जाहीर आवाहन अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या उमरखेड शहरातील जाहीर आवाहन अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या उमरखेड शहरातील स्मारकाभोवती असलेला अतिक्रमित पेट्रोल पंप तत्काळ हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सकल शिवप्रेमींनी केली होती. सदर अतिक्रमित पेट्रोल पंपाची मुदत 31 जुलै 2025 रोजी संपुष्टात आली होती. त्यामुळे त्याला पुन्हा मुदतवाढ देऊ नये, यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र, अखेर प्रशासनाने जनभावनेचा अनादर करून त्या पेट्रोल पंपाला पुन्हा मुदतवाढ दिली. या निर्णयाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय, सकल सामाजिक संघटना तसेच सकल शिवप्रेमी यांच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. परवा, दिनांक 27 एप्रिल 2026 (सोमवार) रोजी उमरखेड शहर व तालुका सकाळी ७:०० ते दुपारी १२:०० पर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११:०० वाजता उपविभागीय अधिकारी, उमरखेड यांना निवेदन देण्यात येणार आहे. पेट्रोल पंप हटत नाही तोपर्यंत ही लढाई संपूर्ण ताकदीने लढण्यात येईल. तरी, शहरासह तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना नम्र विनंती आहे की, दिनांक 27 रोजी (सोमवार) होणाऱ्या आंदोलनात आपण स्वयंप्रेरणेने सहभाग घ्यावा. तसेच व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, ही कळकळीची व नम्र विनंती. विनीत : सकल शिवप्रेमी, सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्ष, उमरखेड

- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे1
- जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… पाण्यासाठी रात्रभर जागरण… लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ… ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे! ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का? तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी. पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही! #जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- जाचक अटीमुळे मनरेगाचे काम हे ठप्प झाले आहे. बांधण्यात आलेल्या विहिरीचे पैसे शेतक-यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे. रखडलेले मनरेगा योजनेचे काम त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी शेतक-यांनी केली आहे आणि तश्या प्रकारचे निवेदन घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन1
- महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू विविध कर्मचारी संघटनांचा सहभाग1
- हदगाव येथे शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांच्या वतीने सामूहिक सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील विवाह सोहळ्याला हदगाव हिमायतनगर सह नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे, हा विवाह सोहळा हदगाव येथील रामलीला मैदान येथे ठीक दुपारी एक वाजता होणार असून या विवाह सोहळ्यामध्ये एकूण 30 जोडप्याचे लग्न लागणार आहे. हा विवाह सोहळा वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आल्याचे लोकनेते आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले तसेच नांदेड सह इतरही जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या नेते मंडळींना उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे.1