*आरक्षणात विभागणी समतेचा मार्ग की राजकारणाचा डाव..?* भारतामध्ये आरक्षण ही केवळ धोरण नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या व्यवस्थेचा मूळ उद्देश होता—शतकानुशतके वंचित राहिलेल्या समाजघटकांना समान संधी देणे. परंतु आज उपवर्गीकरण या नावाखाली जे घडत आहे, ते या मूळ उद्देशालाच आव्हान देणारे ठरत नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.. उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर मागासवर्गीय गटांमध्येच पुन्हा विभागणी करून स्वतंत्र कोटा ठरवणे. वरकरणी हा निर्णय अधिक न्याय्य वाटप म्हणून मांडला जातो. पण या निर्णयामागील हेतू आणि परिणाम यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.. सरकार आणि काही धोरणकर्ते असा युक्तिवाद करतात की, एकाच गटात काही जातींना जास्त लाभ झाला आहे, तर काही अजूनही मागे आहेत. त्यामुळे त्या वंचित घटकांना वेगळा हिस्सा देणे आवश्यक आहे. परंतु प्रश्न असा आहे—ही समस्या आजच निर्माण झाली का..? आणि जर ती आधीपासूनच होती, तर त्यावर उपाय म्हणून समाजात नवी विभागणीच का..? याच ठिकाणी सरकारच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होतो. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजातील आंतरिक रेषा अधिक ठळक केल्या जात आहेत का..? एकजूट” या संकल्पनेऐवजी आतील स्पर्धा” आणि मतभेद वाढवण्याचा धोका निर्माण होत नाही का? कायदेशीरदृष्ट्याही हा मुद्दा वादग्रस्त आहे. E.V. Chinnaiah vs State of Andhra Pradesh या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींची यादी एकसमान असल्याचे स्पष्ट केले होते. तरीसुद्धा पुन्हा पुन्हा हा मुद्दा पुढे आणला जातो, यामागे नेमकं कारण काय..? राजकीय पातळीवर पाहिल्यास, उपवर्गीकरण हा केवळ सामाजिक सुधाराचा विषय राहिलेला नाही. तो एक संवेदनशील आणि मतदारांना प्रभावित करणारा मुद्दा बनला आहे. विविध गटांमध्ये वेगवेगळ्या अपेक्षा निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे का, हा प्रश्न सरळपणे विचारण्याची वेळ आली आहे. हे मान्य करावंच लागेल की समाजात असमानता आहे आणि काही घटक अजूनही मागे आहेत. पण त्या असमानतेवर उपाय म्हणून नवे तट निर्माण करणे, हे दीर्घकालीन दृष्टीने योग्य ठरेल का? की त्यामुळे समाजातील दरी आणखी वाढेल..? आज गरज आहे ती पारदर्शक धोरणांची आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाची. उपवर्गीकरणाचा निर्णय जर खरोखरच सामाजिक न्यायासाठी असेल, तर त्यामागील आकडे, अभ्यास आणि दीर्घकालीन परिणाम स्पष्टपणे जनतेसमोर मांडले गेले पाहिजेत. अन्यथा, हा निर्णय केवळ (सामाजिक न्याय) या नावाखाली घेतलेला राजकीय प्रयोग ठरण्याची भीती नाकारता येत नाही.. सामाजिक न्यायाच्या नावाखाली जर समाजातच नव्या भिंती उभ्या राहणार असतील, तर हा निर्णय सुधाराचा मार्ग आहे की फूट पाडण्याचा खेळ—याचा विचार आता समाजानेच करायला हवा. *राजेश गवई :- 7773988320* .

- Post by Sharad Dayedar1
- Post by Ahem Raza1
- Post by Amravati News Update1
- बाळापूर तालुक्यातील रिधोरा शेतशिवारातील राजेश लोहिया यांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीने प्रशासकीय यंत्रणेचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला आहे. या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा लाखो रुपयांचा हरभरा साठा असतानाही, तिथे आग विझवण्यासाठी साधी पाण्याची सोय किंवा 'फायर ऑडिट' नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर विषयावर रिधोरा येथील पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारच्या सुमारास राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊन परीसरात भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. ज्या गोडाऊनमध्ये शासकीय माल (नाफेड आणि सीसीआय) साठवला जातो, तिथे नियमानुसार अग्निशमन यंत्रणा आणि पाण्याची पुरेशी व्यवस्था असणे अनिवार्य आहे. मात्र, रिधोरा येथील या गोडाऊनमध्ये आगीच्या वेळी पाण्याचा टँकर सोडाच, पण साध्या पाण्याचीही सोय नव्हती. सुदैवाने अग्निशमन दलाच्या बंबांनी वेळीच पोहोचून आग विझवली, अन्यथा शेतकऱ्यांचा आणि सरकारचा कोट्यवधींचा माल खाक झाला असता. * प्रशासनाला जाब विचारणार - पोलीस पाटील "नाफेडच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या निकषावर अशा गोडाऊनची निवड केली जिथे सुरक्षेची कोणतीही साधने नाहीत? एखाद्या गरिबाचे गोडाऊन असते तर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली असती, मग मोठ्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनला सवलत का?" असा सवाल पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि गोडाऊन मालकावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.1
- Post by Sk Chand1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- नांदेड /महाराष्ट्र ब्युरो अरविंद जाधव यांचा रिपोर्ट हदगाव तालुक्यातील मौजे टाकराळा येथील एका शेतकऱ्यांनी महिंद्रा नोवा कंपनीचे ट्रॅक्टर 19 महिन्यापूर्वी खरेदी केले होते. सदरील ट्रॅक्टर शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून ऊस वाहतुकीसाठी घेतले होते 19 महिने ट्रॅक्टर सुरळीत चालल्यानंतर त्यांना ट्रॅक्टरच्या क्लच प्लेटमध्ये प्रॉब्लेम वाटत होता सदरील ट्रॅक्टर वारंटी मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या ट्रॅक्टरला दुरुस्तीसाठी महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीच्या शोरूम ला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले वारंटी मध्ये असतानाही कंपनी म्हणते ते ट्रॅक्टरचे काही पार्ट वॉरंटी मध्ये असतात आणि काही नाही त्यामुळे सदरील शेतकरी हतास झाला. महेंद्र कंपनीच्या मॅनेजर कडे वारंवार विनंती करून देखील महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स न देता पूर्व उडवा उडवीचीच उत्तरे दिली. ट्रॅक्टर खरेदी करते वेळेस कंपनीच्या डीलरने सदरील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करण्याचा सल्ला दिला त्यामुळे शेतकऱ्याने त्याच कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी केले परंतु ज्या वेळेस ट्रॅक्टर मध्ये तांत्रिक प्रॉब्लेम उद्भवला त्यावेळेस मात्र महिंद्रा कंपनीने आपले हात वर केले सदरील शेतकऱ्यांनी न्यायासाठी वंदे भारत टीव्ही चॅनलचे ब्युरो अरविंद जाधव यांच्याकडे चॅनलच्या माध्यमातून न्यायाची मागणी केली असता आमचे ब्युरो अरविंद जाधव यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर महिंद्रा कंपनीचे हादगाव येथील मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता ते काय म्हणाले ते पहा4
- Post by Sharad Dayedar1