Shuru
Apke Nagar Ki App…
Looking to Buy Brand : Maruti Year of Registration : 2018 Budget : 150000 City / Locality : dhule Vehicle Type : Car Vehicle Condition : नए जैसा Fuel Type : Petrol good
Jitendra shivdas sonawane
Looking to Buy Brand : Maruti Year of Registration : 2018 Budget : 150000 City / Locality : dhule Vehicle Type : Car Vehicle Condition : नए जैसा Fuel Type : Petrol good
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Dhule Crime News | धुळ्यात सण-उत्सवाच्या तोंडावर मोठा शस्त्रसाठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई... A large cache of weapons seized in Dhule ahead of festivals; Major action by the local crime branch - सण-उत्सवाच्या तोंडावर धुळे पोलिसांची मोठी कारवाई! दोंडाईचा-शहादा रोडवर १० तलवारींचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हा साठा गुजरातमधून आणल्याचे समोर आले असून ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहा सविस्तर बातमी. - #DhuleNews #DhuleCrime #DhuleLCBAction #MaharashtraPolice #DhuleBreaking1
- धुळे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांसह विविध तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज दि. १५ सप्टेंबर रोजी निवेदने देण्यात आली. त्याच अनुषंगाने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. संजय बागडे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. “कोरडा दुष्काळ जाहीर करा”, “शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या”, “शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने सातत्याने ओढ दिल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांचे उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्व शासकीय सवलती लागू करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्याबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, उपाध्यक्ष नंदू अहिरराव, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, धुळे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, दिनकर जाधव, अमर फरताडे, नाना शिरसाठ, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.1
- कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!1
- धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त1
- ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣 ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣1
- आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन* जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते. चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली. भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते. ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.1
- ज्ञानेश्वर जाधव मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी! शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप आणि रक्तदान शिबिर1