तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर च्या माध्यमातून वयोवृद्ध किंवा अशिक्षित लोकांना फसवणाऱ्या ॲप आणि इतर गोष्टीची माहिती देण्यासाठी जनजागृती सुरू सायबर जनजागृतीचा तिसरा टप्पा सुरू,तक्रार निवारणासह ग्रामीण बँकिंग सुरक्षेवर लातूर पोलिसांचा भर लातूर (प्रतिनिधी) नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सायबर फसवणुकीबाबत प्रभावी जनजागृती करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १ ऑक्टोबरपासून ‘सायबर जनजागृती महिना’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध टप्प्यांमध्ये जनजागृती, तक्रार निवारण तसेच सायबर सुरक्षेसंदर्भातील विविध उपक्रम राबविण्यात येत असून, ८ ऑक्टोबरपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. हा टप्पा ११ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. सायबर जनजागृतीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तक्रार निवारण, ग्रामीण भागातील नागरिकांची सायबर सुरक्षितता, ग्रामीण बँकिंग सुरक्षा, व्यापारी वर्गासाठी सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच शांतता समितीच्या माध्यमातून जनजागृती यावर विशेष भर देण्यात येणार आहे. *तक्रार निवारणासाठी विशेष मोहीम* ८ ऑक्टोबर रोजी ‘GRM’ मोहीम राबविण्यात येत असून, सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रलंबित तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय कार्यवाही करण्यात येणार आहे. सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात पीडित मदत कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. या मदत कक्षाच्या माध्यमातून सायबर फसवणुकीच्या तक्रारींची माहिती घेणे, पीडितांना आवश्यक मार्गदर्शन करणे, संबंधित यंत्रणेशी समन्वय साधणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ती प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. *ग्रामीण भागात बँकिंग सुरक्षेबाबत जनजागृती* सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी बँकिंग व्यवहारांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच बँक ग्राहकांना OTP, ATM, UPI, QR Code, इंटरनेट बँकिंग, बनावट लिंक, बनावट फोन कॉल आणि KYC अपडेटच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील व्यापारी वर्गामध्ये डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबतही विशेष जनजागृती केली जाणार आहे. *शांतता समिती व व्यापारी वर्गाचाही सहभाग* सायबर जनजागृतीचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापारी व शांतता समितीच्या बैठका तसेच विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांनी सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण कसे करावे, फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत आणि तक्रार कुठे करावी, याबाबत माहिती दिली जाणार आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सायबर फसवणुकीची घटना घडल्यास घाबरून न जाता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. फसवणुकीनंतरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने विलंब न करता तक्रार नोंदवावी. सायबर गुन्हे रोखण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून नागरिकांची जागरूकता आणि सतर्कता तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे ‘सावधान नागरिक – सुरक्षित समाज’ या भावनेतून सायबर जनजागृती अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

- पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष साम्या कोरडे mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवताना पुणे येथे1
- काल अत्यविधी,आज राख सावडणार* अभय दादानी सुचवलं रोहित दादांनी करून दाखवल #लातूरपॅटर्न धन्यवाद रोहित दादा व शिवराज मोरे व आंदोलक विद्यार्थी... अभय साळुंके यांनी आपल्या भाषणात सुचवले आणि दुसऱ्याच दिवशी #MPSC आंदोलकांनी मुख्यमंत्री व भिमनवार यांचा अंत्यविधी आंदोलन स्थळाच्या बाजूच्या स्मशान भूमीत केला. आज राख भरणार अभिनव आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न.. सरकार जागे व्हा. *काल अत्यविधी,आज राख सावडणार* अभय दादानी सुचवलं रोहित दादांनी करून दाखवल #लातूरपॅटर्न धन्यवाद रोहित दादा व शिवराज मोरे व आंदोलक विद्यार्थी... अभय साळुंके यांनी आपल्या भाषणात सुचवले आणि दुसऱ्याच दिवशी #MPSC आंदोलकांनी मुख्यमंत्री व भिमनवार यांचा अंत्यविधी आंदोलन स्थळाच्या बाजूच्या स्मशान भूमीत केला. आज राख भरणार अभिनव आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न.. सरकार जागे व्हा.1
- नांदेड मूर्तिकार1
- पाणीटंचाईचे संकट गडद; नगर परिषद कार्यालयात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक* *पाणीटंचाईचे संकट गडद; नगर परिषद कार्यालयात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक* *“पाण्याचा अपव्यय टाळा, उपलब्ध पाणी साठा जपून वापरा- उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर* *पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर “वेस्टेज पाणी नाल्यात सोडू नका; पुनर्वापर करा- नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे* *पाण्याचा प्रत्येक थेंब जपा!पाण्यासाठी काटकसरीचा वापर करा- उपमुख्यधिकारी संतोष रोडे* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- “परळी शहरासह तालुक्यात अत्यल्प पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाण धरणात सध्या १९.७२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. जार व्यावसायिक, वॉशिंग सेंटर चालक आणि नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. वेस्टेज पाणी नाल्यात न सोडता त्याचा पुनर्वापर किंवा पुनर्भरण करावे. तीव्र पाणीटंचाईच्या काळात खासगी बोअरचे अधिग्रहण करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा असे आवाहन अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी, परळी वैजनाथ यांनी केले आहे. “वेस्टेज पाणी नाल्यात सोडू नका; पुनर्वापर करा” असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी केले आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब जपा!पाण्यासाठी काटकसरीचा वापर करा असे नागरिकांना उपमुख्यधिकारी संतोष रोडे यांनी आवाहन केले. पाणी वापर व अपव्ययावर नियंत्रणासाठी जार व्यावसायिक, वॉशिंग सेंटर चालकांची उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. परळी नगर परिषद सभागृहात शहरातील जार विक्री करणारे व्यावसायिक तसेच चारचाकी व दुचाकी वॉशिंग सेंटर चालकांची पाणीटंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, नगर परिषद उपमुख्याधिकारी संतोष रोडे, पाणीपुरवठा प्रमुख किरण उपाडे तसेच जार प्लांट व्यावसायिक उपस्थित होते. अत्यल्प पावसामुळे परळी वैजनाथ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाण्याचा अपव्यय रोखणे अत्यावश्यक आहे,असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी केले. शहरातील जार व्यावसायिक, वॉशिंग सेंटर चालक तसेच संबंधित व्यावसायिकांनी पाण्याचा वापर व वेस्टेजवर नियंत्रण ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. परळी शहराला सध्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असून, धरणात केवळ १९.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे गरजेचे असल्याचे उपजिल्हाधिकारी लाटकर यांनी स्पष्ट केले. नगर परिषदेकडे सार्वजनिक वापरासाठी सुमारे अंदाजे १००० ते ११०० बोअर असून, या जलस्रोतांवर नियंत्रण ठेवून आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. बोअरमधून अतिरिक्त पाणी उपसा होत असल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करावी . अन्यथा अतिरिक्त पाणी नाल्यांमधून वाहून जाऊन त्याचा अपव्यय होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. शहरात जार व्यावसायिकांचे १०० हून अधिक खासगी बोअर असल्याचे सांगून, व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी पाण्याची टाकी ठेवावी. वेस्टेज होणारे पाणी नाल्यात सोडण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करावा किंवा नागरिकांना सांडपाणी वापरासाठी उपलब्ध करून द्यावे. शक्य असल्यास अशा पाण्याचे पुनर्भरण करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. असेही उपजिल्हाधिकारी लाटकर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बोअरचे पाणी अथवा नगर परिषद पाणीपुरवठ्याची पाइपलाइन थेट घरात नेऊन अनधिकृत वापर होत असल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नळाचे पाणी घरासमोर पाइपद्वारे सोडणे, वाहन धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरणे टाळावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यास गरजेनुसार खासगी बोअर अधिग्रहित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. खासगी बोअरधारकांकडे पाणी उपलब्ध असल्यास त्यांनी आजूबाजूच्या कुटुंबांना पाणी देऊन सहकार्य करावे, तसेच पाणीटंचाईच्या काळात शक्य ती मदत करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी केले. परळी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून प्रमुख जलसाठ्यांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे. वाण मध्यम प्रकल्पात १९.७२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने जलसाठ्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने २४ तास पहारा तैनात केला आहे. अनधिकृत पाणी उपसा रोखणे आणि उपलब्ध पाण्याला पिण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळांना तोट्या लावाव्यात, पाण्याचा अपव्यय टाळावा तसेच कुठेही पाणीगळती किंवा तांत्रिक अडचण आढळल्यास तातडीने नगर परिषदेला कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांनी केले.2
- अयोध्या-काशी यात्रेवरून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने भव्य स्वागत श्री परमेश्वराच्या कृपाछायेत अविस्मरणीय तीर्थयात्रेची सुखरूप सांगता! 🚩 🛕 अयोध्या-काशी यात्रेवरून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. श्रावण महिन्यातील कथा सेवेतून लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या या भाग्यवान भाविकांनी अयोध्या, काशी, उज्जैन, शेगाव, रामटेक, औंढा नागनाथ आदी पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. 🚩 श्रीराम जन्मभूमी अयोध्या 🔱 काशी विश्वनाथाचे दर्शन 🙏 विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची भक्तिमय यात्रा ❤️ आणि अखेर श्री परमेश्वराच्या कृपेने सर्व भाविकांची सुखरूप घरवापसी! यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्यातर्फे ५० भाविकांना आहेराची भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नेहाताई कवळे पाटील यांच्यातर्फे गुळपावडरचे पाकीट देऊन भाविकांचा सत्कार करण्यात आला. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या या भक्तिमय उपक्रमामुळे भाविकांच्या मनात श्रद्धा, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 🙏🚩 🕉️ हर हर महादेव! 🚩 जय श्रीराम! 🙏 श्री परमेश्वर महाराज की जय! #श्रीपरमेश्वरमंदिर #वाढोणा #हिमायतनगर #अयोध्या #काशी #काशीविश्वनाथ #अयोध्याधाम #श्रीरामजन्मभूमी #उज्जैन #तीर्थयात्रा #धार्मिकयात्रा #भाविक #श्रावण #महादेव #हरहरमहादेव #जयश्रीराम #मंदिरट्रस्ट #श्रीपरमेश्वर #Nanded #Himayatnagar #ALMBharat #NNLMarathi1
- *काही दिवसापूर्वीच बनवलेला नवीन रस्ता बनवून पुन्हा फोडला! नांदेड मनपाचा ‘अजब-गजब’ कारभार; मनपा कार्यालयाजवळच रस्त्याची दुरवस्था "नागरिकांच्या पैशाचा अपव्यय" का...?* शिवकुमार काळे नांदेड: महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नांदेड मनपा कार्यालयाच्या अगदी शेजारी आणि बीएसएनएल (BSNL) मुख्य कार्यालयासमोर नुकताच कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला नवीन रस्ता काही दिवसांतच पुन्हा खोदण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्य प्रशासकीय इमारतींच्या नाकनाकाखाली चाललेल्या या 'अजब-गजब' कारभारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यय; नियोजनाचा बोजवारा शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या या मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले होते. मात्र, रस्ता तयार झाल्यानंतर लगेचच विविध वाहिन्या किंवा इतर कामांसाठी तो पुन्हा जेसीबी आणि मजुरांच्या साहाय्याने खोदण्यात येत असल्याचे चित्र आहे. "रस्ता तयार करण्यापूर्वी संबंधित विभागांना भूमिगत वाहिन्या किंवा इतर कामांचे नियोजन का करता आले नाही?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून विचारला जात आहे. विभागांमध्ये समन्वयाचा अभाव मनपाचा बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि टेलिकॉम किंवा विद्युत कंपन्या यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. एकदा रस्ता चांगला बनवला की तो पुन्हा खोदणे, ही नांदेडकरांसाठी नवीन बाब राहिलेली नाही. परंतु, थेट मनपाच्या मुख्य कार्यालयाशेजारीच असा प्रकार घडत असल्याने अधिकाऱ्यांच्या डोळ्यांवर नक्की कसली पट्टी बांधली गेली आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. नागरिकांचे हाल आणि धोक्याची घंटा नुकताच गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर अचानक मोठी खड्डे आणि खोदकाम झाल्याने या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहनधारकांना अचानक समोर येणाऱ्या या खोदकामामुळे अपघातांचा सामना करावा लागत आहे. धुळीचे साम्राज्य वाढल्याने पादचाऱ्यांनाही चालणे असह्य झाले आहे. जनतेकडून गोळा केल्या जाणाऱ्या कराच्या पैशांची ही निव्वळ उधळपट्टी असल्याची भावना जनमानसात उमटत आहे. प्रशासन उत्तर देणार का? वारंवार रस्ते बनवून ते पुन्हा फोडणाऱ्या या साखळीमागे नक्की कोण जबाबदार आहे? संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर मनपा आयुक्त काय कारवाई करणार? की दरवेळेप्रमाणे याही वेळी 'नियोजनाचा अभाव' असे सांगून पांघरूण घातले जाणार, याकडे आता सर्व नांदेडकरांचे लक्ष लागले आहे1
- चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील मौजे चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान 2026 अंतर्गत आंगण का मिलन हा उपक्रम भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या भगिनींचा सत्कार समारंभ तसेच बाल विद्यार्थी यांना खाऊवाटप करण्यात आले.1
- 'शेकाप'च्या मुख्य प्रवक्त्या चित्रलेखाताई पाटील, साम्याताई कोरडे यांनी शेकापच्या शिष्टमंडळासह आज पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेत त्यांच्या या लढ्यात शेतकरी कामगार पक्ष ठामपणे विद्यार्थ्यांसोबत असल्याचा विश्वास दिला. #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSCProtest #MPSCStudentSatyagraha1