logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आविष्कारातून विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्यांवर संशोधन करावे : प्राचार्य डॉ. पाचोरे एस.एस.जी.एम.महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा; ७३ प्रकल्पांत ११७ विद्यार्थी सहभागी कोपरगाव प्रतिनिधी ( राजेंद्र तासकर )  : “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी आपल्या परिसरातील प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी उपाय शोधणे ही विद्यार्थ्यांच्या संशोधनाची खरी दिशा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गावापासून, तालुक्यापासून आणि परिसरातील समस्यांपासून संशोधनाची सुरुवात करून त्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणारे प्रकल्प विकसित करावेत,” असे प्रतिपादन स्वामी मुक्तानंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पाचोरे यांनी केले .ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज विज्ञान, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेच्या निकाल व पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते. डॉ. पाचोरे म्हणाले की, आविष्कार स्पर्धा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची संधी देते. केवळ इंटरनेटवरून माहिती संकलित करून प्रकल्प तयार करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी समस्येचा सखोल अभ्यास करून त्यावर नवीन, व्यवहार्य आणि समाजोपयोगी उपाय शोधला पाहिजे.  कृषी, पर्यावरण, प्लास्टिक कचरा,  पाणीप्रश्न आणि टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन यांसारख्या ज्वलंत विषयांवर संशोधनासाठी मोठ्या संधी आहेत. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांचे प्रकल्प पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतात. आविष्कार स्पर्धेचे परीक्षक प्रा. संजय सांगळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक करताना, बक्षीस मिळणे हा स्पर्धेचा एक भाग असून त्यापेक्षा संशोधनात सातत्य ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रा. सीमा दाभाडे यांनी अंतिम निकालापेक्षा विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयासाठी घेतलेली मेहनत आणि विकसित केलेली संशोधनवृत्ती अधिक महत्त्वाची असल्याचे सांगितले. केवळ समस्या मांडण्याऐवजी त्या समस्येवर प्रत्यक्ष कोणता उपाय करता येईल, याचा विचार विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “यावर्षी महाविद्यालयातील ७३ प्रकल्पांमध्ये ११७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ही समाधानाची बाब आहे.  विद्यार्थ्यांनी स्पर्धेपुरते मर्यादित न राहता आपल्या कल्पनांचा पुढे विकास करावा. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चांगल्या प्रकल्पांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न राहील.  ज्ञान, कौशल्य आणि कलात्मकता यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आविष्कारातील कल्पनांना योग्य दिशा मिळाल्यास त्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतात,”  असे प्रतिपादन केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. राजेश मंजुळ (सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय,संगमनेर), प्रा. सूर्यवंशी (संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय), तर अंतर्गत परीक्षक म्हणून डॉ. नामदेव आडमुठे, डॉ. विलास जीवतोडे आणि प्रा. काजल साळुंके यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे पाहुण्यांचे परिचय व प्रास्ताविक आविष्कार स्पर्धेचे प्रमुख डॉ. विलास गाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रियंका पवार आणि प्रा.अक्षदा कदम यांनी केले, तर आभार प्रा. सचिन सोनवणे यांनी मानले.

1 hr ago
user_Press Rajendra Taskar
Press Rajendra Taskar
कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
1 hr ago
927e7ac5-6d6f-49f9-ac6a-068f0da49f1d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.
    1
    मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध
निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* ​ अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ​ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते. ​चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. ​ शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली. ​ भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते. ​ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.
    1
    *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* 
​
अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
​ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते.
​चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
​ शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली.
​ भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते.
​ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    1 day ago
  • सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
    1
    सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
    user_Raj Kumar
    Raj Kumar
    Photographer India•
    6 hrs ago
  • Post by सोनू पटेल
    4
    Post by सोनू पटेल
    user_सोनू पटेल
    सोनू पटेल
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार नाशिक गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
    1
    नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार

नाशिक 
गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज आप लोगों bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती
    1
    ब्रेकिंग न्यूज आप लोगों  bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show
देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती
    user_Harish Kumar Gautam
    Harish Kumar Gautam
    Voice of people नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    3
    *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन*
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात
*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन*
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली.
या पथसंचलनावेळी  अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन! नगरसेवकांचा धारणकरांवर हल्लाबोल; कारवाईची मागणी “काम करा, अन्यथा घरी बसवण्याचा आयुक्तांचा स्मार्ट सिटीच्या सीईओंना इशारा वॉल मन च्या विभागनीय बदल्या करण्याचे महापौरांचे आदेश
    4
    पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन! नगरसेवकांचा धारणकरांवर हल्लाबोल; कारवाईची मागणी
“काम करा, अन्यथा घरी बसवण्याचा आयुक्तांचा स्मार्ट सिटीच्या सीईओंना इशारा वॉल मन च्या विभागनीय बदल्या करण्याचे महापौरांचे आदेश
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.