प्रलंबित शासकीय कामांना गती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध* संतोष साखरे यांचे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर प्रतिपादन; संघटनांना प्रशासकीय बळ कोल्हापूर ११ सिटी न्यूज नेटवर्क राज्यातील प्रलंबित शासकीय कामांना गती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. संतोष साखरे यांनी आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना केले. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आयोजित बैठकीत, शिक्षक आणि पदवीधरांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित शासकीय कामांना गती देण्याच्या उद्देशाने श्री. साखरे यांनी उपस्थित राहून संघटनांच्या वतीने निवेदने स्वीकारली. यावेळी शिक्षक आणि पदवीधर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनेक प्रलंबित कामांची माहिती सांगितली. यावर श्री. संतोष साखरे यांनी तात्काळ सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत असून त्या थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. विकास कामांच्या बरोबरीनेच, 'झिरो पेंडन्सी' (शून्य प्रलंबन) मोहीम सर्व स्तरांवर सुरू करण्यात आली असून, हा उपक्रम त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. विजय जाधव, श्री. नाथाजी पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारच्या विकास आणि जनकल्याणकारी कामांना बळ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदैव तत्पर असल्याचे यावेळी दिसून आले.

- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील बेनगी गावात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान चक्रीवादळामुळे मोठा मंच उडून गेला. या अचानक झालेल्या घटनेमुळे मैदानात एकच खळबळ उडाली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- खासदार नारायण राणेंच्या दौऱ्यापूर्वी जिल्हा परिषदेत खळबळ; चक्क CEO नी काढली दुचाकींची हवा! सिंधुदुर्ग जिल्हा परिषद परिसरात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र खेबुडकर यांनी स्वतः जिल्हा परिषद आवारात उभ्या असलेल्या दुचाकींची हवा काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. नेमकी घटना काय? आज माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला भेट देणार होते. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या आवारात विस्कळीतपणे आणि बेशिस्तपणे लावण्यात आलेल्या दुचाकींमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र होते. याच दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी थेट मैदानात उतरून अनधिकृतपणे किंवा चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या दुचाकींची हवा काढण्यास सुरुवात केली. एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने अशा प्रकारे स्वतः रस्त्यावर उतरून गाड्यांची हवा काढल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारवाईचे कारण काय? मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद परिसरात शिस्त लावण्यासाठी आणि खासदारांच्या दौऱ्यावेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी वारंवार सूचना देऊनही पार्किंगचे नियम पाळले जात नव्हते. याच बेशिस्त पार्किंगचा 'प्रसाद' म्हणून CEO नी ही कडक पावले उचलल्याचे बोलले जात आहे.1
- सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.1
- इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते1
- पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.1
- भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी विक्रम शिंदे /भोर दि.११ भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.2
- जेजुरी श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये 151 डजन आंबे घेऊन आकर्षक आंबा सजावट करण्यात आली.1
- पत्रकारावरील हल्ल्याचे निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कापूरहोळ येथील तरुणाने मारली जाळीत उडी पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन विक्रम शिंदे /भोर दि.११ पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी कापूरहोळ (ता.भोर) येथील पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी सोमवार (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जाळीत उडी मारत अनोखे आंदोलन केले. २८ एप्रिल २०२६ रोजी कापूरव्होळ येथील हायवेवरील अतिक्रमण कारवाईचे मोबाईलवर चित्रीकरण करत असताना हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद दळवी, त्यांचा मुलगा व अन्य दोघांनी मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप पाचकाळे यांनी केला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून, हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने संज्ञेय गुन्हा दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच स्वतःस व कुटुंबास संरक्षण देण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.1
- माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती दडपशाहीचा गंभीर आरोप1