सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका ; अर्ज 30 एप्रिल पर्यंत करण्याचे आवाहन नांदेड, दि. 01 एप्रिल :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 83 व 88 अन्वये सहकारी संस्थांच्या चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यात येत आहे. यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले (वय 70 वर्षे पूर्ण न झालेले) अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, वकील तसेच सनदी लेखापाल यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर येथे तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर/धाराशिव/बीड/नांदेड व संबंधित जिल्ह्यांतील सर्व उपनिबंधक व सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. हे अर्ज 01 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्राप्त होऊ शकतात. संबंधित पात्र व्यक्तींनी परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत संबंधित कार्यालयात सादर करावेत. याबाबतची सविस्तर सूचना संबंधित कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे आवाहन प्रवीण फडणवीस, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी केले आहे.

- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या एक वर्षात जवळपास ११० मोबाईल हे लंपास झालेले आहे. लंपास झालेल्या ११० मोबाईलपैकी ६२ मोबाईल हस्तगत करण्यात घाटंजी पोलीसांना यश आले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल मुळ मालकांना परत करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे.1
- Post by Dhanjay surve Surve1
- परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक1
- रिसोड शहरामध्ये पावसांना दमदार हजेरी विजांच्या कडकडाट शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान! रिसोड शहर प्रतिनिधी रिसोड:-रिसोड शहरामध्ये विजांच्या कडकडात व संध्याकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गार पीट व काही ठिकाणी पाण्याने गदारोळ घातले व या पावसामुळे शेतकऱ्यांचे आठवनाथ नुकसान काही ठिकाणी झालेले आहे थोडा वारा सुद्धा त्यामध्ये होता त्यामुळे कांद्याचे ही नुकसान झालेले आहेत तरी शेतकऱ्यांना आर्थिक शासनाने मदत देऊन त्यांची हळदीचे ही सुद्धा फार प्रमाणात नुकसान झालेले काही शेतकऱ्यांच्या हार्दिक काढणे सुद्धा चालू आहे व काहींच्या काढलेल्या भिजल्या व काहींना वाळवण्यासाठी सुद्धा टाकलेले आहेत त्यामुळे त्यांना पाणीसुद्धा लागू शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले व यामध्ये शेतकरी हवालदिन झाला या अगोदर सोयाबीनच्या टायमात सुद्धा शेतकऱ्यांना एक मोठं संकट यावर्षी पाऊस जास्ती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हळदीचे तर नुकसान झाले परंतु सोयाबीन तूर हरभरा कांदा लसन असे शेतकऱ्याचे बरेचसे पीक उध्वस्त झाले आणि त्यामध्ये शेतकरी हा अडचणीत सापडला त्यामुळे आज शेतकऱ्यांना व यामध्ये बाजारपेठ मध्ये सुद्धा ग्राहक राहिलेले नाही कारण शेतकरी जर अडचणीत असला तर पूर्ण बाजारपेठ सुद्धा अडचणीत सापडते कारण लग्नसरायच्या टायमामध्ये सुद्धा ग्राहक राहिलेले नाही कारण शेतकरी अडचणीत असल्यामुळे यावर्षी 25 ते 26 साल शेतकऱ्यांना खूप अडचणीचे गेले आणि पुढचे सध्या चालू असलेल्या विजेचा कडकडाट व सुगारपिटीच्या भीतीने शेतकऱ्यांना ताडपत्री सुद्धा खरेदी करण्यासाठी त्यांची ऐपत राहिलेली नाही त्यामुळे या सारख्या परिस्थितीमध्ये झालेले नुकसान शेतकऱ्यांना कसे भरून निघेल यासाठी आर्थिक मदत देऊन त्यांना आपले नुकसान झालेले हे सुद्धा यामध्ये भारतीय होईल व त्यांना दिलासा मिळेल अशी शासनाने मदत करावी संध्याकाळच्या टायमाला एवढी काही गारपीट व विजाता कडकडात रिसोड तालुक्यात सर्वात मोठा विजेचा कडकडाट झालेला आहे व शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत मिळेल ती शासनाने द्यावी1
- मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.1
- घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे3
- हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी तिसऱ्यांदा आंदोलन! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तर्फे पुन्हा उपोषण सुरुवात झाले असून, बुधवारी दुसरा दिवस उजाडला आहे. 📅 31 मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण 👉 जीव गेला तरी बेहतर मात्र राजेंच्या पुतळ्यासाठी “जागा मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही” – माधव शिंदे नगरपंचायतीच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांचे लक्ष या आंदोलनाकडे #ShivajiMaharaj #Himayatnagar #Protest #ShivSmarak #Maharashtra BreakingNews PublicDemand MarathaPride1
- भाजपा स्थापना दिवस व SIR मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक भाजप संघटनमंत्री संजय कौडगे यांचे मार्गदर्शन1
- मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.1