logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वरूड शिवारात चिकलठाणा पोलिसांचा छापा: ५ गोवंश जनावरांची सुटका, १.१५ लाखांचा मुद्देमाल व कत्तलीचे साहित्य जप्त* *वरूड शिवारात चिकलठाणा पोलिसांचा छापा: ५ गोवंश जनावरांची सुटका, १.१५ लाखांचा मुद्देमाल व कत्तलीचे साहित्य जप्त* वरूड शिवार (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे चिकलठाणा पोलीस यांनी ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान कारवाई करत अवैध गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळून लावला आहे. शेत गट नं. ३२३ मधील एका गोठ्याजवळ लिंबाच्या झाडाखाली छापा टाकून पोलिसांनी ५ गोवंश जनावरांची सुरक्षित सुटका केली. दिनांक २८/०८/२०२६ रोजी रात्रौ ०३:१५ वा. सुमारास ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वरूड शिवारात शेत गट नं. ३२३ मध्ये छापा टाकला असता, आरोपींनी स्वतःच्या आर्थिक गैरफायद्यासाठी गुन्हेगारी कट रचून, अत्यंत बेकायदेशीर व अमानुष रितीने चारा-पाण्याविना कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली ५ गोवंश जनावरे आणि कत्तलीचे साहित्य आढळून आले. पोलीस पथकाने तत्परता दाखवत सुमारे १,१५,०००/- रुपये किंमतीची ५ गोवंश जनावरे व कत्तलीचे साहित्य जागीच जप्त केले. जप्त करण्यात आलेली जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने चिकलठाणा येथील गोशाळेत सुपूर्द करण्यात आली आहेत. आरोपी: १. सलमान युसूफ खान २. जावेद युसूफ खान (दोन्ही रा. वरूडकाजी शिवार, शेत गट नं. २३२, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(A), ११(१)(D), ११(१)(H) सह महाराष्ट्र पशुसंवर्धन (संरक्षण) अधिनियम १९७६ चे कलम ५(A), ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, मा. प्रशांत स्वामी, अपर पोलीस अधीक्षक व मा. श्रीमती पूजा नांगरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे आणि त्यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

3 hrs ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
3 hrs ago
3c511ea4-4321-41d6-b8c4-ba77987e82a7

वरूड शिवारात चिकलठाणा पोलिसांचा छापा: ५ गोवंश जनावरांची सुटका, १.१५ लाखांचा मुद्देमाल व कत्तलीचे साहित्य जप्त* *वरूड शिवारात चिकलठाणा पोलिसांचा छापा: ५ गोवंश जनावरांची सुटका, १.१५ लाखांचा मुद्देमाल व कत्तलीचे साहित्य जप्त* वरूड शिवार (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे चिकलठाणा पोलीस यांनी ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान कारवाई करत अवैध गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळून लावला आहे. शेत गट नं. ३२३ मधील एका गोठ्याजवळ लिंबाच्या झाडाखाली छापा टाकून पोलिसांनी ५ गोवंश जनावरांची सुरक्षित सुटका केली. दिनांक २८/०८/२०२६ रोजी रात्रौ ०३:१५ वा. सुमारास ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वरूड शिवारात शेत गट नं. ३२३ मध्ये छापा टाकला असता, आरोपींनी स्वतःच्या आर्थिक गैरफायद्यासाठी गुन्हेगारी कट रचून, अत्यंत बेकायदेशीर व अमानुष रितीने चारा-पाण्याविना कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली ५ गोवंश जनावरे आणि कत्तलीचे साहित्य आढळून आले. पोलीस पथकाने तत्परता दाखवत सुमारे १,१५,०००/- रुपये किंमतीची ५ गोवंश जनावरे व कत्तलीचे साहित्य जागीच जप्त केले. जप्त करण्यात आलेली जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने चिकलठाणा येथील गोशाळेत सुपूर्द करण्यात आली आहेत. आरोपी: १. सलमान युसूफ खान २. जावेद युसूफ खान (दोन्ही रा. वरूडकाजी शिवार, शेत गट नं. २३२, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(A), ११(१)(D), ११(१)(H) सह महाराष्ट्र पशुसंवर्धन (संरक्षण) अधिनियम १९७६ चे कलम ५(A), ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, मा. प्रशांत स्वामी, अपर पोलीस अधीक्षक व मा. श्रीमती पूजा नांगरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे आणि त्यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन
    1
    भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    32 min ago
  • सिल्लोड शहरात रक्षाबंधन निमित्त आमदार जो सत्कार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर.... सिल्लोड (प्रतिनिधी) : शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला भगिनींनी आमदार अब्दुल सत्तार यांना राखी बांधल्या. रक्षाबंधनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित महिला भगिनींना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, “भावाचा आधार आणि बहिणीची माया हे अतूट नाते रक्षाबंधनाच्या माध्यमातून अधिक दृढ होते. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाचे वचन देतो. हे नाते प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत असून, महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपयांचे अनुदान जमा होत आहे. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल “आम्ही यापूर्वीच सांगितले होते की, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय नसून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे,” असे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले. महिला आता केवळ ‘चूल आणि मूल’ यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून आयएएस, आयपीएस, इंजिनीअरिंगसह विविध क्षेत्रांत महिला अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. “मी जरी आपला सख्खा भाऊ नसलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून, त्यांच्या मदतीसाठी आयुष्यभर कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, शकुंतलाबाई बनसोड, मेघा शाह, नगरसेविका वैशाली पाटील, रेखा गायकवाड, पर्वताबाई दुधे, तसेच सुमनबाई तांगडे, शांताबाई कावले, कमलबाई जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
    3
    सिल्लोड शहरात रक्षाबंधन निमित्त आमदार जो सत्कार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर....
सिल्लोड (प्रतिनिधी)  : शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला भगिनींनी आमदार अब्दुल सत्तार यांना राखी बांधल्या.
रक्षाबंधनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित महिला भगिनींना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, “भावाचा आधार आणि बहिणीची माया हे अतूट नाते रक्षाबंधनाच्या माध्यमातून अधिक दृढ होते. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाचे वचन देतो. हे नाते प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत असून, महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपयांचे अनुदान जमा होत आहे. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल
“आम्ही यापूर्वीच सांगितले होते की, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय नसून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे,” असे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले.
महिला आता केवळ ‘चूल आणि मूल’ यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून आयएएस, आयपीएस, इंजिनीअरिंगसह विविध क्षेत्रांत महिला अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. “मी जरी आपला सख्खा भाऊ नसलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून, त्यांच्या मदतीसाठी आयुष्यभर कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, शकुंतलाबाई बनसोड, मेघा शाह, नगरसेविका वैशाली पाटील, रेखा गायकवाड, पर्वताबाई दुधे, तसेच सुमनबाई तांगडे, शांताबाई कावले, कमलबाई जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
    1
    आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन
छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
    2
    *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी*

*बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी*
बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    बांधकाम कंत्राटदार बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • संभाजीनगर -९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज छ संभाजीनगर ९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज ANC - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल ९०३ शाळांमध्ये पुरेशा स्वच्छतागृहांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांसाठी ८०२, तर विद्यार्थिनींसाठी तब्बल ८७५ स्वतंत्र स्वच्छतागृहांची गरज आहे. अनेक शाळांमधील उपलब्ध स्वच्छतागृहे दुरवस्थेत असून पाण्याअभावी वापरात नसल्याचे चित्र आहे. विशेषत,विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत असून, सुरक्षित स्वच्छतागृहांच्या अभावामुळे शाळा गळतीचा धोका वाढला आहे. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर आणि सेसमधून निधी उपलब्ध करून देऊन नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिले आहे.
    1
    संभाजीनगर -९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज
छ संभाजीनगर 
९०३ शाळा स्वच्छतागृहाविना,मुलींसाठी ८७५ स्वतंत्र शौचालयांची गरज
ANC - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल ९०३ शाळांमध्ये पुरेशा स्वच्छतागृहांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांसाठी ८०२, तर विद्यार्थिनींसाठी तब्बल ८७५ स्वतंत्र स्वच्छतागृहांची गरज आहे. अनेक शाळांमधील उपलब्ध स्वच्छतागृहे दुरवस्थेत असून पाण्याअभावी वापरात नसल्याचे चित्र आहे. विशेषत,विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत असून, सुरक्षित स्वच्छतागृहांच्या अभावामुळे शाळा गळतीचा धोका वाढला आहे. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर आणि सेसमधून निधी उपलब्ध करून देऊन नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिले आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    9 hrs ago
  • पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाची उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात बैठक संपन्न
    1
    पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाची उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात बैठक संपन्न
    user_Attal Mat
    Attal Mat
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • आंदोलनापूर्वीच अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा मोठा जमाव ! मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी जमू लागली आहे. उद्यापासून होणाऱ्या आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे दाखल होत आहेत.
    1
    आंदोलनापूर्वीच अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा मोठा जमाव !
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी जमू लागली आहे.
उद्यापासून होणाऱ्या आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागांतून मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे दाखल होत आहेत.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    48 min ago
  • लाडक्या बहिणींचे भाजप नेत्यांसोबत विशेष रक्षाबंधन; नेत्यांच्या हातावर राख्यांनी सजली बंधुभावाची नाती छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या विभागीय कार्यालयात लाडक्या बहिणींसोबत विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार सुहास शिरसाठ, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना बहिणींनी राख्या बांधल्या. राखी बांधल्यानंतर नेत्यांनीही बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजप कार्यालयातील नेत्यांच्या हातावर विविध रंगांच्या राख्यांनी गच्च भरल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. या विशेष रक्षाबंधनाचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतला.
    1
    लाडक्या बहिणींचे भाजप नेत्यांसोबत विशेष रक्षाबंधन; नेत्यांच्या हातावर राख्यांनी सजली बंधुभावाची नाती
छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या विभागीय कार्यालयात लाडक्या बहिणींसोबत विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार सुहास शिरसाठ, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना बहिणींनी राख्या बांधल्या. राखी बांधल्यानंतर नेत्यांनीही बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजप कार्यालयातील नेत्यांच्या हातावर विविध रंगांच्या राख्यांनी गच्च भरल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. या विशेष रक्षाबंधनाचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.
    1
    जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा..

रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल..


जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा..
रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.