logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्ह्यात 'जनगणना २०२७' अंतर्गत १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना 'स्वयंगणना' करण्याची सुविधा कोल्हापूर, दि.२२ : देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाची सविस्तर माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे आणि जनगणना संचलनालयाचे जिल्हा समन्वयक तुषार पाटील उपस्थित होते. जनगणना ही धोरणात्मक व संख्यात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, या जनगणनेतील माहितीचा उपयोग देशातील विकास योजनांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करताना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले नागरिकांसाठी १ ते १५ मे २०२६ कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा जिल्ह्यामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरयादी व घरगणना केली जाणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी अधिकृत वेब पोर्टलवर भेट देऊन आपली माहिती भरावयाची आहे. या पोर्टलवर १४ विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) प्राप्त होईल, जो नागरिकांनी अत्यंत सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. १६ मे नंतर जेव्हा प्रगणक घरभेटीसाठी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दिल्यास प्रगणक तो पोर्टलवर अपलोड करतील आणि नागरिकांची माहिती अधिकृतरीत्या जनगणनेत नोंदवली जाईल. कोल्हापूर जिल्ह्याची प्रशासकीय व संख्यात्मक आकडेवारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या व्यापक राष्ट्रीय कार्यक्रमासाठी सूक्ष्म प्रशासकीय नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १३ तहसिल कार्यालये, १३ नगरपालिका किंवा नगरपरिषदा आणि १२५७ महसूल गावांचा समावेश आहे. या संपूर्ण क्षेत्रातील जनगणनेसाठी ४९९९ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, तळागाळात जाऊन अचूक माहिती संकलित करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ६०५४ प्रगणक आणि ९९५ पर्यवेक्षक यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरावर व क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक आणि प्रत्यक्ष कामकाजाचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि माहितीची सुरक्षितता यंदाची जनगणना कागदविरहित आणि पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने, माहिती संकलनासाठी विशेष ॲप्लिकेशन्सचा वापर केला जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी 'हाऊजलिस्ट ॲप' (HLO) वापरले जाणार आहे. या अद्ययावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आणि मालमत्ता याबद्दलची सखोल माहिती घेतली जाईल. या वेब पोर्टलमध्ये भरलेली जिल्ह्यातील नागरिकांची सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार आहे. नागरिकांना परिपूर्ण आणि अचूक माहिती देण्याचे आवाहन जनगणना ही केवळ एक आकडेवारी नसून ती देशाच्या आणि राज्याच्या भविष्यातील प्रगतीचा आणि लोककल्याणकारी योजनांचा भक्कम पाया आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या उपलब्ध वेळेनुसार १ मे ते १५ मे दरम्यान घरबसल्या स्वयंगणना पोर्टलचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच, प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून आपल्या कुटुंबाची प्रामाणिक, अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यावी व जनगणनेच्या या राष्ट्रीय कर्तव्यात आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

21 hrs ago
user_Journalist Ajay
Journalist Ajay
करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
21 hrs ago
46ff9b07-ca72-4f47-85c3-3e90d07c2794

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by E city news network
    1
    Post by E city news network
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • कोल्हापूर ता.22 : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 25 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या 2 पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील कत्यानी कॉम्प्लेक्स ते नेहरुनगर, लक्ष्मीपूरी रिलायन्स मॉल मागे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरु आहे. महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने 476 नाल्यापैकी 130 लहान नाले व 20 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसलेमळा, साळोखेमळा, सरदेसाई पाणंद, बुध्दविहार, समाज कल्याण ऑफिस अशा 130 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
    1
    कोल्हापूर ता.22 : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 25 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या  2 पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील कत्यानी कॉम्प्लेक्स ते नेहरुनगर, लक्ष्मीपूरी रिलायन्स मॉल मागे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरु आहे.
महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने 476 नाल्यापैकी 130 लहान नाले व 20 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसलेमळा, साळोखेमळा, सरदेसाई पाणंद, बुध्दविहार, समाज कल्याण ऑफिस अशा 130 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे.
तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • पेट्रोल 18, डिझेल 36 रुपयांनी महागणार?
    1
    पेट्रोल 18, डिझेल 36 रुपयांनी महागणार?
    user_GLOBAL INDIA NEWS 📰🗞️
    GLOBAL INDIA NEWS 📰🗞️
    Local News Reporter चांदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ओंकार हत्तीचा दोडामार्ग तालुक्यातील शिरवळ गावात निर्धास्तपणे फिरताना दिसून आला. त्यानंतर शिरवळ गावातील नदीत डुबकी मारत पाण्यात आनंद घेतानाचे हे दृश्य खरोखरच मनमोहक आहे. ओंकार हत्ती जलविहार करत असताना मनसोक्त पाण्यात डुंबताना दिसत आहे. ओंकार ज्या प्रकारे लोळतोय आणि सोंडेने पाणी उडवतोय, त्यावरून तो पाण्यात आनंद घेताना दिसतोय. मात्र ओंकार हत्तीचा लोकवस्तीत वावर वाढल्याने वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
    1
    ओंकार हत्तीचा दोडामार्ग तालुक्यातील शिरवळ गावात निर्धास्तपणे फिरताना दिसून आला. त्यानंतर शिरवळ गावातील नदीत डुबकी मारत पाण्यात आनंद घेतानाचे हे दृश्य खरोखरच मनमोहक आहे. ओंकार हत्ती जलविहार करत असताना मनसोक्त पाण्यात डुंबताना दिसत आहे. ओंकार ज्या प्रकारे लोळतोय आणि सोंडेने पाणी उडवतोय, त्यावरून तो पाण्यात आनंद घेताना दिसतोय. मात्र ओंकार हत्तीचा लोकवस्तीत वावर वाढल्याने वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली. “जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे. नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. “सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली.
“जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे.
नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
“सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    1
    Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.२३ भोरसाठी वर्षभरासाठी ५०कोटीचा निधी आणला शिल्लक चार वर्षात किती निधी आणतो ते बघा असे सांगून विरोधकांच्या भुलथापाना बळी पडू नका असे भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर म्हणाले.भोर येथील नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकूल आणि रामबाग परिसरातील जलतरण तलावाचे लोकार्पण आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मा.श्री.रामचंद्रनाना आवारे - नगराध्यक्ष,न.प.भोर मा.श्री.गजाननजी शिंदे सर - सी.ओ.- न.प.भोर मा.श्री.विक्रमदादा खुटवड-जि.प.सदस्य,पुणे मा.श्री.रणजितदादा शिवतरे मा.उपाध्यक्ष,जि.प. मा.श्री.प्रवीणजी जगदाळे -जि.प.सदस्य,पुणे मा.सौ.मनीषाताई कंक - सभापती,पं.स.भोर मा.श्री.राजेशभाऊ बोडके - सदस्य,पं.स.भोर मा.श्री.केदारजी देशपांडे - गटनेते,न.प.भोर व सर्व सन्माननीय नगरसेवक ,पदाधिकारी तथा अधिकारी उपस्थित होते.
    2
    विक्रम शिंदे /भोर दि.२३
भोरसाठी वर्षभरासाठी ५०कोटीचा निधी आणला शिल्लक चार वर्षात किती निधी आणतो ते बघा असे सांगून विरोधकांच्या भुलथापाना बळी पडू नका असे भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर म्हणाले.भोर येथील नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकूल आणि रामबाग परिसरातील जलतरण तलावाचे लोकार्पण आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मा.श्री.रामचंद्रनाना आवारे - नगराध्यक्ष,न.प.भोर
मा.श्री.गजाननजी शिंदे सर - सी.ओ.- न.प.भोर
मा.श्री.विक्रमदादा खुटवड-जि.प.सदस्य,पुणे
मा.श्री.रणजितदादा शिवतरे मा.उपाध्यक्ष,जि.प.
मा.श्री.प्रवीणजी जगदाळे -जि.प.सदस्य,पुणे
मा.सौ.मनीषाताई कंक - सभापती,पं.स.भोर
मा.श्री.राजेशभाऊ बोडके - सदस्य,पं.स.भोर
मा.श्री.केदारजी देशपांडे - गटनेते,न.प.भोर 
व सर्व सन्माननीय नगरसेवक ,पदाधिकारी तथा अधिकारी उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • /पणजी: गेल्या रविवारी कुडचडे येथील दोन भावंडांचा बेतुल येथील नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी बबरूमड्डी-केपे येथे कालव्यात बुडून इग्नेशियस शेरी फर्नाडिस (२२, फातोर्डा-मडगाव) आणि त्याचा मित्र हर्षित (२१, मूळ उत्तराखंड) या दोघांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांत या दोघांसह एकूण आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कुशावती नदी तसेच जलस्रोत खात्याच्या कालव्यात रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेकजण आंघोळीसाठी येतात. इग्नेशियस आणि हर्षित हे दोघेही आंघोळीसाठीच बबरूमड्डी-केपे येथील मुख्य कालव्यात आले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचाही कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती केपे पोलिसांनी दिली. कालव्याच्या एका बाजूला दोन मृतदेह तरंगताना आढळल्याचे एका स्थानिकाच्या निदर्शनास आले. त्याने तत्काळ केपे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुडचडे अग्निशामक दलाला पाचारण केले. आई-बहिणीला धक्का: इंग्रजेवाडा-फातोर्डा येथील इग्नेशियस शेरी फर्नांडिस हा होतकरू मुलगा होता. तो माजोर्डा येथील आयटीसी हॉटेलमध्ये कार्यरत होता. त्याचे वडील हयात नसून त्याच्या पश्चात आई व एक बहीण असा परिवार आहे. त्या दोघींची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी समजताच फातोर्डा परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इग्नेशियसच्या मृत्यूमुळे त्याच्या आई व बहिणीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. *जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष* गेल्या रविवारी बेतुल येथे बुडून भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी समुद्र, नद्या तसेच इतर पाणवठ्यांवरील धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी न उतरावे, अशा सूचना नागरिक व पर्यटकांना दिल्या होत्या. तसेच अशा ठिकाणी धोक्याचे फलक लावण्याचे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, संबंधितांकडून या प्रक्रियेला गती मिळालेली नसल्याने नागरिक व पर्यटक अशा ठिकाणी आंघोळीसाठी जात असल्याचे दिसून येते. इग्नेशियस व हर्षित यांचा ज्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला, तेथेही धोक्याचा कोणताही इशारा फलक नव्हता. फक्त पूल कमकुवत असल्याने त्यावरून वाहने नेऊ नयेत, असा फलक होता. उपनिरीक्षक दिगंबर बोद्रे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रविवारी तसेच इतर सुट्टीच्या दिवशी पोलिस अशा भागांत गस्त घालतात. धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते. मात्र, अशा ठिकाणी २४ तास बंदोबस्त ठेवणे शक्य नसते.
    1
    /पणजी: गेल्या रविवारी कुडचडे येथील दोन भावंडांचा बेतुल येथील नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी बबरूमड्डी-केपे येथे कालव्यात बुडून इग्नेशियस शेरी फर्नाडिस (२२, फातोर्डा-मडगाव) आणि त्याचा मित्र हर्षित (२१, मूळ उत्तराखंड) या दोघांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांत या दोघांसह एकूण आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
कुशावती नदी तसेच जलस्रोत खात्याच्या कालव्यात रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेकजण आंघोळीसाठी येतात. इग्नेशियस आणि हर्षित हे दोघेही आंघोळीसाठीच बबरूमड्डी-केपे येथील मुख्य कालव्यात आले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचाही कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती केपे पोलिसांनी दिली. कालव्याच्या एका बाजूला दोन मृतदेह तरंगताना आढळल्याचे एका स्थानिकाच्या निदर्शनास आले. त्याने तत्काळ केपे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुडचडे अग्निशामक दलाला पाचारण केले.
आई-बहिणीला धक्का: इंग्रजेवाडा-फातोर्डा येथील इग्नेशियस शेरी फर्नांडिस हा होतकरू मुलगा होता. तो माजोर्डा येथील आयटीसी हॉटेलमध्ये कार्यरत होता. त्याचे वडील हयात नसून त्याच्या पश्चात आई व एक बहीण असा परिवार आहे. त्या दोघींची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी समजताच फातोर्डा परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इग्नेशियसच्या मृत्यूमुळे त्याच्या आई व बहिणीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
*जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष*
गेल्या रविवारी बेतुल येथे बुडून भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी समुद्र, नद्या तसेच इतर पाणवठ्यांवरील धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी न उतरावे, अशा सूचना नागरिक व पर्यटकांना दिल्या होत्या. तसेच अशा ठिकाणी धोक्याचे फलक लावण्याचे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, संबंधितांकडून या प्रक्रियेला गती मिळालेली नसल्याने नागरिक व पर्यटक अशा ठिकाणी आंघोळीसाठी जात असल्याचे दिसून येते.
इग्नेशियस व हर्षित यांचा ज्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला, तेथेही धोक्याचा कोणताही इशारा फलक नव्हता. फक्त पूल कमकुवत असल्याने त्यावरून वाहने नेऊ नयेत, असा फलक होता. उपनिरीक्षक दिगंबर बोद्रे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रविवारी तसेच इतर सुट्टीच्या दिवशी पोलिस अशा भागांत गस्त घालतात. धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते. मात्र, अशा ठिकाणी २४ तास बंदोबस्त ठेवणे शक्य नसते.
    user_GLOBAL INDIA NEWS 📰🗞️
    GLOBAL INDIA NEWS 📰🗞️
    Local News Reporter चांदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.