नर्सी परिसरातील ‘राज बार अँड रेस्टॉरंट’वर पोलिसांची धाड; सहा महिलांची सुटका, दोघे अटकेत नांदेड, दि. 6 एप्रिल : बिलोली उपविभागीय पोलिसांनी रामतिर्थ पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत नर्सी-शंकर नगर रोडवरील ‘राज बार अँड रेस्टॉरंट’ येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सुमारे 6 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सी शिवारातील संबंधित ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यात आल्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. छाप्यात रेस्टॉरंटच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत हा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले. या वेळी संतोष श्रीपत पवळे (वय 30) व शिवराज श्रीपत पवळे (वय 35, दोघेही रा. बालाजीनगर, नर्सी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सोहेल शेख (रा. पनवेल, मुंबई) हा महिलांची व्यवस्था करत असल्याचे समोर आले. तसेच या ठिकाणाचा मालक श्रीपत आनंदराव पवळे असल्याची माहिती पुढे आली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी 47,500 रुपये रोख, 6 मोबाईल (60 हजार रुपये) आणि MH-12SY-6411 क्रमांकाचे चारचाकी वाहन (5 लाख रुपये) असा एकूण 6,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या सहा महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील मदत व पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात येत आहे. या प्रकरणी रामतिर्थ पोलीस ठाण्यात पीटा (PITA) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पथकाचे कौतुक करण्यात आले आहे.

- नांदेड जिल्ह्याच्या घडामोडी साठी वाचत राहा दैनिक कलम वीर नांदेड ब्युरो ✍🏻 बातमीची फरक पाडते... ✍🏻💯%4
- नांदेड, दि. 6 एप्रिल : बिलोली उपविभागीय पोलिसांनी रामतिर्थ पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत नर्सी-शंकर नगर रोडवरील ‘राज बार अँड रेस्टॉरंट’ येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सुमारे 6 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सी शिवारातील संबंधित ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यात आल्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. छाप्यात रेस्टॉरंटच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत हा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले. या वेळी संतोष श्रीपत पवळे (वय 30) व शिवराज श्रीपत पवळे (वय 35, दोघेही रा. बालाजीनगर, नर्सी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सोहेल शेख (रा. पनवेल, मुंबई) हा महिलांची व्यवस्था करत असल्याचे समोर आले. तसेच या ठिकाणाचा मालक श्रीपत आनंदराव पवळे असल्याची माहिती पुढे आली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी 47,500 रुपये रोख, 6 मोबाईल (60 हजार रुपये) आणि MH-12SY-6411 क्रमांकाचे चारचाकी वाहन (5 लाख रुपये) असा एकूण 6,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या सहा महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील मदत व पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात येत आहे. या प्रकरणी रामतिर्थ पोलीस ठाण्यात पीटा (PITA) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पथकाचे कौतुक करण्यात आले आहे.1
- संत नामदेव महाराज मोठे स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह सत्याचे वर्ष 244
- होरो गाडी घेऊ नका गाडी खराब आहेत मुखेडगजानन मोटार मधुन गाडी1
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे उंद्री प दे ता मुखेड सम्राट कीर्तनकार ह.भ.प. हनमंत महाराज किणीकर1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दोन मुलींना एचपीव्ही लसीकरण करून सुरुवात करण्यात आली. वय वर्ष १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस बाबत माहिती, समज, गैरसमज, सामाजिक माध्यमावरील लसीची चुकीची माहिती आहे. त्या बाबत सविस्तर मार्गदर्शन पालकांना करण्यात आले व त्यांनी आपल्या पाल्याला एचपीव्ही लसीकरण करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे घेऊन आले1
- श्री संत नामदेव महाराज मठ्ठ स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद साठी2