहे त्या ग्रुप वर पाठवणे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- खामगाव: वारकरी संप्रदायातील विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खामगाव येथे वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनाद्वारे वारकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मानधनाची अट रद्द करा,शासनाने वारकरी मानधनासाठी लावलेली ५० वर्षे वयाची अट त्वरित रद्द करावी,सर्व महिला भजनी मंडळांना वार्षिक २५,००० रुपये अनुदान मिळावे, महिला मंडळातील सदस्यांना वैयक्तिक रित्या दरमहा ५,००० रुपये मानधन सुरू करावे,बुलढाणा जिल्ह्यामध्ये 'जिल्हा मानधन समिती' स्थापन करून प्रलंबित असलेले सर्व अर्ज त्वरित मंजूर करावेत,वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी रासायनिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे.ती तातडीने प्रदूषण मुक्त करण्यासाठी कंपन्यांवर कारवाई करावी. या मागण्या मांडण्यात आल्या. जर तीन महिन्यांच्या आत उपरोक्त मागण्या मान्य झाल्या नाही,तर संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी मुंबईत मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वारकरी,महिला भजनी मंडळाच्या भगिनी आणि संप्रदायातील नागरिक उपस्थित होते.1
- महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद1
- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आपले मोठे कार्यकर्तासह मस्तगड इथे पुष्पहार अर्पण करून साजरी केली1
- Post by Sharad Dayedar1
- mumbai malad infinity mall1
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा; शेगाव-चिखलीत कार्यक्रमांची धावपळ! बुलढाणा, दि.16 (जिमाका): राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यामुळे शेगाव व चिखली परिसरात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता नागपूरहून शेगाव येथील हेलिपॅडवर आगमन होणार आहे. त्यानंतर ते तत्काळ श्री संत गजानन महाराज संस्थान येथे जाऊन दर्शन घेणार असून हा कार्यक्रम सकाळी 10.15 वाजता निश्चित करण्यात आला आहे. यानंतर सकाळी 11 वाजता ते चिखलीकडे रवाना होणार आहेत. सकाळी 11.30 वाजता चिखली येथे आगमन होऊन शेरखजी बोंदरे यांच्या शेतातील हेलिपॅडवर उतरणार आहेत. पुढे दुपारी 11.45 वाजता देव्हडे फार्म अॅन्ड अॅग्रो टुरिझमच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याचा समारोप दुपारी 1 वाजता चिखली येथून नागपूरकडे प्रयाण करून होणार आहे. या दौऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.1
- खामगांव : गौ सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन कडून खामगांव शहरातील बेवारस गौ वंश वर उपचार करण्यात आले. येथील आठवडी बाजार स्थित एक नंदीच्या शिंगेला दुखापत होऊन त्याच्या मागच्या पायाची नस कटून तो गंभीर जखमी अवस्थेत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव वाहून गेल्याने तो रक्त बंबाळ अवस्थेत होता एकनिष्ठा गौ सेवकांनी लगेच त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचविला. आठवडी बाजार स्थित एक वासरूला मोठ्या प्रमाणात विष बाधा झाली होती त्या वासरूवर उपचार करण्यात आले परंतु दुर्दैवाने तो मृत्युमुखी पडला. सिव्हिल लाईन स्थित एक गौ माता विष बाधा होऊन मृत्युमुखी पडलेली होती घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवकांनी नगर परिषद ला माहिती देऊन तिचा अंतिम संस्कार करायला लावला. समन्वय नगर स्थित एक गौ माता दोन दिवसा पासून रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत तडफडत होती तिच्यावर उपचार करून तिला वाचविण्यात गौ सेवकांना यश आले. जगदंबा चौक स्थित एका नंदिच्या पायाला मुका मार लागलेला होता गौ सेवकांनी लगेच उपचार करून त्याचा पाय चांगला केला. बारादरी स्थित एका गौ मातेच्या समोरच्या पायाच्या खुरात जखम झाली होती तिच्यावर उपचार करून तिची जखम बरी करण्यात आली. मेनरोड फरशी भागात एका नंदीच्या समोरच्या पायाला दुखापत होऊन तो तडफडत होता त्या नंदीवर लगेच उपचार करण्यात आले. पाण्याची टाकी वामन नगर स्थित एक गौ माता प्रसूती दरम्यान शॉक मध्ये गेलेली होती तिच्या पोटात वासरू आडवा होऊन फसलेला होता तिच्यावर उपचार करून वासरूला वाचविण्यात डॉक्टर गौ सेवकांना यश आले परंतु दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ती बेवारस गौ माता शांत झाली. अमृत नगर स्थित एका नंदीच्या पाठीच्या मागे मोठ्या प्रमाणात जखम होऊन त्याच्यात अळ्या पडलेल्या होते गौ सेवकांनी लगेच उपचार करून नंदीला चांगले केले. या गौ सेवेत एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनचे गौ सेवक सुरजभैय्या यादव, डॉ. शुभम जरांगे, डॉ. पवन घडेकर, ज्ञानेश सेवक सर, योगेश राऊत, नरेश मसनेवार, आकाश शेंबरे, निलेश हजारे, राहुल नाटेकर, अजय वानखडे, मनिष सिरसाठ, प्रमोद ढोलेकर, भारत इंगळे, दिपक महाकाळे, योगेश ईर, स्वप्निल दांदळे, शुभम, आर्यन निळे, करण ठाकुर, करण मोरे, पृथ्वी जाधव, गौरव कवटेकर, प्रदीप शमी, आशिष शर्मा, चेतन कदम, विशाल ठाकुर, अविनाश इंगळे, सागर अवसरमोल, लखन पिवाल, संतोष जाधव आदि लोकांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे गौ वंश वर उपचारासाठी परिश्रम घेतले या गौ सेवेत संपूर्ण लागलेला खर्च एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आला. अशी माहिती स्वप्निल दांदळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.1
- हृदयद्रावक व अतिशय दुर्दैवी घटना; पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात आज गुरवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हारूनबाग भागात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुलांना पाण्याची खोली लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मुलांचे बूट, चप्पल आणि गणवेश आढळून आले असून मृत मुलांचे वय ८ ते १२ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुरू असलेल्या कामामुळे हा खड्डा तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका व पोलीस प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे.1
- Post by Sharad Dayedar1