logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोलापुरात धावत्या दुचाकीला लागली अचानक आग, कोणतीही जीवितहानी नाही शहराचा मुख्य भाग असलेल्या गुरुनानक चौक परिसरात शनिवारी दुपारी एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. भररस्त्यात दुचाकीने पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, MH 13 EA 9879 या क्रमांकाची दुचाकी शनिवार दुपारी गुरुनानक चौकातून जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुचाकीने पेट घेतला. वाहनावर असलेल्या चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने गाडी थांबवली आणि रस्त्याच्या मधोमधच सोडून निघून गेल्याने त्याचे प्राण वाचले. आग लागल्याचे पाहताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आणि पाण्याचा मारा करून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले, अन्यथा मोठी हानी होण्याची शक्यता होती.या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे.

5 hrs ago
user_Solapur News
Solapur News
सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
5 hrs ago

सोलापुरात धावत्या दुचाकीला लागली अचानक आग, कोणतीही जीवितहानी नाही शहराचा मुख्य भाग असलेल्या गुरुनानक चौक परिसरात शनिवारी दुपारी एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. भररस्त्यात दुचाकीने पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, MH 13 EA 9879 या क्रमांकाची दुचाकी शनिवार दुपारी गुरुनानक चौकातून जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुचाकीने पेट घेतला. वाहनावर असलेल्या चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने गाडी थांबवली आणि रस्त्याच्या मधोमधच सोडून निघून गेल्याने त्याचे प्राण वाचले. आग लागल्याचे पाहताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आणि पाण्याचा मारा करून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले, अन्यथा मोठी हानी होण्याची शक्यता होती.या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शहराचा मुख्य भाग असलेल्या गुरुनानक चौक परिसरात शनिवारी दुपारी एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. भररस्त्यात दुचाकीने पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, MH 13 EA 9879 या क्रमांकाची दुचाकी शनिवार दुपारी गुरुनानक चौकातून जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुचाकीने पेट घेतला. वाहनावर असलेल्या चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने गाडी थांबवली आणि रस्त्याच्या मधोमधच सोडून निघून गेल्याने त्याचे प्राण वाचले. आग लागल्याचे पाहताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आणि पाण्याचा मारा करून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले, अन्यथा मोठी हानी होण्याची शक्यता होती.या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे.
    1
    शहराचा मुख्य भाग असलेल्या गुरुनानक चौक परिसरात शनिवारी दुपारी एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. भररस्त्यात दुचाकीने पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 13 EA 9879 या क्रमांकाची दुचाकी शनिवार दुपारी गुरुनानक चौकातून जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुचाकीने पेट घेतला. वाहनावर असलेल्या चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने गाडी थांबवली आणि रस्त्याच्या मधोमधच सोडून निघून गेल्याने  त्याचे प्राण वाचले.
आग लागल्याचे पाहताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी  धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आणि पाण्याचा मारा करून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले, अन्यथा मोठी हानी होण्याची शक्यता होती.या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे.
    user_Solapur News
    Solapur News
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जय शिवराय 🚩 #अटकेपार झेंडा फडकवणारे मराठा साम्राज्य हे भारताच्या अखंडतेचे प्रतीक आहे. ज्या कालखंडात मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थानचे रक्षण केले, तोच इतिहास येणाऱ्या पिढ्यांपासून लपवणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांवर होणारा अन्याय आहे. मराठा साम्राज्याचा नकाशा हा केवळ एक नकाशा नसून तो हिंदुस्तान मध्ये मराठ्यांची ताकद किती अफाट होती याचे जिवंत प्रतीक आहे हा नकाशा पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या पराक्रमाची व्याप्ती लक्षात येते. आपल्या इतिहासाची ही मोडतोड महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही केंद्र व राज्य सरकार आणि शिक्षण मंत्रालयाला विनंती आहे मराठा साम्राज्याचा जो नकाशा हटवला आहे तो अधिक प्रभावीपणे आणि अचूकपणे पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा #NCERT_चा_निषेध..!
    1
    जय शिवराय 🚩 #अटकेपार झेंडा फडकवणारे मराठा साम्राज्य हे भारताच्या अखंडतेचे प्रतीक आहे. ज्या कालखंडात मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थानचे रक्षण केले, तोच इतिहास येणाऱ्या पिढ्यांपासून लपवणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांवर होणारा अन्याय आहे. मराठा साम्राज्याचा नकाशा हा केवळ एक नकाशा नसून तो हिंदुस्तान मध्ये मराठ्यांची ताकद किती अफाट होती याचे जिवंत प्रतीक आहे हा नकाशा पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या पराक्रमाची व्याप्ती लक्षात येते. आपल्या इतिहासाची ही मोडतोड महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही केंद्र व राज्य सरकार आणि शिक्षण मंत्रालयाला विनंती आहे मराठा साम्राज्याचा जो नकाशा हटवला आहे तो अधिक प्रभावीपणे आणि अचूकपणे पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा
#NCERT_चा_निषेध..!
    user_Arun Vasantrao Nagalgave
    Arun Vasantrao Nagalgave
    Farmer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • **🚨 दौंड पोलिसांची मोठी कारवाई: १३ लाखांचा गांजा जप्त, फिल्मी स्टाईलने आरोपीला ठोकल्या बेड्या! 🚨** दौंड पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल **५२ किलो ३० ग्रॅम गांजा** पकडला आहे. पहाटेच्या सुमारास नाकाबंदी तोडून पळणाऱ्या तस्कराचा पाठलाग करून पोलिसांनी ही धडक कारवाई केली. अहिल्यानगरकडून साताऱ्याकडे गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या पथकाने दौंड-पाटस रोडवर सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपीने कारने धडक देऊन पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी जिवाची पर्वा न करता त्याला ताब्यात घेतले. **💰 जप्त मुद्देमाल:** 🔹 **गांजा:** ५२ किलो ३० ग्रॅम (किंमत १३ लाख ७ हजार ५०० रुपये) 🔹 **कार:** १० लाख रुपये किमतीची 'किया' कार 🔹 **आरोपी:** मुकेश धर्मिया कणोजे (वय ३६, रा. मध्य प्रदेश) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.
    1
    **🚨 दौंड पोलिसांची मोठी कारवाई: १३ लाखांचा गांजा जप्त, फिल्मी स्टाईलने आरोपीला ठोकल्या बेड्या! 🚨**
दौंड पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल **५२ किलो ३० ग्रॅम गांजा** पकडला आहे. पहाटेच्या सुमारास नाकाबंदी तोडून पळणाऱ्या तस्कराचा पाठलाग करून पोलिसांनी ही धडक कारवाई केली.
अहिल्यानगरकडून साताऱ्याकडे गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या पथकाने दौंड-पाटस रोडवर सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपीने कारने धडक देऊन पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी जिवाची पर्वा न करता त्याला ताब्यात घेतले.
**💰 जप्त मुद्देमाल:**
🔹 **गांजा:** ५२ किलो ३० ग्रॅम (किंमत १३ लाख ७ हजार ५०० रुपये)
🔹 **कार:** १० लाख रुपये किमतीची 'किया' कार
🔹 **आरोपी:** मुकेश धर्मिया कणोजे (वय ३६, रा. मध्य प्रदेश)
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • लातूरच्या रेनापुर नाक्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी, नेमकं लातूरत घडते तरी काय..?
    1
    लातूरच्या रेनापुर नाक्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी, नेमकं लातूरत घडते तरी काय..?
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    5 hrs ago
  • घरफोडी करणारी सराईत टोळीतील ३२ गुन्ह्यांतील कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद. लाखो रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026. लातूर जिल्हा तसेच शेजारील धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोडी व चोरीच्या सलग घटना घडत होत्या. बंद घरांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, पोलीस अधीक्षक अमोल तांबे लातूर यांच्या सूचनांनुसार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या विशेष कारवाईत या गुन्हेगारी टोळीतील मुख्य व कुख्यात आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दि. २४ एप्रिल २०२६ रोजी उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला. या कारवाईदरम्यान सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय २४ वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव) हा रेकॉर्डवरील व फरार आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने तत्परतेने त्यास पकडले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून – ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी व रोख रक्कम ₹५,०००/- असा एकूण ₹३५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांचा वापर करून रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. तपासाअंती आरोपीविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे 🔴 लातूर जिल्हा – २८ गुन्हे भादा, किल्लारी, कासारशिरसी, औसा, लातूर ग्रामीण व इतर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे. 🔴 धाराशिव जिल्हा – ४ गुन्हे 🔴 सोलापूर जिल्हा – ५ गुन्हे 🔴 कर्नाटक राज्य (बिदर) – ३ गुन्हे या प्रमाणे एकूण ३२ गुन्हे दाखल असून पुढील तपासादरम्यान गुन्ह्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या इतर साथीदारासह टोळी तयार करून गुन्हे केल्याची कबुली दिली आहे असून त्याच्या टोळी मधील काही आरोपींना या अगोदरच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस अमलदार माधव बिल्लापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांचे पथकाने अत्यंत समन्वय व कौशल्य दाखवत ही कारवाई यशस्वी केली.
    2
    घरफोडी करणारी सराईत टोळीतील ३२ गुन्ह्यांतील कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद. 
लाखो रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026.
लातूर जिल्हा तसेच शेजारील धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोडी व चोरीच्या सलग घटना घडत होत्या. बंद घरांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
मात्र, पोलीस अधीक्षक अमोल तांबे लातूर यांच्या सूचनांनुसार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने  राबविलेल्या विशेष कारवाईत या गुन्हेगारी टोळीतील मुख्य व कुख्यात आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे.
पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दि. २४ एप्रिल २०२६ रोजी उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला. या कारवाईदरम्यान सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे (वय २४ वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव) हा रेकॉर्डवरील व फरार आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने तत्परतेने त्यास पकडले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून – ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी व रोख रक्कम ₹५,०००/- असा एकूण ₹३५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांचा वापर करून रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.
तपासाअंती आरोपीविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे 
🔴 लातूर जिल्हा – २८ गुन्हे
भादा, किल्लारी, कासारशिरसी, औसा, लातूर ग्रामीण व इतर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे.
🔴 धाराशिव जिल्हा – ४ गुन्हे
🔴 सोलापूर जिल्हा – ५ गुन्हे
🔴 कर्नाटक राज्य (बिदर) – ३ गुन्हे
या प्रमाणे एकूण ३२ गुन्हे दाखल असून पुढील तपासादरम्यान गुन्ह्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे.
या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या इतर साथीदारासह टोळी तयार करून  गुन्हे केल्याची कबुली दिली आहे असून त्याच्या टोळी मधील काही आरोपींना या अगोदरच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.  सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ,  पोलीस अमलदार माधव बिल्लापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांचे पथकाने अत्यंत समन्वय व कौशल्य दाखवत ही कारवाई यशस्वी केली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.