जलसंपदा विभागातील निवृत्त अनुभवी अभियंते व अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा राज्याच्या भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी उपयोग करून घेण्यासाठी विभाग तसेच प्रत्येक महामंडळाच्या स्तरावर सल्लागार मंडळ स्थापन करण्याबाबत विचार करावा, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा विभागातील निवृत्त अनुभवी अभियंते व अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा राज्याच्या भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी उपयोग करून घेण्यासाठी विभाग तसेच प्रत्येक महामंडळाच्या स्तरावर सल्लागार मंडळ स्थापन करण्याबाबत विचार करावा, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी #यशदा येथे आयोजित अभियंता गौरव #पुरस्कार वितरण सोहळ्यात सांगितले. राज्यातील शेती व जलव्यवस्थेसाठी अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, जलव्यवस्थापन व सिंचन क्षेत्रात उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. जलसंपदा विभागातील पुरस्कारांची संख्या वाढवून पुढील वर्षापासून प्रत्येक महामंडळासाठी तीन ते पाच पुरस्कार देण्यास मान्यता देत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी जलसंपदा विभागातील सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले. जलसंपदा विभागातील अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जलविकासाला मोठी चालना मिळाली आहे. धरणे बांधण्यासोबतच त्यातील पाणी शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचविणे आणि प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. पाइपद्वारे वितरण प्रणाली, ठिबक व तुषार सिंचनाचा प्रभावी वापर, धरणांतील गाळ काढणे, पाण्याचा पुनर्वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. जलप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी भूसंपादन, वन व पर्यावरण मंजुरी आणि पुनर्वसनाच्या बाबींचे बांधकामासोबत समन्वयाने नियोजन करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले. तसेच ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन, सिंचन क्षेत्रवाढ आणि लोकसहभागासाठी नियोजन करण्यावर भर देत, तांत्रिक मनुष्यबळाला प्रोत्साहन देण्यासाठी अभियंता पुरस्कारांची संख्या वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली. तसेच ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2024’मध्ये महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

- हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण . शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भक्तिमय उपक्रमामुळे परिसरात चैतन्यपूर्ण आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले. हलवाई गणेशासमोर विद्यार्थ्यांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण दरवर्षीप्रमाणे यंदाही हलवाई गणेशासमोर विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. डेक्कन स्कुलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी अथर्वशीर्षाचे महत्त्व व महती विशद करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे उपाध्यक्ष वैभव लांडे, शरद मुसळे, मंडळाचे माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, अशोक काळे, प्रेम मुसळे,श्याम परदेशी, अविनाश जाधव, प्रणव मुसळे, बाळासाहेब ढोबळे ,सिंकदर मन्यार रमणलाल मुसळे, नारायण काळे, श्याम कोळपकर , शिक्षक सखाराम पुरी, आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. आभार अशोक काळे यांनी मानले. हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. काही वर्षांपूर्वी मंडळाने विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून वाचलेल्या निधीतून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मंडळाचा उत्सव मंडप खड्डेविरहित ठेवण्याची परंपराही कायम आहे. शहरात महिलांसाठी सामूहिक महिला आरतीचा उपक्रम सर्वप्रथम मंडळाने सुरू केला. पर्यावरण संवर्धनासाठी महिला आरतीच्या वेळी महिलांना तुळशीची तसेच देशी वृक्षांची रोपे भेट देण्यात येतात. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटली जातात. गणेशोत्सव काळात बंदोबस्त व स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिस व नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळ्यातून सन्मान केला जातो. आरोग्य शिबिरे, जनजागृती, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप असे उपक्रमही राबविले जातात. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आतापर्यंत ३५ हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनाकाळात गरजू नागरिकांना अन्नधान्य किट, तसेच सांगली व महाड परिसरातील पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत मंडळाने केली. लोकवर्गणीतून हलवाई गणेशाला चांदीचे आभूषणे अर्पण करण्यात आली असून गणेशजयंतीच्या महाप्रसादासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. दरवर्षी पौराणिक, धार्मिक किंवा सामाजिक विषयांवरील देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. विविध धर्मांचे नागरिक मंडळाच्या उपक्रमात सहभागी होतात. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीनेही मंडळाच्या कार्याची दखल घेऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण, मुलांना खाऊवाटप तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची सांगड घालणारे मंडळ म्हणून हलवाई चौक गणेश मित्र मंडळाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.4
- महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!” कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे." "महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला. दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.1
- मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.1
- Post by सोनू पटेल4
- छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना पाटोदा येथे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण दीर्घकाळ सुरू होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अशक्तपणा आणि निर्जलीकरणाचा त्रास झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विविध वैद्यकीय तपासण्या पुन्हा करण्यात येणार आहेत. सध्या जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती तपासली जात आहे. त्यांची सध्याची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीकडे मराठा समाजासह समर्थकांचे लक्ष लागले आहे.4
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री शहरात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे,1
- विरोधकांनी संविधानाचा अपमान केला; नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पल हार घालून २५ हजार कर्जतकरांचा अपमान - सुनील शेलार यांचा हल्लाबोल कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून विरोधी नगरसेवकांनी केवळ नगराध्यक्षांचाच नव्हे तर संविधानाचा, घटनेचा आणि कर्जतच्या २५ हजार जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघात भाजप नेते व नगराध्यक्षा पती सुनील शेलार यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी दलित वस्ती निधी दिला नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी विरोधकांनी दिली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. निधी वाटप सर्वानुमते झाले - सुनील शेलार यावेळी बोलताना सुनील शेलार म्हणाले की, "दलित वस्ती निधी वाटपाचा विषय हा एकट्या नगराध्यक्षांचा विषय नाही. या संदर्भात सर्व नगरसेवकांनी एकत्रित विशेष सभा घेऊन सर्वानुमते निधीचे वाटप केलेले आहे. प्रभाग क्रमांक १५ ला यापूर्वीच सर्वात जास्त निधीचे वाटप झालेले आहे. कर्जत शहरातील इतर प्रभागात देखील मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय बांधव राहतात. त्यांनाही विकासापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे त्या प्रभागात देखील निधी दिला पाहिजे, या सर्व समावेशक भावनेने हा निधी देण्यात आला आहे. यात कोणताही गैरव्यवहार किंवा नियमबाह्यता झालेली नाही." "मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी मुद्दामहून या विषयाला वेगळे वळण देऊन नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान केला. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे," असेही शेलार म्हणाले. या घटनेचा निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1