विद्यार्थ्यांत एआयबाबत जनजागृती; वेदपाठक इन्स्टिट्यूटचा उपक्रम शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24} तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञानाशी सुसंगत राहावे यासाठी शिरूर येथील वेदपाठक कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावर जनजागृती अभियान राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे २५ ते ३० शाळांना भेट देत दहावीच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. या अभियानात विद्यार्थ्यांना एआयचा शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील करिअरमध्ये कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अभ्यासासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर कसा करावा, माहिती शोधणे, प्रेझेंटेशन तयार करणे आणि सर्जनशील कामे सोप्या पद्धतीने कशी करता येतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. या कार्यक्रमात पुण्यातील प्रा. विजय नवले, डॉ. एल. डी. देशमुख, प्रा. प्रशांत टेंबरे आणि प्रा. दिगंबर ढोकले यांनी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या अतिवापराबाबतही जागरूकता करण्यात आली. मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यास, मानसिक आरोग्य आणि एकाग्रतेवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत मोबाईलचा मर्यादित व योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे २० शाळांतील प्राचार्यांनी ‘आदर्श प्राचार्य’ म्हणून संस्थेचे कौतुक करत सन्मानही केला. या कार्यक्रमाला विविध शाळांतील मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकांची उपस्थिती होती. केंद्रप्रमुख संजय वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पियुष वेदपाठक, यश नेवसे आणि सिद्धार्थ शेवंते यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य दिशा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांत एआयबाबत जनजागृती; वेदपाठक इन्स्टिट्यूटचा उपक्रम शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24} तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञानाशी सुसंगत राहावे यासाठी शिरूर येथील वेदपाठक कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावर जनजागृती अभियान राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे २५ ते ३० शाळांना भेट देत दहावीच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. या अभियानात विद्यार्थ्यांना एआयचा शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील करिअरमध्ये कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अभ्यासासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर कसा करावा, माहिती शोधणे, प्रेझेंटेशन तयार करणे आणि सर्जनशील कामे सोप्या पद्धतीने कशी करता येतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. या कार्यक्रमात पुण्यातील प्रा. विजय नवले, डॉ. एल. डी. देशमुख, प्रा. प्रशांत टेंबरे आणि
प्रा. दिगंबर ढोकले यांनी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या अतिवापराबाबतही जागरूकता करण्यात आली. मोबाईलच्या अतिवापरामुळे अभ्यास, मानसिक आरोग्य आणि एकाग्रतेवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत मोबाईलचा मर्यादित व योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे २० शाळांतील प्राचार्यांनी ‘आदर्श प्राचार्य’ म्हणून संस्थेचे कौतुक करत सन्मानही केला. या कार्यक्रमाला विविध शाळांतील मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकांची उपस्थिती होती. केंद्रप्रमुख संजय वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पियुष वेदपाठक, यश नेवसे आणि सिद्धार्थ शेवंते यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य दिशा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
- सांगलीत प्रेम विवाहाचा करूण अंत; विट्यात पत्नीचा खून अनैतिक संबंधाची झालरं! विटा पोलीस पतीच्या शोधात!1
- Post by मन्सूर शेख1
- Post by Sominath Kolhe1
- चेन्नईत भोरच्या श्लोकची सुवर्ण कामगिरी विक्रम शिंदे /भोर दि.१५ चेन्नई येथे पार पडलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्केट गेम स्पर्धेत भेलकेवाडी ,भोर येथील श्लोक पराग भेलके याने चमकदार कामगिरी केली आहे. दि.१४ ते १७ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेतील पाचशे आणि दोनशे मीटर स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.देशाच्या विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले असून ग्रामीण भागातील असूनही श्लोक याने नेत्रदीपक कामगिरी केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- ठाणे :आज मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथे डॉ. सुमित ढाक यांच्या फार्मवर 'काजू प्रक्रिया युनिट'चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद पवार उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना प्रमोद पवार यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन न घेता त्यावर प्रक्रिया करून बाजारपेठ मिळवली पाहिजे. #डॉ.सुमित_ढाक यांनी सुरू केलेला हा उपक्रम स्थानिक रोजगारासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल. यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- Post by Sominath Kolhe1
- ठाणे :मिरवणुका, डीजेचा आवाज आणि अनावश्यक खर्च टाळून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 'भूमीपुत्र एल्गार संघटनेने' एक अत्यंत अभिनव आणि डोळस उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल १३५ अनाथ, निराधार आणि मजूर कुटुंबातील मुलांचे 'शैक्षणिक पालकत्व' स्वीकारून संघटनेने महामानवाला खऱ्या अर्थाने कृतिशील आदरांजली वाहिली आहे. आज १४ एप्रिल रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रमोद पवार यांनी या उपक्रमाची अधिकृत घोषणा करताना सांगितले की, केवळ जयघोष करून विचार जपले जात नाहीत, तर ते जगले पाहिजेत. बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठीच आम्ही या १३५ कोवळ्या फुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा 'शैक्षणिक एल्गार' यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करून दुर्गम पाड्यांचा दौरा केला. यामध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून मोखाडा तालुक्यातील ३८, जव्हारमधील १८, डहाणूतील २३, तलासरीमधील १५, पालघरमधील १५, भिवंडीतील १०, वाड्यातील १० आणि विक्रमगड तालुक्यातील ६ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम शक्ती प्रमुख स्वप्नील वाघ यांनी आपल्या टीमने प्रत्यक्ष गावागावात जाऊन या पाल्यांच्या परिस्थितीची पाहणी केली. निवडलेल्या मुलांमध्ये प्रामुख्याने ज्यांना आई-वडील नाहीत, ज्यांचे पालक गंभीर आजाराने ग्रस्त किंवा दिव्यांग आहेत अशा मुलांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. आर्थिक अभावामुळे ही मुले शाळा सोडू शकतात किंवा स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहू शकतात, हे ओळखून संघटनेने त्यांच्या शैक्षणिक साहित्यापासून ते आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी उचलली आहे. या मोहिमेत युवा शक्ती प्रमुख रूपेश जाधव, नाशिक जिल्हा प्रमुख मुरलीधर कनोजे, राज्य उपाध्यक्ष कल्पेश जाधव, असगर पटेल, भूषण घोडविंदे, ॲड. सोनाली मनोरे-पवार, उपकार्याध्यक्ष दूषांत घायवट, विजय राऊत, प्रमिला तरसे आणि सुनीता वळवी यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष मनोज पारधी, अनिल करबट, गणेश माळी, रामा होला, विजय नडगे,विकास धोडी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर, भावेश पढेर इत्यादी पदाधिकारी हिरिरीने सहभागी झाले आहेत. बडेजाव टाळून समाजाचे देणे लागते या भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, १३५ मुलांची ही फक्त सुरुवात असून येत्या काळात वंचितांच्या शिक्षणासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही प्रमोद पवार यांनी दिली आहे.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1