फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा पोस्टर स्पर्धेतून नावीन्यपूर्ण कल्पनांचा आविष्कार..! बाभूळगाव : एस.एन.डी. फार्मसी महाविद्यालयात ९२ विद्यार्थ्यांचा सहभाग,६ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड संशोधनाची जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना कृतीची जोड देत बाभूळगाव येथील एस.एन.डी. कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थ्यांनी विविध संशोधन संकल्पना पोस्टरच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केल्या. यातून विद्यार्थ्यांच्या विविध कल्पनांचा आविष्कार पहावयास मिळाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित महाविद्यालयीन स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धेत डी. फार्म., बी. फार्म. आणि फार्म. डी. अभ्यासक्रमातील तब्बल ९२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेतून पदवीपूर्व व पदव्युत्तर गटातील प्रत्येकी तीन अशा सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील नावीन्यपूर्ण संशोधन संकल्पना पोस्टर सादरीकरणातून मांडल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, चिकित्सक विचारसरणी आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अमोल गायके यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सादर करण्यात आलेल्या संशोधन पोस्टर्सचे परीक्षण प्रा. डॉ. भास्कर आहेर व प्रा. डॉ. सचिन आगलावे यांनी केले. संशोधनाची गुणवत्ता, नावीन्यता, वैज्ञानिक दृष्टिकोन, विषयाची मांडणी आणि सादरीकरणाची प्रभावीता या निकषांवर पोस्टर्सचे मूल्यमापन करण्यात आले. शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. विकास शिंदे तसेच शैक्षणिक संशोधन समन्वयक प्रा. रामदास दराडे, आविष्कार समन्वयक प्रा. सयाली पागिरे, प्रा. मनोज गरड व प्रा. महेंद्र वरपे यांनी नियोजन व समन्वय केले. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बक्षीस वितरण व समारोप समारंभ झाला. विजेत्या विद्यार्थ्यांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त सहभागाबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विभागीय स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी निवड झालेल्या सहा विद्यार्थ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देतानाच नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालयात संशोधन संस्कृती व नवोपक्रमाची वृत्ती रुजण्यास हातभार लागल्याचे प्राचार्य डॉ.गायके यांनी सांगितले. या उपक्रमाचे कौतुक करत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आमदार किशोर दराडे, युवा नेते कुणाल दराडे, संस्थेचे संचालक रुपेश दराडे,प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे,समन्वयक सुनील पवार आदींनी अभिनंदन केले.

- सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके1
- मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.1
- कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!1
- नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार नाशिक गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.1
- ब्रेकिंग न्यूज आप लोगों bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती1
- *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक3
- प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने अभिवादन उपमहापौर विलास शिंदे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले पुजन नाशिक :-महानगरपालिकेच्या वतीने केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर,विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त जगताप, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, मनीषा पाटेकर,कनिष्ठ अभियंता तेजल मोरे,साहेबराव भोसले,श्रीकांत भोई,रमेश पागे, संजय मोरे, मनोज गायधनी, रवी पवार आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.1
- पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन! नगरसेवकांचा धारणकरांवर हल्लाबोल; कारवाईची मागणी “काम करा, अन्यथा घरी बसवण्याचा आयुक्तांचा स्मार्ट सिटीच्या सीईओंना इशारा वॉल मन च्या विभागनीय बदल्या करण्याचे महापौरांचे आदेश4