logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मानवत तालुक्यात ग्रामरोजगार सेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू मानवत (प्रतिनिधी):-मानवत तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, १ एप्रिल २०२६ पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. याबाबतचे निवेदन पंचायत समिती मानवतचे गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आले. संघटनेच्या निवेदनानुसार, ३ ऑक्टोबर २०२४ रोजीचा शासन निर्णय तात्काळ लागू करण्यात यावा, तसेच ग्रामरोजगार सेवकांचे मागील सर्व थकीत मानधन त्वरीत अदा करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच, सध्या तालुक्यात एनएमएमएस (NMMS) प्रणालीअंतर्गत मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी तसेच इतर विकासकामे सुरू असून प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाऊन हजेरी घेणे अत्यंत कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अर्धवेळ स्वरूपाच्या जीआरनुसार नियुक्ती असताना प्रत्यक्षात पूर्णवेळ कामाचा वाढलेला ताण पेलणे शक्य नसल्याने राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. या निवेदनावर ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या तालुक्यातील विविध गावांतील पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून त्यामध्ये संतोष कापसे (हत्तलवाडी), माणिकराव धोपटे (पोहंडुळ), बापूसाहेब कदम (किन्होळा), प्रकाश भोंडवे (शेवडी), कोंडीबा पाते (कोथाळा) आणि मारुती मकासरे (पिंपळा) यांच्यासह इतर ग्रामरोजगार सेवक यांचा समावेश आहे. या आंदोलनामुळे मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील रोजगार हमी व विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

5 hrs ago
user_Kapil Ashokrao Shinde
Kapil Ashokrao Shinde
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
5 hrs ago
bf2904b6-586f-4746-b4c8-3a6c86005f22

More news from Maharashtra and nearby areas
  • परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक
    1
    परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    14 min ago
  • मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.
    1
    मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार Mantha, Jalna•
    6 hrs ago
  • घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे
    3
    घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे
पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे
    user_Ramdas Zakane
    Ramdas Zakane
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्‍वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
    1
    मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली.
या प्रकरणी विश्‍वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक  जालना आयुष नोपानी 
उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, 
गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे.
पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जालना - सोलार कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा संताप; दोन वर्षांपासून तक्रारी प्रलंबित.. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथील शेतकरी उमेश ढेरे या शेतकऱ्यांनी जिके सोलार कंपनीविरोधात गंभीर तक्रारी केल्या असून, गेल्या दोन वर्षांपासून या तक्रारींकडे कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. कंपनीकडून बसविण्यात आलेल्या सोलार यंत्रणेत बिघाड असूनही दुरुस्ती होत नाही, तसेच कंपनीचे फोनही लागत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
    1
    जालना - सोलार कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा संताप; दोन वर्षांपासून तक्रारी प्रलंबित..
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथील शेतकरी उमेश ढेरे या शेतकऱ्यांनी जिके सोलार कंपनीविरोधात गंभीर तक्रारी केल्या असून, गेल्या दोन वर्षांपासून या तक्रारींकडे कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. कंपनीकडून बसविण्यात आलेल्या सोलार यंत्रणेत बिघाड असूनही दुरुस्ती होत नाही, तसेच कंपनीचे फोनही लागत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    26 min ago
  • Post by Balaji Vedpathak
    1
    Post by Balaji Vedpathak
    user_Balaji Vedpathak
    Balaji Vedpathak
    Voice of people केज, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • समृद्धी महा मार्गावर भीषण अपघातात जालना 6 मजूर महिलांचा मृत्यू, जालन्यातील कडवंची शिवारात घडली घटना
    1
    समृद्धी महा मार्गावर भीषण अपघातात जालना 6 मजूर महिलांचा मृत्यू, जालन्यातील कडवंची शिवारात घडली घटना
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    26 min ago
  • भाजपा स्थापना दिवस व SIR मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक भाजप संघटनमंत्री संजय कौडगे यांचे मार्गदर्शन
    1
    भाजपा स्थापना दिवस व SIR मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक भाजप संघटनमंत्री संजय कौडगे यांचे मार्गदर्शन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    28 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.