logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आईचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाला न्यायालयाची चपराक दरमहा १५,००० रु. पोटगी देण्याचे आदेश पुसद : स्वतःच्या जन्मदात्या आईचा सांभाळ न करणाऱ्या एका शिक्षक मुलाला आणि सुनेला न्यायालयाच्या निकालाने चपराक बसली आहे. उदरनिर्वाह साठी खर्च मिळत नसल्याने न्यायालयात धाव घेतलेल्या ७० वर्षीय वृद्ध आईला पुसद न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने निकाल देत शिक्षक मुलगा आणि सुनेला आईच्या उदरनिर्वाहासाठी (खावटी) दरमहा १५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. पुसद न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. कन्हेरवाडी (ता. पुसद) येथील रहिवासी वृद्ध महिलेचा मुलगा आणि त्यांची पत्नी नीट सांभाळत नव्हते. मुलगा व सुन शिक्षक असूनही आईचे पालनपोषण करण्यास तो व त्याची पत्नी टाळाटाळ करत होते. अखेर हतबल झालेल्या आईने न्यायाचा हक्क मागण्यासाठी पुसद येथील न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक ८२/२०२१ नुसार खावटीची रक्कम (पोटगी) मिळण्याकरिता धाव घेतली होती. या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी पुसद येथील ४ थे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी (न्यायाधीश अमिता यु. यादव मॅडम) यांच्या न्यायालयात झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने वृद्ध आईची बाजू ग्राह्य धरली. न्यायालयाने अंतिम आदेश पारित करत, मुलगा आणि सुनेने आईला केस दाखल केल्याच्या तारखेपासून डिसेंबर २०२१ दरमहा १५ हजार रुपये खावटीची रक्कम द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रकरणात पीडित आई यांच्या वतीने पुसद येथील अॅड. शाहेद शेख यांनी अत्यंत सक्षमपणे बाजू मांडून आईला न्याय मिळवून दिला. समाजात निकालाची चर्चा या निकालामुळे पीडित वृद्ध आईला अखेरच्या काळात मोठा न्याय मिळाला आहे. आजकालच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगात आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुले आणि सुनांसाठी हा निकाल अत्यंत मार्गदर्शक आणि चपराक देणारा ठरेल, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे.

2 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•

More news from Maharashtra and nearby areas
  • जिल्हा परिषदेत महिला राज; विकासाला मिळणार नवी गती – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
    1
    जिल्हा परिषदेत महिला राज; विकासाला मिळणार नवी गती – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    13 hrs ago
  • Post by विलास बारहाते
    1
    Post by विलास बारहाते
    user_विलास बारहाते
    विलास बारहाते
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    53 min ago
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
    1
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली.
यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Laxman Ugile
    2
    Post by Laxman Ugile
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Sayad anees
    1
    Post by Sayad anees
    user_Sayad anees
    Sayad anees
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by विलास बारहाते
    1
    Post by विलास बारहाते
    user_विलास बारहाते
    विलास बारहाते
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    59 min ago
  • उदगीर पोलिसांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी सह पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरगोजे अटक लाचखोरी प्रकरणात दोन पोलिस अधिकारी अडकले; उदगीरमध्ये खळबळ उदगीर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर युनिटने गुरुवारी (दि. २ एप्रिल २०२६) उदगीर येथे मोठी सापळा कारवाई करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राहुल बाबूराव नागरगोजे (पोलीस हवालदार, उदगीर शहर) आणि राजकुमार पुजारी (पोलीस निरीक्षक, उदगीर ग्रामीण) यांना आरोपी करण्यात आले आहे. तक्रारदार (वय ४३, रा. हडपसर, पुणे) यांच्या मेव्हण्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १ एप्रिल रोजी प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी २ एप्रिल रोजी करण्यात आली असता, आरोपी राहुल नागरगोजे यांनी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सांगण्यावरून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच रक्कम उदगीर येथील पंचवटी हॉटेल, अहमदपूर रोड येथे देण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना राहुल नागरगोजे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे यांनी तत्काळ राजकुमार पुजारी यांना फोन करून “भेट झाली” अशी माहिती दिली. यावेळी तक्रारदाराने पुजारी यांच्याशी फोनवर संवाद साधला असता, “पाठवून द्या, मदत करता येईल” असे सांगून त्यांनीही लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान आरोपी नागरगोजे याच्याकडून ४५ हजार रुपयांची लाच रक्कम व एक मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला असून, आरोपी पुजारी यांच्याकडूनही एक मोबाईल हँडसेट मिळून आला आहे. दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत.
    4
    उदगीर पोलिसांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची  कारवाई; पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी सह पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरगोजे अटक 
लाचखोरी प्रकरणात दोन पोलिस अधिकारी अडकले; उदगीरमध्ये खळबळ
उदगीर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर युनिटने गुरुवारी (दि. २ एप्रिल २०२६) उदगीर येथे मोठी सापळा कारवाई करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात राहुल बाबूराव नागरगोजे (पोलीस हवालदार, उदगीर शहर) आणि राजकुमार पुजारी (पोलीस निरीक्षक, उदगीर ग्रामीण) यांना आरोपी करण्यात आले आहे. तक्रारदार (वय ४३, रा. हडपसर, पुणे) यांच्या मेव्हण्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १ एप्रिल रोजी प्राप्त झाली होती.
तक्रारीची पडताळणी २ एप्रिल रोजी करण्यात आली असता, आरोपी राहुल नागरगोजे यांनी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सांगण्यावरून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच रक्कम उदगीर येथील पंचवटी हॉटेल, अहमदपूर रोड येथे देण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना राहुल नागरगोजे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे यांनी तत्काळ राजकुमार पुजारी यांना फोन करून “भेट झाली” अशी माहिती दिली. यावेळी तक्रारदाराने पुजारी यांच्याशी फोनवर संवाद साधला असता, “पाठवून द्या, मदत करता येईल” असे सांगून त्यांनीही लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.
कारवाईदरम्यान आरोपी नागरगोजे याच्याकडून ४५ हजार रुपयांची लाच रक्कम व एक मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला असून, आरोपी पुजारी यांच्याकडूनही एक मोबाईल हँडसेट मिळून आला आहे. दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.