नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्टच्या वतीने आयोजित गंगा-गोदावरी पूजन सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडला. संत-महंतांच्या साक्षीने कपिलधारा अर्थात गंगा-गोदावरीच्या उगमस्थानी हे विधिवत पूजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म, निसर्गपूजा आणि पर्यावरण संवर्धनाची परंपरा जपणारा हा सोहळा समाजाला सकारात्मक दिशा देणारा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पर्यावरण संरक्षणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असून, वृक्षसंवर्धनात नाशिक जिल्ह्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. या प्रसंगी नदी संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाला महंत भक्तिचरणदास महाराज, महंत कल्कीराम महाराज, महंत परशुराम महाराज, आमदार हिरामण खोसकर, आमदार शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विलास पांगारकर, धनंजय बेळे आणि श्री कपिलधारा ट्रस्टचे विश्वस्त कुलदीप चौधरी यांच्यासह साधू-संत, महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्टच्या वतीने आयोजित गंगा-गोदावरी पूजन सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडला. संत-महंतांच्या साक्षीने कपिलधारा अर्थात गंगा-गोदावरीच्या उगमस्थानी हे विधिवत पूजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म, निसर्गपूजा आणि पर्यावरण संवर्धनाची परंपरा जपणारा हा सोहळा समाजाला सकारात्मक दिशा देणारा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पर्यावरण संरक्षणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असून, वृक्षसंवर्धनात नाशिक जिल्ह्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. या प्रसंगी नदी संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाला महंत भक्तिचरणदास महाराज, महंत कल्कीराम महाराज, महंत परशुराम महाराज, आमदार हिरामण खोसकर, आमदार शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विलास पांगारकर, धनंजय बेळे आणि श्री कपिलधारा ट्रस्टचे विश्वस्त कुलदीप चौधरी यांच्यासह साधू-संत, महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली असून हजारो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरे पाण्याखाली गेल्याने आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पूरवठा विभागाने तातडीने मदतकार्य सुरू करत पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सहाय्यक जिल्हा पूरवठा अधिकारी (ADSO) सीमा महल्ले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांमध्ये धान्य वाटपाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात पूरवठा अधिकारी श्री. गावित आणि पूरवठा निरीक्षक श्रीमती प्रणाली बेडसे यांनी रास्तभाव दुकानदारांची बैठक घेऊन ग्रामपंचायत, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या समन्वयाने पात्र पूरग्रस्तांची माहिती संकलित केली आहे. तसेच तलाठी व ग्रामसेवक युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करत असून त्याआधारे शासनाकडून आर्थिक मदत आणि भरपाई दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांनी स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी करून कोणताही बाधित नागरिक अन्नाविना राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्त भागात अन्नधान्यासह पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि निवारा उपलब्ध करून दिला जात आहे. पूरवठा निरीक्षक प्रणाली बेडसे यांनी स्पष्ट केले की, कोणतेही पात्र कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त धान्य पुरवले जाईल. हे अभियान पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.1
- नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते, आवामी विकास पार्टीचे शहराध्यक्ष आणि 'एव्हीपी नाशिक टीव्ही न्यूज' चॅनेलचे मुख्य संपादक सरफराज पठाण यांना भद्रकाली पोलिस स्टेशन व सरकारवाडा विभागाकडून तडीपारीची नोटीस जारी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. सरफराज पठाण यांनी २१ जुलै २०२६ रोजी कथित बेकायदेशीर जुगार, मटका आणि सट्टा व्यवसायाविरोधात पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर लगेचच, २४ जुलै २०२६ रोजी त्यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. या कारवाईनंतर सोशल मीडियावर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष समीक्षा करून कारवाईवर पुनर्विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. सामाजिक प्रश्न आणि अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत निष्पक्ष व्यवहार झाला पाहिजे, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.1
- बिहारमधील बाढ येथील प्रसिद्ध उमानाथ धाम परिसरात एका महिलेने आपल्या पहिल्या पतीच्या समोरच प्रेमीसोबत सात फेरे घेऊन लग्न केल्याने प्रचंड गोंधळ उडाला. या घटनेदरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पहिल्या पतीच्या उपस्थितीतच हा विवाह सोहळा पार पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून हा संपूर्ण प्रकार सध्या सर्वत्र जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.1
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे बाणगंगा नदीला पूर आल्यामुळे नाशिक एअरपोर्टकडे जाणारा रस्ता सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जानोरी ते दहावा मैल, ओझर, एअर फोर्स मार्गे प्रभुधाम मंदिर आणि तेथून जानोरी व एअरपोर्टकडे येणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी रोखण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून परिसरातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे नदीच्या पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुराची ही स्थिती पाहता नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार कांबळे यांनी केले आहे.1
- निफाड येथून गुजरात राज्यातील बिलमाळ येथे भक्तगण पालखी घेऊन निघाले आहेत.1
- सुसरवाडी गावापासून काही अंतरावर असलेल्या डोळखांब गावात ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अचानक पाणी शिरले आहे. गावात पाणी शिरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या मुसळधार पावसामुळे परिसरातील आणि ग्रामीण भागातील दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने दक्षता घेत नागरिकांना मोठा आधार व मदत पुरवली आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणि परिस्थिती सुरळीत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.3