Shuru
Apke Nagar Ki App…
अवैध धंद्यांवर छापेमारी, आरोपी अडकला पोलीसांच्या जाळ्यात
Nagesh Awachar
अवैध धंद्यांवर छापेमारी, आरोपी अडकला पोलीसांच्या जाळ्यात
- GNBMangrulpir, Washim💣on 14 March
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sharad Dayedar1
- Post by Amravati News Update1
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा; शेगाव-चिखलीत कार्यक्रमांची धावपळ! बुलढाणा, दि.16 (जिमाका): राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यामुळे शेगाव व चिखली परिसरात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता नागपूरहून शेगाव येथील हेलिपॅडवर आगमन होणार आहे. त्यानंतर ते तत्काळ श्री संत गजानन महाराज संस्थान येथे जाऊन दर्शन घेणार असून हा कार्यक्रम सकाळी 10.15 वाजता निश्चित करण्यात आला आहे. यानंतर सकाळी 11 वाजता ते चिखलीकडे रवाना होणार आहेत. सकाळी 11.30 वाजता चिखली येथे आगमन होऊन शेरखजी बोंदरे यांच्या शेतातील हेलिपॅडवर उतरणार आहेत. पुढे दुपारी 11.45 वाजता देव्हडे फार्म अॅन्ड अॅग्रो टुरिझमच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याचा समारोप दुपारी 1 वाजता चिखली येथून नागपूरकडे प्रयाण करून होणार आहे. या दौऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे.1
- हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी न्यायापासून वंचित निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- खामगाव: वारकरी संप्रदायातील विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खामगाव येथे वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनाद्वारे वारकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मानधनाची अट रद्द करा,शासनाने वारकरी मानधनासाठी लावलेली ५० वर्षे वयाची अट त्वरित रद्द करावी,सर्व महिला भजनी मंडळांना वार्षिक २५,००० रुपये अनुदान मिळावे, महिला मंडळातील सदस्यांना वैयक्तिक रित्या दरमहा ५,००० रुपये मानधन सुरू करावे,बुलढाणा जिल्ह्यामध्ये 'जिल्हा मानधन समिती' स्थापन करून प्रलंबित असलेले सर्व अर्ज त्वरित मंजूर करावेत,वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी रासायनिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे.ती तातडीने प्रदूषण मुक्त करण्यासाठी कंपन्यांवर कारवाई करावी. या मागण्या मांडण्यात आल्या. जर तीन महिन्यांच्या आत उपरोक्त मागण्या मान्य झाल्या नाही,तर संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी मुंबईत मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वारकरी,महिला भजनी मंडळाच्या भगिनी आणि संप्रदायातील नागरिक उपस्थित होते.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Sharad Dayedar1